PMC Ward Committee Chairman Election | दोन प्रभाग समितीच्या अध्यक्ष पदासाठी होणार निवडणूक | १३ प्रभाग समितीचे अध्यक्ष होणार बिनविरोध

Homeadministrative

PMC Ward Committee Chairman Election | दोन प्रभाग समितीच्या अध्यक्ष पदासाठी होणार निवडणूक | १३ प्रभाग समितीचे अध्यक्ष होणार बिनविरोध

Ganesh Kumar Mule Apr 17, 2026 7:48 PM

Pune Navale Bridge to Katraj Tunnel Speed Limit | कात्रज बोगदा ते नवले पूल गाडी चालवताना आता वेगमर्यादेचे बंधन | अन्यथा 2 हजाराचा दंड 
PMC Standing Committe | संभाजी महाराज पार्किंगची पुनर्बांधणी; शहरातील पार्किंग क्षमता वाढविणार | स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांची माहिती
Pune Airport Runway | ‘पुणे विमानतळाच्या धावपट्टी विस्ताराची शक्यता तपासावी’ |  केंद्रीय नागरी वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचे संरक्षणमंत्र्यांना पत्र

PMC Ward Committee Election | दोन प्रभाग समितीच्या अध्यक्ष पदासाठी होणार निवडणूक | १३ प्रभाग समितीचे अध्यक्ष होणार बिनविरोध

| भाजपकडून १४ नगरसेवकांची शिफारस | त्यातील एक उमेदवार अजित पवार गटाचा

| एक अध्यक्ष पद मिळणार कॉंग्रेसला

 

Pune PMC News – (The Karbhari News Service) – महापालिकेच्या १५ प्रभाग समित्यांच्या अध्यक्ष पदासाठी येत्या मंगळवारी म्हणजे २१ एप्रिल ला निवडणूक होणार आहे. त्यासाठी आज ३ ते ५ वाजेपर्यंत अर्ज भरण्यासाठी मुदत देण्यात आली होती. त्यानुसार एकूण १७ अर्ज नगरसचिव विभागाकडे आले आहेत. यामुळे आता दोन प्रभाग समितीच्या अध्यक्ष पदासाठी निवडणूक होणार असल्याचे चिन्ह आहे. येरवडा वडगावशेरी क्षेत्रीय कार्यालय आणि ढोले पाटील रोड क्षेत्रीय कार्यालय या दोन प्रभाग समिती अध्यक्ष पदासाठी दोन अर्ज आले आहेत. दरम्यान भाजपने एकूण १४ नगरसेवकांची शिफारस प्रभाग समिती अध्यक्ष पदासाठी केली आहे. (Pune Municipal Corporation – PMC)

 

महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम १९४९ चे कलम २९ अ १ नुसार सर्व प्रभाग समित्यांच्या अध्यक्ष पदासाठी निवडणूक कार्यक्रम राबवण्यात येणार आहे. २१ एप्रिल ला स्थायी समितीच्या सभागृहात हा निवडणूक कार्यक्रम पार पडेल. यासाठी पीठासीन अधिकारी म्हणून विभागीय आयुक्त यांनी अप्पर जिल्हाधिकारी सतीश राउत याचं नेमणूक करण्यात आली आहे. दरम्यान अध्यक्ष पदासाठी अर्ज भरण्यासाठी आज ३ ते ५ अशी वेळ देण्यात आली होती.

 

पक्षीय बलाबल नुसार भाजप कडे १४ समित्यांचे अध्यक्ष पद असणार आहे तर कॉंग्रेस कडे एक समिती असणार आहे. भाजपने १४ नगरसेवकांची शिफारस केली आहे. यातील एक उमेदवार हा राष्ट्रवादी अजित पवार गटाचा आहे.  तर कॉंग्रेस ने देखील एक उमेदवार दिला आहे. वानवडी क्षेत्रीय कार्यालय प्रभाग समिती अध्यक्ष पदासाठी कॉंग्रेस ने साहिल केदारी यांचा अर्ज भरला आहे.

दरम्यान दोन समिती अध्यक्ष पदासाठी निवडणूक होण्याची चिन्हे आहेत. कारण येरवडा वडगावशेरी क्षेत्रीय कार्यालय आणि ढोले पाटील रोड क्षेत्रीय कार्यालय या दोन प्रभाग समिती अध्यक्ष पदासाठी दोन अर्ज आले आहेत.  येरवडा वडगावशेरी क्षेत्रीय कार्यालय साठी कविता गलांडे आणि विशाल मलके यांनी अर्ज भरले आहेत. तर ढोले पाटील रोड क्षेत्रीय कार्यालय या प्रभाग समिती अध्यक्ष पदासाठी वैशाली भालेराव आणि सुरेखा कवडे यांचे अर्ज आले आहेत. त्यामुळे या दोन प्रभाग समिती साठी निवडणूक होईल. तर बाकी १३ अध्यक्ष बिनविरोध निवडले जातील.

 

पुणे महानगरपालिकेच्या प्रभाग समिती अध्यक्षपदासाठी भारतीय जनता पार्टीकडून खालील नगरसेवकांच्या नावांची शिफारस करण्यात आली आहे

१)नगर रोड वाघोली क्षेत्रीय कार्यालय – श्री अनिल दिलीप सातव

२) येरवडा वडगाव शेरी क्षेत्रीय कार्यालय – श्रीमती कविता महेंद्र गलांडे

३) ढोले पाटील रोड क्षेत्रीय कार्यालय – राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अप गट)

४) छत्रपती शिवाजीनगर घोले रोड क्षेत्रीय कार्यालय – श्रीमती अमृता राम म्हेत्रे

५) औंध बाणेर क्षेत्रीय कार्यालय श्रीमती रोहिणी सुधीर चिमटे

६) कोथरूड बावधन क्षेत्रिय कार्यालय – श्रीमती वासंती नवनाथ जाधव

७) वारजे कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालय – श्रीमती मंजुश्री संदीप खर्डेकर

८) सिंहगड रोड क्षेत्रीय कार्यालय – श्री सचिन रावसाहेब मोरे

९) धनकवडी कात्रज आंबेगाव क्षेत्रीय कार्यालय – श्रीमती प्रतिभा रोहिदास चोरगे

१०) कोंढवा उंड्री क्षेत्रीय कार्यालय – श्रीमती रंजना पुंडलिक टिळेकर

११) हडपसर मांजरी क्षेत्रीय कार्यालय – श्री प्रशांत उर्फ मामा तुपे

१२) वानवडी क्षेत्रीय कार्यालय –

१३) बिबवेवाडी क्षेत्रीय कार्यालय – श्रीमती मनीषा प्रवीण चोरबेले

१४) कसबा पेठ क्षेत्रीय कार्यालय – श्रीमती उज्वला गणेश यादव

१५) विश्रामबागवाडा क्षेत्रीय कार्यालय – श्री राघवेंद्र दीपक मानकर

आलेल्या अर्जांची सविस्तर यादी

 

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: