Pune News | राज्य रिंग टेनिस संघटनेच्या अध्यक्षपदी मोहन जोशी | महासचिवपदी अनिल वरपे यांची फेरनिवड

HomeBreaking News

Pune News | राज्य रिंग टेनिस संघटनेच्या अध्यक्षपदी मोहन जोशी | महासचिवपदी अनिल वरपे यांची फेरनिवड

Ganesh Kumar Mule May 28, 2026 1:09 PM

Pune Development Projects | पुण्यातील विकासप्रकल्पांना गती देण्याचे भाजपचे मंत्री मोहोळ आणि पाटील यांचे महापालिका प्रशासनाला निर्देश! 
Water Cut In Pune | गुरुवारी बंद ठेवल्या जाणाऱ्या पाणी पुरवठ्याबाबत खासदार सुप्रिया सुळे यांनी ही केली मागणी!
PMC Draft Ward Structure 2025 | प्रारूप प्रभाग रचनेचे पुणे महापालिका वेबसाईट (PMC Website) वरून जवळपास 60 हजार लोकांनी नकाशे केले डाऊनलोड!

Pune News | राज्य रिंग टेनिस संघटनेच्या अध्यक्षपदी मोहन जोशी | महासचिवपदी अनिल वरपे यांची फेरनिवड

 

Pune News – (The Karbhari News Service) – टेनीकॉईट (रिंग टेनिस) असोसिएशन, महाराष्ट्र या संघटनेच्या सर्वसाधारण सभेत अध्यक्षपदी माजी आमदार मोहन जोशी आणि महासचिवपदी अनिल वरपे यांची एकमताने फेरनिवड करण्यात आली.

संघटनेची सर्वसाधारण सभा नुकतीच पुण्यात झाली. या सभेत अध्यक्ष, महासचिव यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकारीणी निवडण्यात आली.

त्यात कार्याध्यक्ष – सौ.राजश्री हेमंत पाटील (नांदेड), वरीष्ठ उपाध्यक्ष प्रा.डॉ.अभिजीत वर्णिले (कोल्हापूर), खजिनदार – ॲड.बांडेबुचे (भंडारा), उपाध्यक्ष – संजय शिंदे (वाशिम), बिभीषण पाटील (धाराशिव), सहसचिव – शरद वाबळे (मुंबई उपनगर), प्रा.डॉ. मयुर ठाकरे (नंदुरबार), डॉ.संदीप जगताप (छत्रपती संभाजीनगर), सहखजिनदार – चंद्रकांत पिंपळे (पुणे), कार्यकारीणी सदस्य: अशोक ठोकळ (अकोला), पी.जे.चांद (जालना), स्नेहा खोंड (नागपूर), प्रा.बाबासाहेब गायकवाड (अहिल्या नगर) यांचा समावेश आहे.

टेनीकॉईट फेडरेशन ऑफ इंडिया चे जनरल सेक्रेटरी एम.आर.दिनेश कुमार (पॉंडेचेरी) सभेत निरीक्षक म्हणून उपस्थित होते. त्यांनी नूतन पदाधिकारी आणि कार्यकारीणीला शुभेच्छा दिल्या. या सभेत टेनीकॉईट (रिंग टेनिस) खेळाचा वार्षिक कार्यक्रम ठरविण्यात आला.

रिंग टेनिस हा खेळ गावपातळीपर्यंत पोहोचविण्याचा आणि या खेळातील खेळाडुंच्या भवितव्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करण्याचा मनोदय माजी आमदार मोहन जोशी यांनी व्यक्त केला.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: