PMC Special Student School | विशेष विद्यार्थिनी आकांक्षा किशोर पेडगावकरचा राज्यस्तरीय सावित्रीबाई फुले पुरस्काराने सन्मान!
PMC Schools – (The Karbhari News Service) – विशेष मुलांची शाळा मनपा शाळा क्र 14 बी शाळेतील विशेष विद्यार्थिनी आकांक्षा किशोर पेडगावकर हिला दिव्यांगाच्या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत 100 मीटर धावणे स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळाला. (Pune PMC News)
तसेच दिव्यांग इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री यांच्यातर्फे घेण्यात आलेली आंतरशालेय चित्रकला स्पर्धेमध्ये आकांक्षा चा प्रथम क्रमांक आलेला आणि नवक्षितिज या विशेष मुलांच्या संस्था तर्फे आयोजित पर्वती चढणे स्पर्धेत स्वमग्न (ऑटिझम) गटात प्रथम क्रमांक आला.
तिच्या या सर्व क्रीडा क्ष्रेत्रतील यशाबद्दल सृष्टी बहुद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने तिला राज्यस्तरीय सावित्रीबाई फुले पुरस्कार देण्यात आला. सामान्य मुलापेक्षा दिव्यांग मुलं कोणत्याही क्षेत्रात कमी नाही हे आकांक्षा ने सिद्ध केले.
COMMENTS