Pune PMC News | शेतकरी कर्जमुक्ती योजनेसाठी अपात्र व्यक्तींची माहिती गोळा करण्याचे पुणे महापालिकेचे आदेश | नगरसेवक, २५ हजार रुपयांपेक्षा जास्त एकत्रित मासिक वेतन घेणारे अधिकारी व कर्मचारी अपात्र

Homeadministrative

Pune PMC News | शेतकरी कर्जमुक्ती योजनेसाठी अपात्र व्यक्तींची माहिती गोळा करण्याचे पुणे महापालिकेचे आदेश | नगरसेवक, २५ हजार रुपयांपेक्षा जास्त एकत्रित मासिक वेतन घेणारे अधिकारी व कर्मचारी अपात्र

Ganesh Kumar Mule Jun 20, 2026 3:00 PM

Pune  Mhada | डिजीटल स्वाक्षरीची शहानिशा करुनच सदनिकेचा विक्री करारनामा करण्याचे पुणे म्हाडाचे आवाहन
Pune PMC Retirement | ऑक्टोबर महिन्यात पुणे महापालिकेचे 51 अधिकारी आणि कर्मचारी सेवानिवृत्त 
Pune Metro | पुण्यात मेट्रोचे २०० किमीचे जाळे उभारणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस | पुणे मेट्रो भवनचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन

Pune PMC News | शेतकरी कर्जमुक्ती योजनेसाठी अपात्र व्यक्तींची माहिती गोळा करण्याचे पुणे महापालिकेचे आदेश

| २५ हजार रुपयांपेक्षा जास्त एकत्रित मासिक वेतन घेणारे अधिकारी व कर्मचारी अपात्र

 

PMC Employees and Officers – (The Karbhari News Service) – पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ च्या लाभार्थ्यांची छाननी करण्यासाठी पुणे महापालिकेने अपात्र व्यक्तींची माहिती संकलित करून ती महा आयटी पोर्टलवर अपलोड करण्याचे आदेश दिले आहेत. (PMC Chief Finance and Account Department)

मुख्य लेखा व वित्त विभागाचे उप मुख्य लेखा व वित्त अधिकारी डॉ. कुणाल मंडवाले यांनी यासंदर्भातील परिपत्रक जारी केले आहे. राज्य शासनाने २० जून २०२६ रोजी घेतलेल्या निर्णयानुसार ही कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.

या योजनेअंतर्गत राज्यातील पात्र शेतकऱ्यांना २ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ होणार आहे. तसेच नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहन रक्कम दिली जाणार आहे. मात्र, या योजनेचा लाभ केवळ पात्र लाभार्थ्यांनाच मिळावा यासाठी शासनाने अपात्रतेचे निकष निश्चित केले आहेत.

कोण होणार अपात्र?

१. महापालिका, नगरपालिका व नगरपंचायतचे नगरसेवक

२. २५ हजार रुपयांपेक्षा जास्त एकत्रित मासिक वेतन घेणारे अधिकारी व कर्मचारी. हे या योजनेचा लाभ घेण्यास अपात्र असणार आहेत.

महा आयटी पोर्टलवर माहिती अपलोड करताना काही अधिकारी, कर्मचारी व निवृत्त सेवकांचे आधार क्रमांक आणि मोबाईल क्रमांक उपलब्ध नसल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे ज्यांची आधार व मोबाईल माहिती अद्ययावत नाही, अशा सेवकांची व पेन्शनधारकांची माहिती एक्सेल शीटमध्ये तयार करून  या ईमेल आयडीवर तात्काळ पाठवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

हे परिपत्रक उप आयुक्त, सर्व विभागप्रमुख आणि पीएमपी एम्प्लॉइज युनियन यांना कार्यवाहीसाठी पाठवण्यात आले आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: