PMC Water Bill | शासनाच्या कार्यालयांकडील पाणीपट्टीची ३४२ कोटीची थकबाकी कधी वसूल करणार? सजग नागरिक मंचाचा महापालिका आयुक्त यांना सवाल 

Homeadministrative

PMC Water Bill | शासनाच्या कार्यालयांकडील पाणीपट्टीची ३४२ कोटीची थकबाकी कधी वसूल करणार? सजग नागरिक मंचाचा महापालिका आयुक्त यांना सवाल 

Ganesh Kumar Mule Sep 16, 2025 2:34 PM

79th Independence Day in PMC | पुणे महानगरपालिकेत भारताचा ७९ वा स्वातंत्र्य दिन समारंभ संपन्न
Contract Employees PMC | कंत्राटी कामगारांच्या समस्या दूर करण्यासाठी मनपा ठोस पावले उचलणार – आयुक्त नवल किशोर राम यांचा ठाम शब्द
PMC Contract Employees Diwali Bonus | पुणे मनपाच्या कंत्राटी कामगारांना दिवाळी बोनस देण्याबाबत महापालिका आयुक्त सकारात्मक!

PMC Water Bill | शासनाच्या कार्यालयांकडील पाणीपट्टीची ३४२ कोटीची थकबाकी कधी वसूल करणार? सजग नागरिक मंचाचा महापालिका आयुक्त यांना सवाल

 

PMC Water Supply Department – (The Karbhari News Service) – पुण्यातील केंद्र व राज्य शासनाच्या कार्यालयांकडील पाणीपट्टीची ३४२ कोटी रुपयांची थकबाकी वसूल करण्यासाठी कधी प्रयत्न करणार ? असा सवाल सजग नागरिक मंचाचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांना केला आहे. (Vivek Velankar Sajag Nagrik Manch)

वेलणकर यांनी दिलेल्या निवेदन नुसार  पुणे महापालिका हद्दीतील केंद्र व राज्य शासनाच्या विविध कार्यालयांकडे आज रोजी पाणीपट्टीची किती थकबाकी याची पुणे महापालिकेच्या पाणीपुरवठा कार्यालयात माहिती अधिकारात माहिती मागितली असता या खात्यांकडे ३४२ कोटी रुपयांची थकबाकी असल्याचे दिसून येत आहे. Pune Cantonment Board कडे जवळपास ४० कोटी रुपयांची , गॅरीसन इंजिनियर्स कडे ५० कोटी रुपयांची , रेल्वेकडे जवळपास ४५ कोटी रुपयांची, ससून रुग्णालयाकडे ८ कोटींची तर येरवडा जेल कडे ७ कोटींची पाणीपट्टीची थकबाकी असावी हे खेदजनक आहे. याशिवाय पोस्ट , बीएसएनएल या केंद्र सरकारच्या आस्थापनांकडे तर जलसंपदा , पोलिस ,शिक्षण खातं यांसारख्या राज्य शासनाच्या आस्थापनांकडे लाखो रुपयांची थकबाकी आहे. असे निवेदनात म्हटले आहे.

——-

या सरकारी / निमसरकारी आस्थापनांकडून थकबाकी वसूल करण्यासाठी आपल्याला जातीने लक्ष घालून त्या त्या आस्थापनांच्या प्रमुखांशी बोलून वेळप्रसंगी पाणी पुरवठा तोडण्याची धमकी देऊन वसुली करावी लागेल. काही वर्षांपूर्वी तत्कालीन मनपा आयुक्त महेश झगडे यांनी पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाचा पाणीपुरवठा बंद करुन त्यांना पैसे भरायला भाग पाडले होते हे या निमित्ताने आपल्या नजरेस आणून देऊ इच्छितो. या निमित्ताने सामान्य थकबाकीदार आणि शासकीय थकबाकीदार यांना महापालिका एकच न्याय लावते हा संदेश दिला जाईल.

विवेक वेलणकर,अध्यक्ष, सजग नागरिक मंच पुणे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: