PMC Recruitment | ‘पुणे मनपा भरतीसाठी दलालांना पैसे देऊ नका’ |  महापालिकेचे नागरिकांना आवाहन 

Homeadministrative

PMC Recruitment | ‘पुणे मनपा भरतीसाठी दलालांना पैसे देऊ नका’ | महापालिकेचे नागरिकांना आवाहन 

Ganesh Kumar Mule May 23, 2026 8:32 AM

PMC Recruitment Portal | महापालिकेच्या सर्व प्रकारच्या भरतीसाठी ऑनलाइन पोर्टल अंतिम टप्प्यात | बनावट भरती रॅकेटविरोधात कठोर कारवाईचे श्रीनाथ भिमाले यांचे निर्देश
Pune PMC JE Recruitment | राज्य सरकारच्या मार्गदर्शना अभावी दिड वर्षापासून थांबलीय कनिष्ठ अभियंता सरळसेवा भरती प्रक्रिया! | अर्ज केलेल्या २७८७९ उमेदवारांचे काय होणार?
Pune PMC News | पुणे महापालिकेत बनावट नियुक्तीपत्राला चाप; ५ जूनपासून ‘क्यूआर कोड’ प्रणाली

PMC Recruitment | ‘पुणे मनपा भरतीसाठी दलालांना पैसे देऊ नका’; महापालिकेचे नागरिकांना आवाहन

|  अतिरिक्त आयुक्त प्रजित नायर यांचे जाहीर प्रकटन

 

Pune PMC News -(The Karbhari News Service) – पुणे महानगरपालिकेतील नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्या टोळ्यांपासून सावध राहण्याचे आवाहन मनपा प्रशासनाने केले आहे. ‘कायम नोकरी लावून देतो’ असे सांगून पैसे उकळणाऱ्या दलालांच्या जाळ्यात अडकू नका, असा इशारा अतिरिक्त महापालिका आयुक्त प्रजित नायर यांनी जाहीर प्रकटनाद्वारे दिला आहे. (Prajit Nair IAS)

मनपा प्रशासनाकडून विविध पदांच्या भरतीसाठी वेळोवेळी स्थानिक दैनिकांत जाहिरात दिली जाते. तसेच https://www.pmc.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर आणि https://www.pmc.gov.in/b/recruitment या लिंकवर सविस्तर माहिती प्रसिद्ध करून ऑनलाइन अर्ज मागवले जातात. संपूर्ण भरती प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने राबवली जाते, असे प्रकटनात स्पष्ट केले आहे.

 

‘कायम नोकरी मिळेल’ असे सांगणारे दावे पूर्णपणे खोटे आहेत. कंत्राटी कर्मचारीदेखील विशिष्ट कालावधीसाठीच नेमले जातात. त्यांना कायम करण्याचा कोणताही अधिकृत प्रस्ताव किंवा योजना अस्तित्वात नाही, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

कोणी व्यक्ती नोकरीसाठी खोटे दावे करत असेल, पैसे मागत असेल किंवा खोटी माहिती देत असेल तर तात्काळ संबंधित विभागाला कळवावे. कोणत्याही मध्यस्थ, दलाल, परिचित वा अपरिचित व्यक्तीशी आर्थिक व्यवहार करू नये. अशा फसवणुकीस मनपा प्रशासन जबाबदार राहणार नाही, याची नोंद घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

 

मनपातील कर्मचारी भरती करायची झाल्यास त्याबाबतची संपूर्ण माहिती अधिकृत दैनिक वर्तमानपत्रांत व मनपाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाते. नागरिकांनी व उमेदवारांनी फक्त अधिकृत संकेतस्थळावर जाऊनच माहिती घ्यावी, असे प्रकटनात नमूद आहे.  अधिक माहितीसाठी पुणे महानगरपालिकेच्या https://www.pmc.gov.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: