Pune Underground Ring Road | पाताल लोक चा आराखडा आठवडाभरात राज्य सरकारला केला जाणार सादर!  : महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांची माहिती

Homeadministrative

Pune Underground Ring Road | पाताल लोक चा आराखडा आठवडाभरात राज्य सरकारला केला जाणार सादर! : महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांची माहिती

Ganesh Kumar Mule May 06, 2026 9:15 PM

Naval Kishore Ram IAS | पुणे महानगरपालिका आयुक्तांकडून कामचुकार अधिकाऱ्यांवर तडकाफडकी बदलीची कारवाई!
Pune PMC Census | यंदाच्या जनगणनेत नागरिकांना प्रथमच स्वगणनेचा पर्याय उपलब्ध | स्वतंत्र पोर्टल ची निर्मिती
Pune Shivsena on Water Issue | शिवसेनेच्या वतीने पुणे महानगरपालिका मुख्य प्रवेशद्वारावर हंडा मोर्चा | पाणीटंचाईच्या प्रश्नावर तात्काळ व प्रभावी उपाययोजना करण्याची मागणी

Pune Underground Ring Road | पाताल लोक चा आराखडा आठवडाभरात राज्य सरकारला केला जाणार सादर!

: महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांची माहिती

 

Naval Kishore Ram – (The Karbhari News Service) – शहरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी भुयारी वर्तुळाकार मार्ग बनवण्यात येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हा ड्रीम प्रोजेक्ट आहे. अशा ५४ किलोमीटर लांबीचा भुयारी वर्तुळाकार मार्ग (पाताल लोक)चा प्राथमिक आराखडा पुढील सात ते आठ दिवसात राज्य शासनास सादर केला जाणार आहे. अशी माहिती महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी दिली. (Pune PMC News)

याबाबतची प्राथमिक बैठक नुकतीच पार पडली असून त्यात या मार्गातील प्रस्तावित पाच रस्त्यांवर चर्चा करण्यात आली असल्याचे आयुक्तांनी पत्रकारांशी बोलतना स्पष्ट केले. या प्रकल्पासाठी पुणे महापालिका आणि पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए)ची स्वतंत्र एसपीव्ही स्थापन करून त्यामाध्यमातून प्रकल्पाचे काम केले जाणार आहे. राज्य शासनाने नुकतेच या प्रकल्पाचा सर्वंकष आराखडा तयार करणे, त्यासाठी सल्लागार नेमणे, प्रकल्प अहवालास राज्य शासनाची मान्यता घेणे, तसेच प्रकल्पाच्या खर्चासाठी आवश्‍यक तो निधी उभा करणे, त्यासाठी कर्ज काढणे आदी सर्व जबाबदारी आता महापालिकेवर आली. पीएमआरडीए केवळ या प्रकल्पासाठी सहाय्यक म्हणून काम पाहणार आहे.

शहरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी पीएमआरडीएने कात्रज ते येरवडा असा बोगद्याचा प्रस्ताव सादर करावा. हा ‘ट्विन टनेल’ असावा. अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी यापूर्वी दिल्या होत्या. त्यानुसार पीएमआरडीएने नेमलेल्या सल्लागार कंपनीने सर्व्हेक्षण पूर्ण करून दुमजली वर्तुळाकार भुयारी मार्गाचा आराखडा सादर केला होता. त्यामध्ये पुणे शहरात येणाऱ्या सर्व महामार्गांना जोडणारा आणि सहा ते सात ठिकाणावरून ये-जा करणे शक्य हाईल, असा सुमारे ५४ किलोमीटर लांबीचा भूमिगत रस्ता दर्शविला आहे. तर् या भुयारी मार्गांच्या सोबतच पाषाण रस्ता ते कोथरूड आणि सिंहगड रस्ता ते तळजाई अशा महापालिकेच्या विकास आराखड्यातील बोगद्यांचे कामही केले जाणार आहे.
————-

असे आहेत पाच प्रमुख मार्ग

– सिंहगड रस्ता (पु. ल देशपांडे उद्यान ) ते जगताप डेअरी ( वाकड)
– सिंहगड रस्ता (पु. ल देशपांडे उद्यान ) ते सेव्हन लव्हज चौक
– येरवडा ( शास्त्रीनगर) ते कोंढवा ( खडी मशिन चौक)
– जगातप डेअरी ते हिंजवडी पुढे लाॅयला शाळा ( पाषाण रस्ता)
– खडकी ते शास्त्री नगर ( येरवडा)

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: