Sunil Tatkare NCP | राहूल सोलापूरकर सारखी विकृती ठेचलीच पाहिजे | राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षस खा. सुनिल तटकरे यांची भूमिका

HomeBreaking News

Sunil Tatkare NCP | राहूल सोलापूरकर सारखी विकृती ठेचलीच पाहिजे | राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षस खा. सुनिल तटकरे यांची भूमिका

Ganesh Kumar Mule Feb 08, 2025 8:04 PM

Shivshrusti Ambegaon | आंबेगाव येथील शिवसृष्टीच्या दुसऱ्या टप्प्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण!
Shivaji Maharaj Jayanti | ‘हिंदवी स्वराज्य महोत्सव २०२४’ ला जुन्नर येथे सुरुवात |पहिल्या दिवशीच्या कार्यक्रमातून इतिहास आणि कलासंस्कृतीचे सुंदर दर्शन
Chhatrapati Shivaji Maharaj | छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्या प्रकरणी फक्त ठेकेदार आणि अधिकारी नाही तर राज्य व केंद्र सरकारवर सुध्दा गुन्हे दाखल करा | अरविंद शिंदे

Sunil Tatkare NCP | राहूल सोलापूरकर सारखी विकृती ठेचलीच पाहिजे | राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षस खा. सुनिल तटकरे यांची भूमिका

 

Chhatrapati Shivaji Maharaj – (The Karbhari News Service) – युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत खोटा इतिहास सांगणारा राहूल सोलपूरकर म्हणजे एक विकृत प्रवृत्ती असून त्याने राजद्रोहा सारखा गुन्हा केला आहे. अशी विकृत प्रवृत्ती ठेचायलाच हवी. सरकारने कायद्याने ती ठेचावी. समाज आपल्या पध्दतीने निर्णय घईल. अशी स्पष्ट व कठोर भूमिका राष्ट्र्वादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी आज मांडली. (Sunil Tatkare NCP)

राष्ट्रवादी काँग्रेसच्या ओबीसी सेल व सामाजिक न्याय विभागाच्या प्रदेश कार्यकारिणीची आज पुणे येथील हाॅटेल सेंट्रल पार्क मधे स्वतंत्रपणे बैठक पार पडली. यावेळी खासदार तटकरे यांनी पक्षाच्या पदाधिकार्यां समोर ही भूमिका मांडली. मी स्वतः छत्रपती शिवाजी महाराज यांची राजधानी असलेल्या रायगड लोकसभेचे नेतृत्व करतो. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दलची कोणत्याही विखारी विकृतीचे कधीच समर्थन होवू शकत नाही.

राष्ट्रवादी काँग्रेस हा शिव-शाहू-फुले-आंबेडकरांचा विचार घेवून चालणारा पक्ष आहे. महापुरूषांचा आदर आणि सन्मान हा आपल्या पक्षाचा मंत्र आहे. त्यामुळे पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांनी तो सन्मान सर्वोच्च स्थानी ठेवून महापुरूषांचे विचार घेवूनच समाजात वागावे. असेही खासदार तटकरे म्हणाले.

आगामी काळात पक्षात शिस्तीला महत्व दिले जाणार असून आज रायगडचे ओबीसी सेल चे अध्यक्ष बैठकीला उपस्थित राहिले नसल्याने त्यांचे तडकाफडकी निलंबन करत असल्याची घोषणाही खा. तटकरे यांनी यावेळी केली.

बहुजन समाजाचे व्यापक हित लक्षात घेवून आपण अजितदादा पवार यांच्या नेतृत्वात एनडीए सोबत जाण्याचा निर्णय घेतला. आपल्या पक्षात सर्वच समाजाला न्याय देण्याची भूमिका असल्याने विधानसभेत राष्ट्रवादीने 41 जागा जिंकल्या. यामधे ओबीसी समाजाचा सिंहाचा वाटा असल्याचेही खा. तटकरे यांनी नमूद केले.

दरम्यान, सामाजिक समता आणि सामाजिक न्याय ही पक्षाची ठाम भूमिका असून, केंद्र आणि राज्य सरकारच्या सर्व समाज घटकांसाठी असलेल्या योजनांची माहिती घराघरात पोहचवा. त्यासाठी सर्व योजनांची माहिती असलेली एक स्वतंत्र पुस्तिका देखील प्रदेश स्तरावरून काढण्यात येईल. असे त्यांनी स्पष्ट केले. सामाजिक न्याय विभागाने लवकरच राज्यव्यापी संविधान जागर अभियान राबवण्याची घोषणाही खा. तटकरे यांनी यावेळी केली.

ओबीसी सेलच्या बैठकीला महिला प्रदेशाध्यक्ष रूपालीताई चाकणकर, मुख्य प्रवक्ते माजी खासदार आनंद परांजपे, प्रदेश सरचिटणीस आमदार शिवाजीराव गर्जे, सेलचे प्रदेशाध्यक्ष कल्याण आखाडे, पुणे शहराध्यक्ष दिपक मानकर पुणे कार्याघ्यक्ष प्रदीप देशमुख , सचिन औटी, प्रदेश सरचिटणीस लतिफभाई तांबोळी आणि सर्व जिल्हाध्यक्ष व प्रदेश पदाधिकारी उपस्थित होते.

तर, सामाजिक न्याय विभागच्या बैठकीत विभागाचे प्रदेशाध्यक्ष प्रा. सुनिल मगरे, माजी आमदार लहुजी कानडे, कार्याध्यक्ष बाळासाहेब कर्डक, प्रवक्ते महेश शिंदे, अनुसूचित जाती जमाती आयोगाचे सदस्य सचिव ॲड. गोरक्षनाथ लोखंडे यांनी मार्गदर्शन केले.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0