Pune PMC News | वृक्षतोडीबाबत आता महापालिका आयुक्त स्वतः घेणार सुनावणी! 

Homeadministrative

Pune PMC News | वृक्षतोडीबाबत आता महापालिका आयुक्त स्वतः घेणार सुनावणी! 

Ganesh Kumar Mule May 06, 2026 9:35 PM

PMC STP Plant Upgradation | पुणे महानगरपालिकेच्या ८४२ कोटींच्या मलनि:स्सारण प्रकल्पाला (STP Plant Upgradataion) राज्य सरकारची मंजूरी | गेल्या वर्षभरापासून प्रलंबित होता प्रस्ताव!
Cabinet Decision | मंत्रिमंडळ बैठक निर्णय | राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतरची पहिली मंत्रिमंडळ बैठक
Pune Pustak Mahotsav Record | भारताने चीनचा रेकॉर्ड मोडला

Pune PMC News | वृक्षतोडीबाबत आता महापालिका आयुक्त स्वतः घेणार सुनावणी

 

Pune Tree Cutting News – (The Karbhari News Service) – गेल्या काही दिवसांत पर्यावरण कार्यकर्त्यांकडून गणेशखिंड रस्त्यावरील ५२९ वृक्ष कापण्याचा आरोप करण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर प्रशासनावर टीका वाढली होती. मात्र महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी या सर्व आरोपांचे खंडन करत, संबंधित वृक्षतोडीस अद्याप कोणतीही परवानगी देण्यात आलेली नसल्याचे स्पष्ट केले.  या प्रकरणात नागरिकांच्या तक्रारींवर महापालिका आयुक्त नवल किशोर राम स्वतः सुनावणी घेणार आहेत.  (Pune Municipal Corporation – PMC)

तसेच, या विषयावर न्यायालयीन प्रक्रिया सुरू नसल्याचेही त्यांनी नमूद केले. अफवांमुळे नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण होत असल्याने, वस्तुस्थिती समोर आणण्यासाठी तक्रारींची थेट सुनावणी घेण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान, शहरातील विविध विकासकामांमुळे मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड झाल्याच्या तक्रारीही समोर येत आहेत. नदी सुधार प्रकल्प, मेट्रो आणि रस्ता रुंदीकरण यांसारख्या कामांमुळे वृक्षतोड झाल्याचे म्हटले जात असले, तरी प्रत्यक्ष आकडेवारीची पडताळणी केली जाणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

गरज भासल्यासच वृक्ष काढले जातील आणि त्यांचे योग्य पुनर्रोपण करण्यात येईल, असा पुनरुच्चार करत प्रशासनाने सध्यातरी गणेशखिंड रस्त्यावरील हेरिटेज वृक्ष सुरक्षित असल्याचे संकेत दिले आहेत.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0