PMC Additional Commissioner | अतिरिक्त आयुक्त यांच्या नियंत्रणा खालील विभागात बदल | घनकचरा विभाग जनरल यांच्याकडे तर बांधकाम विभाग इस्टेट यांच्या अखत्यारित
Pune PMC News – (The Kabhari News Service) – पुणे महानगरपालिका प्रशासनाकडील अतिरिक्त महापालिका आयुक्त (जनरल), अतिरिक्त महापालिका आयुक्त (इस्टेट) व अतिरिक्त महापालिका आयुक्त (विशेष) यांचे नियंत्रणाखाली सोपवावयाचे विभागांबाबत यापूर्वी आदेश पारित करण्यात आले होते. मात्र नुकतेच अतिरिक्त आयुक्त एम जे प्रदीप चंद्रन यांची बदली झाली असून सरकारने पवनीत कौर यांची अतिरिक्त आयुक्त पदी नियुक्ती केली आहे. त्यामुळे अतिरिक्त आयुक्त यांच्या नियंत्रणा खालील विभागात अंशतः बदल करून नवीन व्यवस्था करण्यात आली आहे. त्यानुसार आता घनकचरा विभाग जनरल यांच्याकडे तर बांधकाम विभाग इस्टेट यांच्या अखत्यारित देण्यात आला आहे. महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी हे आदेश जारी केले आहेत. (Naval Kishore Ram IAS)
पवनीत कौर अतिरिक्त आयुक्त (ज) यांचे नियंत्रणाखालील विभाग
१) सामान्य प्रशासन विभाग
२) मुख्य लेखा व वित्त विभाग
३) लेखापरिक्षण विभाग
४) पाणीपुरवठा विभाग व पाणीपुरवठा प्रकल्प
५) घनकचरा व्यवस्थापन विभाग
६) आरोग्य विभाग
७) भवन रचना विभाग
८) अग्निशमन दल व आपत्ती व्यवस्थापन विभाग
९) विधी विभाग
१०) उपायुक्त विशेष विभाग
११) समाज कल्याण विभाग
१२) समाज विकास विभाग
१३) प्राथमिक शिक्षण विभाग
१४) शिक्षणाधिकारी (माध्यमिक व तांत्रिक विभाग)
१५) कामगार कल्याण विभाग
१६) मंडई विभाग
१७) जनरल रेकोर्ड विभाग
१८) तांत्रिक विभाग
१९) प्रशिक्षण प्रबोधिनी विभाग
२०) मागासवर्ग कक्ष
२१) परिमंडळ १ आणि २
पृथ्वीराज बी पी अतिरिक्त आयुक्त (इ) यांचे नियंत्रणाखालील विभाग/ खाती
१. कर आकारणी व कर संकलन
२. बांधकाम विभाग (संपूर्ण नस्ती सह )
३. मलनिस्सारण प्रकल्प (जायका)
४. मलनिस्सारण देखभाल व दुरुस्ती विभाग
५. माहिती व तंत्रज्ञान विभाग
६. प्रकल्प विभाग
७. नदी सुधारणा प्रकल्प
८. विद्युत विभाग
९. सुरक्षा विभाग
१०. पर्यावरण विभाग
११. अतिक्रमण / अनधिकृत बांधकाम निर्मुलन विभाग
१२. आकाशचिन्ह व परवाना विभाग
१३. मोटार वाहन विभाग
१४. जिल्हा नियोजन व विकास समिती विभाग
१५. मुद्रणालय विभाग
१६. नगर सचिव विभाग
१७. परिमंडळ ४ आणि ५
———-
ओमप्रकाश दिवटे अतिरिक्त आयुक्त (वि) यांचे नियंत्रणाखालील विभाग/ खाती
१. पथ विभाग
२. मालमत्ता व व्यवस्थापन विभाग
३. मध्यवर्ती भांडार विभाग
४. टेंडर सेल
५. उद्यान विभाग
६. भूसंपादन व व्यवस्थापन विभाग
७. क्रीडा विभाग
८. निवडणूक विभाग
९. सांस्कृतिक केंद्र विभाग
१०. प्रधानमंत्री आवास योजना
११. एस आर ए
१२. माहिती व जनसंपर्क विभाग
१३. झोपडपट्टी निर्मुलन व पुनर्वसन विभाग, चाळ विभाग
१४. स्थानिक संस्था कर विभाग
१५. जनगणना विभाग
१६. optical fibre इन्फ्रास्ट्रक्चर विभाग
१७. बीएसयुपी सेल
१८. बी ओ टी सेल विभाग
१९. सायकल विभाग
२०. परिमंडळ ३

COMMENTS