PMC Gardens | शहरातील उद्यानांच्या सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घ्या | दोषींवर कठोर कारवाई करा | श्रीनाथ भिमाले

Homeadministrative

PMC Gardens | शहरातील उद्यानांच्या सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घ्या | दोषींवर कठोर कारवाई करा | श्रीनाथ भिमाले

Ganesh Kumar Mule Jul 31, 2026 12:22 PM

Pune Metro News | पी सी एम सी मेट्रो स्थानक ते काळेवाडी फाटा’ दरम्यान नवीन फिडर बस सेवा सुरू!
PMC Chief Auditor | पुणे महापालिकेच्या नवनियुक्त मुख्य लेखापरीक्षक यांच्यापुढे कार्यालयीन शिस्तीची आणि कामकाजाची ढीगभर आव्हाने!
PMPML Pass | पीएमपीएमएल कडून “फिरते पास केंद्र” उपक्रमाची सुरुवात!

PMC Gardens | शहरातील उद्यानांच्या सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घ्या | दोषींवर कठोर कारवाई करा | श्रीनाथ भिमाले

 

Shrinath Bhimale PMC – (The Karbhari News Service) –  पु. ल. देशपांडे उद्यानातील वृक्षतोड व लाकूड चोरी प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करावी, तसेच शहरातील सर्व महापालिकेच्या उद्यानांतील सुरक्षा व्यवस्थेचा तातडीने आढावा घेऊन आवश्यक सुधारणा कराव्यात, असे निर्देश स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी गुरुवारी झालेल्या बैठकीत प्रशासनाला दिले. (PMC Standing Committee)

भिमाले म्हणाले, “अशा प्रकारे नियमबाह्य वृक्षतोड किंवा लाकूड चोरीच्या घटना अत्यंत गंभीर आहेत. संबंधित प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करून भविष्यात अशा घटना घडणार नाहीत, यासाठी प्रभावी यंत्रणा उभारावी. प्रत्येक उद्यानात सक्षम सुरक्षा रक्षक नियुक्त करून देखरेख अधिक कडक करावी.”

यावेळी प्रशासनाने खुलासा केला की, पु. ल. देशपांडे उद्यानातील तुटलेले झाड एकत्र करून त्याची नियमानुसार विल्हेवाट लावण्याच्या सूचना संबंधितांना देण्यात आल्या होत्या. मात्र, एका ठेकेदाराने परस्पर झाड तोडून टेम्पोमध्ये भरून नेत असताना नागरिकांनी संशय आल्याने वाहन अडविले. त्यानंतर या प्रकरणाची गंभीर दखल घेत संबंधित ठेकेदारासह एका कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच संबंधित उद्यानातील सुरक्षा रक्षक बदलण्याचे आदेश देण्यात आले असून, शहरातील सर्व उद्यानांतील सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेण्याचा निर्णयही घेण्यात आल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.

सिंहगड रस्त्यावरील पु. ल. देशपांडे उद्यानातील जुने झाड परवानगीशिवाय तोडून त्याचे लाकूड नेल्याचा आरोप झाल्यानंतर हे प्रकरण समोर आले. स्थानिक नागरिक व पर्यावरण कार्यकर्त्यांनी टेम्पो अडवून कागदपत्रांची मागणी केल्यानंतर प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी महापालिकेच्या वृक्ष निरीक्षकासह संबंधितांवर पर्वती पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, महापालिकेनेही अंतर्गत चौकशी सुरू केली आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: