Pune PMC Encroachment Drive | पुण्यात एका दिवसात 1.35 लाख चौ. मीटर अतिक्रमण हटवले; 7 क्षेत्रीय कार्यालयांत कारवाई

एका दिवसात पुणे महापालिकेने १ लाख ३५ हजार ८७२ चौरस मीटर क्षेत्रावर अतिक्रमण निर्मूलनाची कारवाई केली.

Homeadministrative

Pune PMC Encroachment Drive | पुण्यात एका दिवसात 1.35 लाख चौ. मीटर अतिक्रमण हटवले; 7 क्षेत्रीय कार्यालयांत कारवाई

Ganesh Kumar Mule Nov 28, 2026 9:04 PM

PMC Encroachment Action | आंबेगाव बु मध्ये सिंहगड कॉलेज जवळील 11 अनधिकृत इमारतीवर महापालिकेकडून कारवाई!
PMC Encroachment Action | मेट्रो च्या जागेतील ५० अनधिकृत झोपड्या हटवल्या | महापालिका आणि मेट्रो प्रशासनाची कारवाई!
Action by PMC on 11 unauthorized buildings near Sinhagad College in Ambegaon

Pune PMC Encroachment Drive | पुण्यात एका दिवसात 1.35 लाख चौ. मीटर अतिक्रमण हटवले; 7 क्षेत्रीय कार्यालयांत कारवाई

 

Pune PMC News – The Karbhari News Service – पुणे महानगरपालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागामार्फत शहरातील विविध क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीत अनधिकृत बांधकामे, व्यावसायिक अतिक्रमणे, पत्र्याचे शेड, फ्रंट मार्जिन, साईड मार्जिन तसेच पदपथांवरील अतिक्रमणांवर कारवाई करण्यात आली. आजच्या मोहिमेत विविध क्षेत्रीय कार्यालयांच्या माध्यमातून एकूण १ लाख ३५ हजार ८७२ चौरस मीटर क्षेत्रफळावर अतिक्रमण निर्मूलनाची कारवाई करण्यात आली. (Pune Municipal Corporation – PMC)

कारवाईमध्ये :

१) वारजे-कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालय – डी.पी. रोड, विठ्ठल मंदिर ते गुलाबराव ताठे पथ तसेच कमिन्स कॉलेज रोड परिसरात रस्त्यालगत, पदपथांवर तसेच फ्रंट व साईड मार्जिनमध्ये असलेल्या अनधिकृत व्यावसायिक अतिक्रमणांवर कारवाई करण्यात आली. यामध्ये एकूण २२,८१४ चौ. मीटर क्षेत्रफळावरील अतिक्रमणे निष्कासित करण्यात आली.

२) वानवडी क्षेत्रीय कार्यालय – परिमंडळ कार्यालय क्रमांक ४ अंतर्गत कोंढवा-उंड्री क्षेत्रीय कार्यालयामार्फत करण्यात आलेल्या संयुक्त कारवाईस मदत करण्यात आली. यामध्ये एकूण ३७,३०० चौ. मीटर क्षेत्रफळावर कारवाई करण्यात आली.

३) बिबवेवाडी क्षेत्रीय कार्यालय – क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत अतिक्रमण निर्मूलनाची कारवाई करण्यात आली.

४) नगर रोड-वाघोली क्षेत्रीय कार्यालय – ढोले पाटील रोड क्षेत्रीय कार्यालयाच्या सहकार्याने मुंढवा येथील बी. टी. कवडे रोड परिसरात बांधकाम विभागामार्फत करण्यात आलेल्या संयुक्त कारवाईस मदत करण्यात आली. यामध्ये एकूण ८,७०० चौ. मीटर क्षेत्रफळावर कारवाई करण्यात आली.

५) धनकवडी-कात्रज-आंबेगाव क्षेत्रीय कार्यालय – परिसरातील अनधिकृत पत्र्याचे शेड, हॉटेल्स, फ्रंट मार्जिन तसेच पदपथांवरील अतिक्रमणे निष्कासित करण्यात आली. यामध्ये एकूण २५,५८८ चौ. मीटर क्षेत्रफळावर कारवाई करण्यात आली.

६) कोंढवा-उंड्री क्षेत्रीय कार्यालय – संयुक्त अतिक्रमण निर्मूलन मोहिमेअंतर्गत विविध ठिकाणी कारवाई करण्यात आली.

७) औंध-बाणेर क्षेत्रीय कार्यालय – परिसरातील अनधिकृत अतिक्रमणे हटविण्यात आली. यामध्ये एकूण ४१,५०० चौ. मीटर क्षेत्रफळावर कारवाई करण्यात आली.

पुणे शहरातील सार्वजनिक रस्ते, पदपथ तसेच नागरिकांच्या दैनंदिन वाहतुकीस अडथळा निर्माण करणारी अनधिकृत अतिक्रमणे हटविण्याची मोहीम पुणे महानगरपालिकेमार्फत सातत्याने राबविण्यात येत असून, शहरातील सार्वजनिक जागा अतिक्रमणमुक्त ठेवण्यासाठी आवश्यक ती कारवाई करण्यात येत आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: