PMC JE Exam 2026 | पुणे मनपा कनिष्ठ अभियंता (स्थापत्य ) परीक्षा | एकूण उमेदवारांपैकी फक्त ५० टक्के  उमेदवारांनी दिली परीक्षा!

Homeadministrative

PMC JE Exam 2026 | पुणे मनपा कनिष्ठ अभियंता (स्थापत्य ) परीक्षा | एकूण उमेदवारांपैकी फक्त ५० टक्के  उमेदवारांनी दिली परीक्षा!

Ganesh Kumar Mule May 06, 2026 8:38 PM

Shivajinagar ST Stand | शिवाजीनगर एसटी स्थानक बाबत १५ दिवसात निर्णय घ्या| अन्यथा मुख्यमंत्र्यांना अडवू
Ganesh Utsav 2024 | गणेश उत्सवात ध्वनी प्रदूषणाबाबत जनजागृती करा | पुणे महापालिका आयुक्तांच्या गणेश मंडळांना आणि प्रशासनाला सूचना
Online Fraud | Devendra Fadnavis | ऑनलाइन फसवणुकीबाबत जलद प्रतिसादासाठी ‘डायनॅमिक प्लॅटफॉर्म’ तयार करणार | उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

PMC JE Exam 2026 | पुणे मनपा कनिष्ठ अभियंता (स्थापत्य ) परीक्षा | एकूण उमेदवारांपैकी फक्त ५० टक्के  उमेदवारांनी दिली परीक्षा!

| ७ शहरात झाली परीक्षा

 

PMC Recruitment 2026 – (The Karbhari News Service) – पुणे महापालिकेच्या वतीने कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) १६९ पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. यासाठीची परीक्षा एकूण ३ दिवस म्हणजे २२, २३ आणि २९ एप्रिल अशी परीक्षा घेण्यात आली आहे. एकूण ७ शहरात ही परीक्षा झाली. मात्र एकूण उमेदवारांपैकी फक्त ५० टक्के उमेदवारांनी ही परीक्षा दिली आहे.  अशी माहिती सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त विजयकुमार थोरात यांनी दिली. (Pune PMC News)

पुणे, मुंबई, नागपूर, अमरावती, नांदेड आणि संभाजी नगर आणि कोल्हापूर अशा ७ शहरात ही परीक्षा घेण्यात आली.

महापालिकेत कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) पदाच्या भरती प्रक्रियेसाठी पुणे महापालिकेने १६९ पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध केली होती. त्यानुसार उमेदवार १ ऑक्टोबर पासून ते ३१ ऑक्टोबर पर्यंत अर्ज करण्याची संधी महापालिका प्रशासनाकडून देण्यात आली होती. यात एकूण १४ हजार १५३ उमेदवारांनी अर्ज केले होते. दरम्यान मागील जाहिराती वेळी २७८७९ उमेदवारांनी अर्ज केले होते. त्यांचे अर्ज वैध धरण्यात आले आहेत. तर  एकूण अर्ज हे ४१ हजार २७२ इतके झाले होते.

मात्र ४१ हजार २७२ उमेदवारांपैकी फक्त २० हजार ७३५ उमेदवारांनी परीक्षा दिली आहे. तर २० हजार ५३७ उमेदवार हे परीक्षेला गैरहजर होते. म्हणजे जवळपास ५० टक्के उमेदवार हे परीक्षेला हजर झाले नाहीत.

| २५ मे पर्यंत येऊ शकतो निकाल

थोरात यांनी सांगितले कि, परीक्षा पार पडली आहे. आता २५ मे पर्यंत  निकाल जाहीर केला जाणार आहे. त्यानंतर कागदपत्राची पडताळणी करून उमेदवारांना नियुक्तीपत्रे दिली जाणार आहेत. १५ जून पर्यंत  सगळी प्रक्रिया होऊन नवीन कर्मचारी महापालिकेला मिळणार आहेत.

——-

एकूण उमेदवारांपैकी फक्त ५० टक्के उमेदवारांनी ही परीक्षा दिली आहे. सर्वसाधारणपणे ७० टक्के पर्यंत उमेदवार परीक्षा देतात. मात्र इथे उमेदवार खूपच कमी दिसून आले. जाहिरात निघून दोन वर्षाचा कालावधी झाल्याने काही उमेदवारांना इतर ठिकाणी नोकरी लागलेली असू शकते. तर काही उमेदवार हे परीक्षा केंद्र दूर आहे, म्हणून  देखील आले नसतील.

| विजयकुमार थोरात, उपायुक्त, पुणे मनपा.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: