Rajiv Gandhi Zoo Katraj | राजीव गांधी प्राणीसंग्रहालय जागतिक स्तरावरील प्राणीसंग्रहालयांप्रमाणे विकसित करा | महापालिका आयुक्त यांच्या सूचना

Homeadministrative

Rajiv Gandhi Zoo Katraj | राजीव गांधी प्राणीसंग्रहालय जागतिक स्तरावरील प्राणीसंग्रहालयांप्रमाणे विकसित करा | महापालिका आयुक्त यांच्या सूचना

Ganesh Kumar Mule Sep 23, 2025 7:08 PM

Pune PMC News | महापालिका आयुक्तांना विविध आंबेडकरी संघटनांचा पाठिंबा!
PMC Employees Ganpati | पुणे महापालिका सेवकवर्ग मंडळाचा “नागरी सेवा रथ” देखावा |  आयुक्त नवल किशोर राम व त्यांच्या पत्नी यांचे हस्ते श्रीं ची प्राणप्रतिष्ठा!
PMC Deputy Commissioner | महापालिका उपायुक्त यांच्या कामकाज व्यवस्थेत बदल | किशोरी शिंदे यांच्याकडील क्रीडा तसेच सांस्कृतिक केंद्र विभाग संतोष वारुळे यांच्याकडे

Rajiv Gandhi Zoo Katraj | राजीव गांधी प्राणीसंग्रहालय जागतिक स्तरावरील प्राणीसंग्रहालयांप्रमाणे विकसित करा | महापालिका आयुक्त यांच्या सूचना

| आयुक्त  नवल किशोर राम यांनी राजीव गांधी प्राणीसंग्रहालयाची केली पाहण

|  प्राणीसंग्रहालय मास्टर प्लॅन अंमलबजावणी जलद गतीने करण्याच्या दिल्या सूचना

Naval Kishore Ram IAS – (The Karbhari News Service) – पुणे महापालिका आयुक्त  नवलकिशोर राम यांनी सोमवार रोजी स्व. राजीव गांधी प्राणीसंग्रहालयास भेट देऊन तेथील सद्यस्थितीची माहिती घेतली. भेटीदरम्यान प्राणीसंग्रहालयातील वन्यप्राणी, वन्यप्राण्यांची निवास व्यवस्था, वन्यप्राण्यांचे दैनंदिन व्यवस्थापण, प्राण्यांची आरोग्य व्यवस्था, पर्यटकांसाठी उपलब्ध असणाऱ्या सेवा-सुविधा, प्राणीसंग्रहालयाला भेट देणारे पर्यटक इ. बाबीची प्रत्यक्ष पाहणी केली. प्राणीसंग्रहालयाचा वर्तमान व प्रस्तावीत असणारा वन्यप्राणी संकलन आराखडा व त्या अनुषंगाने बनविण्यात आलेला प्राणीसंग्रहालयाचा विकास आराखडा याबाबतची इत्यंभूत माहिती घेतली. प्राणी संग्राहालयाचे मास्टर प्लॅनमध्ये प्रस्तावीत केलेप्रमाणे चालू असलेल्या विकास प्रकल्पांची पाहणी केली. तसेच पाहणी दरम्यान काही पर्यटकांशी संवाद साधून त्यांची मते जाणून घेतली. (Pune Municipal Corporation – PMC)

स्व. राजीव गांधी प्राणीसंग्रहालयात पर्यटकांची संख्या वाढून महसुली उत्पन वाढावे यासांठी प्राणीसंग्रहालयाच्या नियोजित आराखड्याची जलद गतीने अंमलबजावणी करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या. प्राणीसंग्रहालयातील आधुनिक सर्पोद्यान प्रकल्प पूर्ण करून “बर्ड पार्क” प्रकल्पाची त्वरित सुरवात करावी असे सूचित केले. वन्यप्राणी मंजूर संकलन आराखड्यातील प्रजाती नियोजित पद्धतीने प्राणीसंग्रहालयात दाखल कराव्यात, वन्य प्राण्यांना उच्चप्रतीच्या आरोग्य सेवा दिल्या जाव्यात, प्राण्यांची खाद्य सुरक्षा व प्रत नियंत्रण यांस प्राधान्य दयावे, पर्यटकांचा प्राणीसंग्रहालय प्रवेश सुलभ व्हावा याकरिता मुख्य प्रवेशद्वाराच्या ठिकाणी प्रस्तावित ” एन्ट्रस प्लाझा” प्रकल्प तातडीने पूर्ण करून कार्यान्वित केला जावा, प्राणीसंग्रहालयाची सुरक्षा व्यवस्था सक्षम करावी, याबाबतच्या सूचना दिल्या. प्राणी संग्राहालायास भेट देणाऱ्या नागरिकांनाच्या वाहनांसाठी वाहनतळांची व्यवस्था अधिक सक्षम करून त्याची क्षमता वाढविण्याची गरज असल्याचे नमूद केले. पर्यटकांना विशेषतः लहान मुलांना उपलब्ध असलेल्या सुविधा चांगल्या असल्या तरी सदर सुविधा आंतरराष्ट्रीय दर्जाच्या करण्याकरीता काम करण्याचे निर्देश आयुक्त यांनी दिले

प्राणीसंग्रहालयाच्या एकात्मिक विकास आराखड्याच्या पूर्णत्वासाठी आणि पुणेकरांना व पर्यटकांना चांगले व सुसज्ज प्राणीसंग्रहालय उपलब्ध करून . देण्याकरीता नियोजन करून कालबद्ध आराखडा तयार करून आवश्यक प्रकल्पीय रक्कमेस मान्यता घेवून पुढील चार वर्ष कालावधीत विकासन पूर्ण करून स्व. राजीव गांधी प्राणीसंग्रहालय जागतिक स्तरावरील प्राणीसंग्रहालयांप्रमाणे विकसित होईल यासाठी प्रयत्न केले जावेत असेही आयुक्तांनी  सूचित केले.

यावेळी उद्यान विभागाचे सह महापालिका आयुक्त डॉ. अशोक दि. घोरपडे, . प्राणीसंग्रहालयाचे संचालक डॉ. राजकुमार जाधव, कार्यकारी अभियंता श्री. राहूल साळुंखे, उपसंचालक डॉ. सुचित्रा सूर्यवंशी – पाटील, उप अभियंता श्री. अमोल रुद्रके, प्राणीसंग्रहालयाचे कन्सल्टंट मे. एच. के. एस. डिझायनर अँड कन्सल्टंट इंटरनॅशनल कंपनीचे प्रतिनिधी इ. उपस्थितीत होते.’

 

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: