Pune PMC News | उरुळी देवाची आणि फुरसुंगी या गावांत पुणे महानगरपालिकेला विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून नियुक्त करावे | माजी नगरसेवकांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
Fursungi – Uruli Devachi Municipality – (The Karbhari News Service) – उरुळी देवाची आणि फुरसुंगी या दोन गावांसाठी नगर रचना योजना पुणे महानगरपालिकेने केली होती. ती राबविण्यासाठी पुणे महानगरपालिकेला विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून नियुक्त करावे. अशी मागणी माजी नगरसेवक उज्ज्वल केसकर, प्रशांत बधे आणि सुहास कुलकर्णी यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडे केली आहे. (Pune Municipal Corporation – PMC)
पुणे महानगरपालिकेच्या हद्दीत समाविष्ट 23 गावांसाठी मेहरबान राज्य शासनाने पीएमआरडीए यांना विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून नियुक्त केले. पीएमआरडीए च्या कार्यक्षेत्रातील 117 गावांसाठी एमएसआरडीसी ( रस्ते विकास महामंडळ) यांना विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून नियुक्त केले.
१) नगर रचना योजना उरुळी देवाची क्रमांक ६ एकूण क्षेत्रफळ 109.78 हेक्टर
२) नगर रचना योजना फुरसुंगी क्रमांक ९ एकूण क्षेत्रफळ 260.67 हेक्टर
३) नगर रचना योजना फुरसुंगी क्रमांक १० एकूण क्षेत्रफळ 238.50 हेक्टर.
या नगर रचना योजनेनुसार नियोजन प्राधिकरणास उरुळी देवाची नगर रचना योजना क्रमांक ६ a) EWS/LIG 0.79 हेक्टर b) गार्डन आणि प्लेग्राउंड 9.49 हेक्टर c) नियोजन प्राधिकरणाचा प्लॉट 5.49 हेक्टर d) रस्त्यासाठीचे क्षेत्रफळ 25.39 हेक्टर असे एकूण 41.16 हेक्टर क्षेत्र विनामोबदला ताब्यात येणार आहे.
फुरसुंगी नगर रचना योजना क्रमांक ९ यात A) EWS/LIG 0.87 हेक्टर B) गार्डन आणि प्लेग्राउंड 4.25 हेक्टर C)नियोजन प्राधिकरणाचा प्लॉट 44.85 हेक्टर (Authority Plot) D)रस्त्यासाठीचे क्षेत्रफळ 53.96 हेक्टर असे एकूण 103.93 हेक्टर क्षेत्र विनामोबदला ताब्यात येणार आहे.
फुरसुंगी नगर रचना योजना क्रमांक १० १) EWS/LIG 3.43 हेक्टर २) गार्डन आणि प्लेग्राउंड 17.84 हेक्टर ३)नियोजन प्राधिकरणाचा प्लॉट (Authority Plot) 19.15 हेक्टर ४) रस्त्यासाठीचे क्षेत्रफळ 51.05 हेक्टर असे एकूण 91.48 हेक्टर क्षेत्र विनामोबदला ताब्यात येणार आहे. म्हणजे एकूण 608.95 हेक्टर मध्ये नियोजन प्राधिकरणाला 235.57 विनामोबदला मिळणार आहे हे सगळे काम कार्यपद्धती पुणे महानगरपालिकेने केलीय.
जवळपास १०४७ कोटी योजनेचा खर्च (बेटरमेंट चार्जेस) देखील पुणे महानगरपालिकेने माफ केला होता. त्यानंतर पुणे महानगरपालिकेतून ही दोन गावे वगळली गेली.
ज्याप्रमाणे पुणे महानगरपालिका हद्दीत समाविष्ट केलेल्या 23 गावांचा विकास आराखडा तयार करण्यासाठी पीएमआरडीए ची नेमणूक केली आणि पीएमआरडीए च्या कार्यक्षेत्रातील 117 गावांचा विकास आराखडा आणि इतर सर्व बाबी तयार करण्यासाठी एमएसआरडीसी ची विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून नेमणूक केली तशीच नेमणूक उरुळी देवाची आणि फुरसुंगी या गावांत पुणे महानगरपालिकेने तयार केलेली नगर विकास योजना राबवण्यासाठी विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून पुणे महानगरपालिकेची नेमणूक करावी. अशी मागणी या नगरसेवकांनी केली आहे.
COMMENTS