Pune Metro on Bhide Bridge | पुणे मेट्रोचा मोठा निर्णय: 9 जूनपासून 5 सप्टेंबरपर्यंत भिडे पूल वाहतुकीसाठी बंद

Homeadministrative

Pune Metro on Bhide Bridge | पुणे मेट्रोचा मोठा निर्णय: 9 जूनपासून 5 सप्टेंबरपर्यंत भिडे पूल वाहतुकीसाठी बंद

Ganesh Kumar Mule Jun 08, 2026 8:08 PM

Navale Bridge Accident | अल्पकालीन उपाययोजना तातडीने अमलात आणा – मुरलीधर मोहोळ यांचे निर्देश | यंत्रणांवर जबाबदारी निश्चित
Ramraksha Pathan Pune | Hemant Rasane | ७५ हजार पुणेकरांनी केले रामरक्षा पठण
Pune PMC Education department | शिक्षण विभाग समायोजन न झाल्याने कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीत बाधा! 

Pune Metro on Bhide Bridge | पुणे मेट्रोचा मोठा निर्णय: 9 जूनपासून 5 सप्टेंबरपर्यंत भिडे पूल वाहतुकीसाठी बंद

| डेक्कन जिमखाना मेट्रो स्थानकाला पेठांशी जोडणाऱ्या पादचारी पुलाचे काम सुरू

| पर्यायी मार्ग वापरण्याचे आवाहन

 

Pune News – (The Karbhari News Service) –  पादचारी पुलाच्या कामामुळे आणि पोलिसांच्या वाहतूक शाखेचे ना हरकत प्रमाणपत्र मिळाल्यानुसार, नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने भिडे पूल मंगळवार , ९ जून  रोजी रात्री १२ वाजल्यापासून ते ५ सप्टेंबर २०२६ पर्यंत वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे.  अशी माहिती पुणे मेट्रो च्या वतीने देण्यात आली. (Pune Breaking News)

मात्र नदीपात्रातील रस्ता वाहतुकीसाठी पूर्णपणे खुला राहणार आहे. भिडे पूल बंद असताना नागरिकांनी लकडी पूल, बालगंधर्व पूल आणि झेड ब्रिज या पुलांचा वापर करावा, असे आवाहन पुणे मेट्रोने केले आहे.

वनाझ ते रामवाडी या मार्गावरील छत्रपती संभाजी उद्यान आणि डेक्कन जिमखाना मेट्रो स्थानकांना पुण्याच्या मध्यवर्ती पेठ भागाशी जोडण्यासाठी पुणे मेट्रोतर्फे पादचारी पूल बांधण्यात येत आहेत. यापैकी छत्रपती संभाजी उद्यान मेट्रो स्थानकाला पेठ भागाशी जोडणारा पादचारी पूल मेट्रो प्रवासी आणि नागरिकांसाठी खुला करण्यात आला आहे.
डेक्कन जिमखाना मेट्रो स्थानकाला जोडणारा पादचारी पूल मुठा नदीवरील भिडे पुलाच्या वर बांधण्यात येत आहे. हा पूल पूर्ण झाल्यानंतर नारायण पेठ, शनिवार पेठ आणि लक्ष्मी रस्ता येथील नागरिकांसह या भागात शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांना डेक्कन मेट्रो स्थानकात ये-जा करणे अधिक सोपे होणार आहे.

पुणे मेट्रोतर्फे डेक्कन जिमखाना स्थानकाला जोडणाऱ्या पादचारी पुलाचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यात येईल. तोपर्यंत नागरिकांनी पर्यायी मार्गांचा वापर करून सहकार्य करावे, अशी विनंती करण्यात आली आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: