Pune PMC Retirement | ऑक्टोबर महिन्यात पुणे महापालिकेचे 51 अधिकारी आणि कर्मचारी सेवानिवृत्त 

Homeadministrative

Pune PMC Retirement | ऑक्टोबर महिन्यात पुणे महापालिकेचे 51 अधिकारी आणि कर्मचारी सेवानिवृत्त 

Ganesh Kumar Mule Oct 31, 2025 9:50 PM

Dearness Allowance | केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता पुन्हा 4% वाढणार!
PMC Pune Recruitment Exam | पुणे महापालिका पदभरती साठीची परीक्षा ऑक्टोबर महिन्यात होण्याची शक्यता!
Aadhaar toll Free | आधारचा टोल फ्री क्रमांक | यावर कॉल केल्यास या महत्त्वाच्या गोष्टी केल्या जातील | जाणून घ्या

Pune PMC Retirement | ऑक्टोबर महिन्यात पुणे महापालिकेचे 51 अधिकारी आणि कर्मचारी सेवानिवृत्त

 

PMC Retired Employees – (The Karbhari News Service) –ऑक्टोबर, 2025 महिन्यात पुणे महापालिकेचे (Pune Municipal Corporation) 51 अधिकारी आणि कर्मचारी सेवानिवृत्त झाले. या कर्मचाऱ्यांसाठी महानगपालिका कामगार कल्याण विभागाच्या (PMC Labour Welfare Department) वतीने सेवापूर्ती समारंभ आयोजित करण्यात आला होता. (PMC Pune)

या समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून संदीप खलाटे,उप आयुक्त, अतिक्रमण व अनधिकृत बांधकाम निर्मूलन विभाग, नितीन देशपांडे, कार्यकारी अभियंता, जयंत पवार, अध्यक्ष, सेवानिवृत्त सेवक संघ, सुरेश दिघे, उप कामगार अधिकारी हे उपस्थित होते.  नितीन केंजळे, मुख्य कामगार अधिकारी (Nitin Kenjale PMC) यांनी कार्यक्रमाच्या प्रस्तावनेवर बोलताना सेवापुर्ती समारंभाची पार्श्वभूमी सांगून सेवकांच्या भविष्यात मिळणाऱ्या रकमा, गुंतवणूक व नियोजन याची सविस्तर माहिती दिली. तसेच कोणत्याही सेवकास काही अडचण आल्यास त्यांनी कामगार कल्याण विभागास भेट द्यावी, असे आवाहन केले व सर्वाना भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

सेवानिवृत्त होणारे अधिकारी नितीन देशपांडे,  प्राची तिखे,  निलेखा तोटे,  अनिल दळवी यांनी पुणे महानगरपालिकेत केलेल्या सेवेबद्दल कृतज्ञता व्यक्त करून पुणे महानगरपालिकेचे आभार मानले व सर्वांना शुभेच्छा दिल्या. जयंत पवार यांनी कामगार कल्याण विभागाच्या वतीने महिने महा आयोजित करण्यात येणाऱ्या सेवपूर्ती समारंभ स्तुत्य उपक्रम असल्याचे नमूद करून सर्वांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे  संदीप खलाटे यांनी सर्व सेवकांनी आपल्याला मिळणाऱ्या वेळेचे नियोजन करावे. आपण नेहमी आनंदाने कामे केली पाहिजेत, कुटुंबाला वेळ दिला पाहिजे, कुटुंबातील सदस्याबरोबर आनंदाने राहिले पाहिजे असे नमूद करून सर्वांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

प्रमुख पाहुण्यांच्या मार्गदर्शनानंतर सर्व सेवानिवृत्त अधिकारी / कर्मचारी यांना शॉल व स्मृतिचिन्ह देवून गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनीषा कायटे व नियोजन महेश मुंडलिक यांनी केले.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: