Pune PMC News | पुणे महापालिकेची फसवणूक करणाऱ्या ठेकेदारावर गुन्हा दाखल करून काळ्या यादीत टाकण्याची मागणी   | भाजप शहर उपाध्यक्ष तुषार पाटील यांचा आंदोलनाचा इशारा

Homeadministrative

Pune PMC News | पुणे महापालिकेची फसवणूक करणाऱ्या ठेकेदारावर गुन्हा दाखल करून काळ्या यादीत टाकण्याची मागणी | भाजप शहर उपाध्यक्ष तुषार पाटील यांचा आंदोलनाचा इशारा

Ganesh Kumar Mule Feb 07, 2025 7:58 PM

PMC 75th Anniversary | पुणे आणि पिंपरी महापालिका यांच्यात रंगणार क्रिकेट सामना! | महापालिकेच्या वर्धापनदिना निमित्त अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन
Dr Siddharth Dhende | प्रभाग क्रमांक दोन मधील लुंबिनी बाल स्नेही उद्यानाची निर्मिती | माजी उपहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांचा यशस्वी पुढाकार
PMC Sport Scholarship | पुणे शहरातील खेळाडूंसाठी चांगली बातमी | दोन वर्षांची क्रीडा शिष्यवृत्ती एकत्रच दिली जाणार | महापालिका क्रीडा विभागाने मागवले अर्ज

Pune PMC News | पुणे महापालिकेची फसवणूक करणाऱ्या ठेकेदारावर गुन्हा दाखल करून काळ्या यादीत टाकण्याची मागणी

| भाजप शहर उपाध्यक्ष तुषार पाटील यांचा आंदोलनाचा इशारा

 

Tushar Patil BJP – (The Karbhari News Service) – पुणे मनपाच्या मध्यवर्ती भांडार कार्यालय (PMC Central Store Department) मार्फत घनकचरा व्यवस्थापन विभागाकडील मागणीनुसार 2018-19 सालासाठी देवाची उरूळी फुरसुंगी कचरा डेपो परिसरात फवारणी करीता माशी प्रतिबंधक इमिडाक्लोरोप्रिड (0.5 RB) डी. डी. व्ही. पी. (डायक्लोरेंस 76 % ई.सी.) व सायपोनोथ्रीन (5% ई.सी.) पुरविणे या कामी मे कोलेक्स इंडस्ट्रीज तर्फे स्वामिनाथ कोळळे या ठेकेदाराने मध्यवर्ती भांडार कार्यालयकडील अधिकारी यांचे फसवणूक व दिशाभूल करून पुणे महानगरपालिकेचे 36,00,000/- आर्थिक नुकसान केले आहे. असा आरोप भाजप शहर उपाध्यक्ष तुषार पाटील (Tushar Patil BJP) यांनी केला आहे. तसेच कीटकनाशक कायदा चा भंग केला असून त्यांच्या वर महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम नियमानुसार कडक कारवाई करत महापालिकेची फसवणूक केल्यामुळे गुन्हा दाखल करून काळ्या यादीत टाकण्याची मागणी देखील पाटील यांनी केली आहे. पाटील यांनी पुढे म्हटले आहे की, महापालिकेचे नुकसान करूनही आता तोच ठेकेदार दुसऱ्या कामात सहभागी होत आहे. याची गंभीर दखल महापालिका आयुक्तांनी घ्यावी, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा पाटील यांनी दिला आहे. (Pune Municipal Corporation – PMC)

पाटील यांच्या निवेदना नुसार घनकचरा व्यवस्थापन विभागाकडील मागणीनुसार 2018-19 सालासाठी देवाची उरूळी फुरसुंगी कचरा डेपो परिसरात फवारणी करीता माशी प्रतिबंधक इमिडाक्लोप्रिड (0.5 RB) डी. डी. व्ही. पी. (डायक्लोरेंस 76% ई.सी.) व सायपोनोथ्रीन (5% ई.सी.) पुरविणे याकामी मध्यवर्ती भांडार कार्यालय मार्फत निविदा प्रक्रिया राबविण्यात आली होती. निविदेमध्ये मे. कोलेक्स इंडस्ट्रीज हे सर्वात कमी दराचे ठेकेदार असून त्यांना मध्यवर्ती भांडार कार्यालय मार्फत पुरवठा करणे कामी कार्यादेश देण्यात आले होते.

कोलेक्स इंडस्ट्रीज यांनी डी. डी. व्ही. पी. (डायक्लो रेंस 76% ई.सी.) या कीटकनाशकाचा नमुना 10012308120182019 तपासणी प्रयोगशाळा येथे तपासणीसाठी पाठविला असता सदर नमुना अप्रमाणीत व विनापरवाना पुरवठा केल्याचे आढळून आलेले आहे.

अप्रमाणित कीटकनाशकाचा विनापरवाना पुरवठा करून कीटकनाशक कायदा १९६८ मधील भाग 3 के, 13 (1), 17 व 18 व कीटकनाशक नियम 1971 मधील नियम 10, 18 व 19 चा भंग केला आहे. कोलेक्स इंडस्ट्रीज तर्फे श्री. स्वामीनाथ सिद्धांता कोळळे यांनी सदर कीटकनाशकाचा विनापरवाना पुरवठा केल्याचे मान्य असल्याचे सांगितले व तसे लेखी खुलाशामध्ये सादर केले आहे. तसेच मे.कोलेक्स इंडस्ट्रीज तर्फे श्री. स्वामीनाथ सिद्धांता कोळळे यांनी त्यांना देण्यात आलेल्या विक्री परवाना क्र LAID10020788 रद्द करण्यात येत आहे व सदरचा मूळ परवाना जिल्हा अधिक्षक कृषी कार्यालय येथे दोन दिवसात जमा करावा असे आदेश पारित करण्यात आले होते.

पाटील यांनी पुढे म्हटले आहे कि या निकाला मधून सिद्ध होते की, मे. कोलेक्स इंडस्ट्रीज यांनी डी. डी. व्ही. पी. (डायक्लोरेंस 76 % ई.सी.) या कीटकनाशकाचा अप्रमाणित व विनापरवाना पुरवठा केल्याचे मान्य असल्याचे सांगितले असून त्यांनी मध्यवर्ती भांडार कार्यालयकडील अधिकारी यांचे फसवणूक व दिशाभूल करून पुणे महानगरपालिकेचे रक्कम रुपये 36,00,000/- लक्षाचे आर्थिक नुकसान करून कीटकनाशक कायदा 1968 मधील भाग 3 के, 13 (1), 17 व 18 व कीटकनाशक नियम 1971 मधील नियम 10,18 व 19 चा भंग केला आहे.

त्यामुळे संबंधित ठेकेदारावर गुन्हा दाखल करून कायमस्वरूपी काळ्या यादीत टाकावे आणि महानगरपालिकेचे फसवणूक केली म्हणून 36,00,000/- यांचे कडून त्यांनी भरलेल्या निविदापैकी संपूर्ण वसूल करणेस व त्यांची संपुर्ण कामे थांबिविण्यात यावे. तसेच2018 पासून ते त्याच्या पुढील सर्व निविदामध्ये पुणे महानगरपालिकेमध्ये मे. कोलेक्स इंडस्ट्रीज, पुणे तर्फे प्रो. प्रा श्री. स्वामिनाथ कोळळे या नावाने भरलेली सर्व निविदा अपात्र करण्यात यावी. तसे न केल्यास आपल्या कार्यालया बाहेर आंदोलन करण्यात येईल. असा इशारा पाटील यांनी दिला आहे.
—-

या प्रकरणाची फाईल आम्ही मागवली आहे. याची तपासणी करून पुढील कार्यवाही आम्ही करू.

किशोरी शिंदे, उपायुक्त, मध्यवर्ती भांडार कार्यालय.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0