PMC Road Widening FSI TDR | रस्ता पूर्ण विकसित केल्याशिवाय अतिरिक्त FSI-TDR नाही! | पुणे महापालिका आयुक्तांचा बिल्डरांसाठी मोठा आदेश

पुणे महापालिका आयुक्तांचा रस्ता रुंदीकरण आणि अतिरिक्त FSI TDR बाबत आदेश

Homeadministrative

PMC Road Widening FSI TDR | रस्ता पूर्ण विकसित केल्याशिवाय अतिरिक्त FSI-TDR नाही! | पुणे महापालिका आयुक्तांचा बिल्डरांसाठी मोठा आदेश

Ganesh Kumar Mule Nov 27, 2026 7:35 PM

PMC Deputy Commissioner | महापालिका उपायुक्त यांच्या कामकाज व्यवस्थेत बदल | किशोरी शिंदे यांच्याकडील क्रीडा तसेच सांस्कृतिक केंद्र विभाग संतोष वारुळे यांच्याकडे
Pune PMC Vs Pune Irrigation | पाटबंधारे विभागाच्या भूमिकेवर महापालिका आयुक्त नाराज!
Pune PMC News | महापालिकेचे आरोग्य निरिक्षक, मोकादम यांच्यावर दंडात्मक कारवाई | कामात हलगर्जीपणा केल्याचा ठपका

PMC Road Widening FSI TDR | रस्ता पूर्ण विकसित केल्याशिवाय अतिरिक्त FSI-TDR नाही!

| पुणे महापालिका आयुक्तांचा बिल्डरांसाठी मोठा आदेश

 

PMC Road Widening Policy | (The Karbhari News Service) – पुणे शहरात रस्ता रुंदीकरणाच्या नावाखाली प्रस्तावित रस्त्याची प्रत्यक्षात जागेवर अंमलबजावणी न करताच बांधकाम व्यावसायिकांना अतिरिक्त FSI आणि TDR चे लाभ दिले जात असल्याच्या पार्श्वभूमीवर पुणे महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाच्या कलम २१० अन्वये प्रस्तावित केलेला रस्ता त्याच्या संपूर्ण लांबीमध्ये प्रत्यक्ष जागेवर विकसित झाल्याशिवाय त्या रस्त्याच्या प्रस्तावित रुंदीनुसार मिळणारे अतिरिक्त बांधकाम लाभ अनुज्ञेय करण्यात येऊ नयेत, असे स्पष्ट आदेश आयुक्तांनी दिले आहेत.

यामध्ये प्रीमियम FSI, TDR आणि इतर अतिरिक्त बांधकाम लाभांचा समावेश आहे. त्यामुळे रस्ता रुंदीकरण केवळ कागदावर दाखवून त्याच्या आधारे बांधकाम प्रस्तावांना अतिरिक्त लाभ मिळवण्याच्या प्रक्रियेला आता आळा बसण्याची शक्यता आहे. याबाबत महापालिका आयुक्त कार्यालयाने  कार्यालयीन परिपत्रक जारी केले आहे.

नेमकी काय होती समस्या?

पुणे महापालिका हद्दीतील अस्तित्वात असलेल्या सार्वजनिक रस्त्यांची रुंदी वाढविण्यासाठी महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील कलम २१० अन्वये प्रस्ताव तयार केले जातात. संबंधित खात्यामार्फत हे प्रस्ताव सादर केले जातात आणि स्थायी समितीच्या मान्यतेने त्यांना मंजुरी दिली जाते.

मात्र, अनेक प्रकरणांमध्ये प्रस्तावित रस्ता रुंदीनुसार प्रत्यक्ष विकसित झालेला नसतानाही, त्या प्रस्तावित रुंदीचा आधार घेऊन UDCPR-२०२० मधील तरतुदींनुसार प्रीमियम FSI आणि TDR चा लाभ देऊन बांधकाम प्रस्ताव मंजूर केले जात असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे.

यामुळे एकीकडे प्रस्तावित रस्ता प्रत्यक्षात विकसित होत नाही, तर दुसरीकडे त्या रस्त्याच्या प्रस्तावित रुंदीच्या आधारे बांधकामांना अतिरिक्त विकासाचे लाभ दिले जातात. परिणामी, पुणे महापालिकेमार्फत नागरिकांना पुरविण्यात येणाऱ्या पायाभूत सुविधा आणि अस्तित्वातील रस्त्यांवर अतिरिक्त ताण निर्माण होत असल्याचे आयुक्तांनी परिपत्रकात नमूद केले आहे.

आयुक्तांचा स्पष्ट आदेश; संपूर्ण रस्ता विकसित करणे बंधनकारक

या पार्श्वभूमीवर आयुक्त नवल किशोर राम यांनी महत्त्वाचे निर्देश दिले आहेत. २७ नोव्हेंबर २०२६ रोजीच्या आदेशानंतर कलम २१० अंतर्गत रस्ता रुंदी प्रस्तावित केलेल्या रस्त्यांबाबत प्राप्त होणाऱ्या नवीन, वाढीव किंवा दुरुस्त बांधकाम प्रस्तावांमध्ये अतिरिक्त लाभ देण्यावर निर्बंध घालण्यात आले आहेत.

संबंधित रस्ता कलम २१० अन्वये प्रस्तावित केलेल्या रुंदीनुसार संपूर्ण लांबीमध्ये प्रत्यक्ष जागेवर विकसित झाल्याशिवाय त्या प्रस्तावित रुंदीच्या आधारे कोणत्याही स्वरूपाचे अतिरिक्त लाभ अनुज्ञेय करू नयेत, असे परिपत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे.

यामध्ये प्रीमियम FSI, TDR तसेच इतर अतिरिक्त बांधकाम लाभांचा समावेश आहे. म्हणजेच केवळ रस्ता रुंदीकरणाचा प्रस्ताव मंजूर झाला म्हणून संबंधित बांधकाम प्रकल्पाला अतिरिक्त FSI किंवा TDR चा लाभ मिळणार नाही. त्यासाठी प्रस्तावित रस्ता संपूर्ण लांबीमध्ये प्रत्यक्ष विकसित झालेला असणे आवश्यक असेल.

शहर अभियंत्यांवर अंमलबजावणीची जबाबदारी

या निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी करण्याची जबाबदारी शहर अभियंत्यांवर सोपविण्यात आली आहे. कलम २१० अंतर्गत प्रस्तावित रुंदीनुसार संपूर्ण रस्ता प्रत्यक्ष जागेवर विकसित झाल्याशिवाय अतिरिक्त बांधकाम लाभ मंजूर होणार नाहीत, याची खबरदारी शहर अभियंत्यांनी घ्यावी, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: