PMC Recruitment Portal | महापालिकेच्या सर्व प्रकारच्या भरतीसाठी ऑनलाइन पोर्टल अंतिम टप्प्यात  | बनावट भरती रॅकेटविरोधात कठोर कारवाईचे श्रीनाथ भिमाले यांचे निर्देश

Homeadministrative

PMC Recruitment Portal | महापालिकेच्या सर्व प्रकारच्या भरतीसाठी ऑनलाइन पोर्टल अंतिम टप्प्यात | बनावट भरती रॅकेटविरोधात कठोर कारवाईचे श्रीनाथ भिमाले यांचे निर्देश

Ganesh Kumar Mule Jul 02, 2026 7:57 PM

Pune Rajaram Bridge | राजाराम पुलाची दुरुस्ती सुरू | वाहतुक कधी राहणार बंद! जाणून घ्या
BJP Mahila Morcha Pune | महिला सुरक्षेविषयी पोलिसांनी कठोर पावले उचलावीत | हर्षदा फरांदे
Maharashtra Cabinet Meeting Decisions | राज्य मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय जाणून घ्या

PMC Recruitment Portal | महापालिकेच्या सर्व प्रकारच्या भरतीसाठी ऑनलाइन पोर्टल अंतिम टप्प्यात

| बनावट भरती रॅकेटविरोधात कठोर कारवाईचे श्रीनाथ भिमाले यांचे निर्देश

 

PMC Standing Committee – (The Karbhari News Service)  – पुणे महापालिकेत नोकरी लावण्याच्या नावाखाली बनावट लेटरपॅड, शिक्के, लोगो आणि नियुक्तीपत्रांचा वापर करून बेरोजगार तरुण-तरुणींची फसवणूक झाल्याच्या प्रकाराची सखोल चौकशी करून संपूर्ण भरती प्रक्रियेचे विशेष लेखापरीक्षण (ऑडिट) करण्यात यावे. तसेच महापालिकेतील सर्व प्रकारच्या भरतीसाठी एकच अधिकृत ऑनलाइन पोर्टलची निर्मिती अंतिम टप्प्यात असल्याची माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी दिली. (Shrinath Bhimale PMC)

महापालिकेच्या नावाने सुपरवायझर व इतर पदांवर नोकरी देण्याचे आमिष दाखवून अनेक उमेदवारांकडून मोठ्या प्रमाणात पैसे उकळल्याचे प्रकार समोर आले आहेत. यामध्ये महापालिकेचा लोगो, बनावट लेटरपॅड, शिक्के आणि बनावट जॉईनिंग लेटरचा वापर करण्यात आल्याने महापालिकेच्या भरती प्रक्रियेच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर स्थायी समितीने प्रशासनाकडून सविस्तर अहवाल मागविला आहे.

बैठकीत या संपूर्ण प्रकरणाची तातडीने चौकशी करून दोषींविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले. तसेच महापालिकेच्या नावाने काम करणाऱ्या सर्व कंत्राटी एजन्सी, त्यांचे करार, संपर्क तपशील आणि अधिकृत भरती प्रक्रिया सार्वजनिक करण्यास सांगण्यात आले. प्रत्येक नियुक्तीपत्रावर क्यूआर कोड किंवा युनिक व्हेरिफिकेशन नंबर देण्याची प्रणाली विकसित करण्याचेही निर्देश देण्यात आले.

महापालिकेच्या सर्व कंत्राटी आणि इतर भरती प्रक्रियेचे विशेष लेखापरीक्षण करून भरती प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी कायमस्वरूपी डिजिटल यंत्रणा उभारण्यात येणार आहे. यासाठी सर्व प्रकारच्या भरतीसाठी एकच अधिकृत ऑनलाइन पोर्टल लवकरच सुरू करण्यात येणार असून, उमेदवारांना अर्जापासून नियुक्तीपर्यंतची संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन आणि पडताळणीयोग्य स्वरूपात उपलब्ध करून दिली जाईल, अशी माहिती श्रीनाथ भिमाले यांनी दिली.

याशिवाय, महापालिकेच्या नावाने कोणत्याही एजन्सीमार्फत उमेदवारांकडून पैसे घेतल्याचे आढळल्यास संबंधित एजन्सीला तात्काळ काळ्या यादीत टाकणे, सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांसाठी डिजिटल ओळख प्रणाली सुरू करणे, तसेच “महापालिकेत नोकरीसाठी कोणालाही पैसे देऊ नका” अशी व्यापक जनजागृती मोहीम राबविण्याचे निर्देशही प्रशासनाला देण्यात आले.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: