PMC Fire Hydrant System | पुणे शहराच्या अग्निसुरक्षेला मोठा दिलासा | फायर हायड्रंट प्रणाली उभारणीचा नगरसेवक सुहास विजय टिंगरे यांचा ठराव मुख्य सभेत एकमताने मंजूर

Homeadministrative

PMC Fire Hydrant System | पुणे शहराच्या अग्निसुरक्षेला मोठा दिलासा | फायर हायड्रंट प्रणाली उभारणीचा नगरसेवक सुहास विजय टिंगरे यांचा ठराव मुख्य सभेत एकमताने मंजूर

Ganesh Kumar Mule Jul 31, 2026 11:58 AM

Fire NOC | PMC Pune | फायर एनओसी बाबतच्या तक्रारी टाळण्यासाठी महापालिका आयुक्तांकडून नवीन नियमावली!
PMC Fire Brigade | अग्निशमन दलाच्या जवानाचे कौतुक; ड्युटीवर जाताना दुचाकी विझवल्याची घटना
PMC Fire Brigade | अग्निशमन दलाने २५४ नागरिकांची केली सुखरुप सुटका

PMC Fire Hydrant System | पुणे शहराच्या अग्निसुरक्षेला मोठा दिलासा | फायर हायड्रंट प्रणाली उभारणीचा नगरसेवक सुहास विजय टिंगरे यांचा ठराव मुख्य सभेत एकमताने मंजूर

 

Suhas Tingre NCP – (The Karbhari News Service) – पुणे शहरातील नागरिकांच्या जीवित व मालमत्तेच्या सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय घेत, पुणे महानगरपालिकेच्या नुकत्याच झालेल्या महासभेत नगरसेवक तथा स्थायी समिती सदस्य  सुहास विजय टिंगरे यांनी मांडलेला “शहरातील दाट लोकवस्ती, झोपडपट्ट्या, बाजारपेठा आणि गर्दीच्या भागांमध्ये आधुनिक फायर हायड्रंट प्रणाली उभारणे तसेच विद्यमान फायर हायड्रंट कार्यान्वित करण्याचा ठराव” मंजूर करण्यात आला. (PMC GB Meeting)

पुणे शहराचा झपाट्याने होत असलेला विस्तार, वाढती लोकसंख्या, अरुंद रस्ते, जुन्या पेठा आणि दाट लोकवस्तीच्या भागांमध्ये आग लागण्याच्या घटनांमध्ये अग्निशमन दलाला अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. अनेक ठिकाणी तातडीने पाण्याचा पुरवठा उपलब्ध होत नसल्याने आग नियंत्रणात आणण्यास विलंब होतो. या पार्श्वभूमीवर शहरभर सक्षम आणि आधुनिक फायर हायड्रंट नेटवर्क उभारण्याची गरज लक्षात घेऊन हा महत्त्वपूर्ण ठराव सादर करण्यात आला होता.

मंजूर झालेल्या ठरावानुसार शहरातील सर्व विद्यमान फायर हायड्रंटचे सर्वेक्षण करून त्यांची कार्यस्थिती तपासली जाणार असून, बंद अवस्थेतील हायड्रंट तातडीने दुरुस्त करून कार्यान्वित केले जाणार आहेत. तसेच झोपडपट्ट्या, दाट लोकवस्ती, बाजारपेठा, औद्योगिक क्षेत्रे आणि इतर उच्च जोखमीच्या भागांमध्ये नवीन फायर हायड्रंट उभारण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे.

याशिवाय सर्व फायर हायड्रंटचे GIS आधारित डिजिटल मॅपिंग, नियमित तपासणी, देखभाल व सुरक्षा लेखापरीक्षण, पाणीपुरवठा विभाग आणि अग्निशमन विभाग यांच्यात प्रभावी समन्वय, तसेच नागरिकांमध्ये अग्निसुरक्षेबाबत जनजागृती आणि प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यावरही भर देण्यात येणार आहे.

यावेळी नगरसेवक सुहास विजय टिंगरे म्हणाले,
“नागरिकांची सुरक्षितता ही पुणे महानगरपालिकेची सर्वोच्च जबाबदारी आहे. आग लागल्यानंतर धावपळ करण्यापेक्षा आग विझविण्याची सक्षम यंत्रणा आधीपासून उपलब्ध असणे अत्यंत आवश्यक आहे. महासभेने या महत्त्वपूर्ण ठरावाला मंजुरी दिल्याबद्दल सर्व सदस्यांचे आभार. आता प्रशासनाने या निर्णयाची तातडीने प्रभावी अंमलबजावणी करून पुणे शहर अधिक सुरक्षित करण्यासाठी आवश्यक पावले उचलावीत.”

या निर्णयामुळे पुणे शहरातील अग्निसुरक्षा व्यवस्थेला मोठी बळकटी मिळणार असून, आपत्कालीन परिस्थितीत अग्निशमन दलाचा प्रतिसाद अधिक जलद आणि प्रभावी होऊन नागरिकांच्या जीवित व मालमत्तेचे संरक्षण करण्यास मोठी मदत होणार आहे. पुणे महानगरपालिकेच्या महासभेने घेतलेला हा निर्णय शहराच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने एक महत्त्वपूर्ण आणि दूरदृष्टीचा टप्पा मानला जात आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: