Shivane Nanded City Bridge | शिवणे ते नांदेड सिटी दरम्यान मुठा नदीवर 270 मीटर लांबीचा नवा पूल | 60 कोटींच्या प्रकल्पाला सुरुवात करण्याचे निर्देश

Homeadministrative

Shivane Nanded City Bridge | शिवणे ते नांदेड सिटी दरम्यान मुठा नदीवर 270 मीटर लांबीचा नवा पूल | 60 कोटींच्या प्रकल्पाला सुरुवात करण्याचे निर्देश

Ganesh Kumar Mule Aug 16, 2026 5:10 PM

Pune Metro Security Guard  | मेट्रोच्या सुरक्षा रक्षकाने प्रसंगावधान राखत दोन जीव वाचवले
BJP MLA | PMC | लोकप्रतिनिधी म्हणून मला महापालिका कसलाही संपर्क करत नाही! | भाजपच्या आमदारांनी महापालिका आयुक्तांकडे मांडली व्यथा 
CM Devendra Fadnavis Met BJP Corporators | आपली प्रतिमा हे राजकारणातील सर्वात मोठे धन | प्रतिमेला तडा जाऊ देऊ नका  | मुख्यमंत्री फडणवीस यांची नवनिर्वाचित नगरसेवकांकडून अपेक्षा

Shivane Nanded City Bridge | शिवणे ते नांदेड सिटी दरम्यान मुठा नदीवर 270 मीटर लांबीचा नवा पूल | 60 कोटींच्या प्रकल्पाला सुरुवात करण्याचे निर्देश

आयुक्त नवल किशोर राम यांची पाहणी

 

Pune PMC News – (The Karbhari News Service) – शिवणे आणि नांदेड सिटी दरम्यान मुठा नदीवर प्रस्तावित असलेल्या नवीन पुलाची जागा पाहणी महापालिका आयुक्त नवल किशोर राम आणि अतिरिक्त आयुक्त प्रजित नायर यांनी केली. शिवणे, कोंढवे धावडे, उत्तमनगर परिसरातील महापालिकेच्या विविध सुविधांची पाहणी करताना या पुलाच्या प्रस्तावावर चर्चा झाली. (Pune Municipal Corporation – PMC)

सध्या राष्ट्रीय महामार्गानंतर खडकवासला धरणाच्या पुलापर्यंत या परिसरात दुसरा कोणताही रुंद पूल अस्तित्वात नाही. त्यामुळे वाढत्या वाहतुकीच्या दृष्टीने हा पूल तातडीने विकसित करण्याची गरज असल्याचे पाहणीदरम्यान स्पष्ट झाले.

प्रस्तावित पुलाची वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे आहेत.
पुलाची लांबी 270 मीटर असून रुंदी 24 मीटर प्रस्तावित आहे. प्रकल्पाची अंदाजित किंमत सुमारे 60 कोटी रुपये आहे. नांदेड सिटी बाजूने 24 मीटर रुंदीचा रस्ता आधीच विकसित झाला आहे. मात्र शिवणे बाजूने सध्या 12 मीटर रुंदीचा रस्ता आहे. नवीन विकास आराखड्यात नदी काठावरून 24 मीटर रुंदीचा रस्ता प्रस्तावित होता, परंतु तो आराखडा रद्द झाला आहे.

पाहणीनंतर महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी सदर प्रकल्पाची कार्यवाही तातडीने सुरू करण्याचे निर्देश दिले.

या पाहणीवेळी मुख्य अभियंता प्रकल्प दिनकर गोजारे, मुख्य अभियंता पाणीपुरवठा नंदकिशोर जगताप, मुख्य अभियंता पथ राजेश बनकर, परिमंडळ 3 चे थोरात, तसेच महापालिका सभासद इंगळे आणि नानेकर उपस्थित होते.

हा पूल झाल्यास शिवणे, कोंढवे धावडे, नांदेड सिटी आणि परिसरातील नागरिकांना वाहतुकीसाठी मोठा दिलासा मिळणार आहे. तसेच प्रवासाचा वेळ कमी होऊन खडकवासला मार्गावरील ताणही कमी होण्यास मदत होणार आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: