Pune PMC News | नाले सफाई व कल्व्हर्ट कामांचा आढावा; मान्सूनपूर्व कामे गतीने पूर्ण करण्याचे अतिरिक्त आयुक्त प्रजित नायर यांचे निर्देश  

Homeadministrative

Pune PMC News | नाले सफाई व कल्व्हर्ट कामांचा आढावा; मान्सूनपूर्व कामे गतीने पूर्ण करण्याचे अतिरिक्त आयुक्त प्रजित नायर यांचे निर्देश  

Ganesh Kumar Mule Jun 03, 2026 6:51 PM

Dr. Siddharth Dhende | पोतराजचे काम करणाऱ्या विक्रमच्या आयुष्यात लागणार ‘शिक्षणाचा दिवा’ | माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी उचलली शिक्षणाची जबाबदारी
NCP-SCP Pune | राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा वर्धापन दिन पुण्यात साजरा होणार | पुणे महानगरपालिकेवर पक्षाचा झेंडा फडकेल असा शहर अध्यक्षांचा विश्वास 
Pune PMC 32 Villages Committee | समाविष्ट 32 गावांच्या लोकप्रतिनिधींच्या समितीत अजून तीन सदस्य  | जाणून घ्या नवीन सदस्य  

Pune PMC News | नाले सफाई व कल्व्हर्ट कामांचा आढावा; मान्सूनपूर्व सर्व कामे गतीने पूर्ण करण्याचे अतिरिक्त आयुक्त प्रजित नायर यांचे निर्देश

 

Prajit Nair IAS – (The Karbhari News Service) – महापालिका आयुक्त (इस्टेट)  प्रजित नायर यांच्या अध्यक्षतेखाली सर्व परिमंडळ उपायुक्त, क्षेत्रीय कार्यालयांचे सहाय्यक आयुक्त व संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांची आढावा बैठक आयोजित करण्यात आली.

बैठकीत शहरातील विविध भागांमध्ये सुरू असलेल्या नाले रुंदीकरण, खोलीकरण, गाळ काढणे, कल्व्हर्ट दुरुस्ती व बांधकाम, जलनिस्सारण व्यवस्थेची क्षमता वाढविणे तसेच पूरजन्य परिस्थिती टाळण्यासाठी हाती घेण्यात आलेल्या कामांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. प्रत्येक परिमंडळनिहाय कामांची सद्यस्थिती, प्रलंबित बाबी, अडचणी आणि त्यावरील उपाययोजनांबाबत चर्चा करण्यात आली. (Pune Municipal Corporation – PMC)

अतिरिक्त महापालिका आयुक्त (इस्टेट)  प्रजित नायर यांनी सर्व संबंधित अधिकाऱ्यांना मान्सूनपूर्व नियोजित कामे वेळेत व दर्जेदार पद्धतीने पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. ज्या ठिकाणी कामांची गती अपेक्षेपेक्षा कमी आहे, तेथे आवश्यक मनुष्यबळ व यंत्रसामग्री उपलब्ध करून कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले.

तसेच, पुढील आठवड्यापासून विविध क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीतील नाले व कल्व्हर्ट कामांची प्रत्यक्ष स्थळपाहणी करण्यात येणार असून, सुरू असलेल्या कामांच्या गुणवत्तेची व प्रगतीची तपासणी करण्यात येणार असल्याचे मा. अतिरिक्त महापालिका आयुक्त (इस्टेट) श्री. प्रजित नायर यांनी सांगितले. प्रत्यक्ष पाहणीदरम्यान आढळून येणाऱ्या त्रुटी तात्काळ दूर करून नागरिकांना पावसाळ्यात कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही, यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे, असे निर्देशही त्यांनी दिले.

पुणे महानगरपालिका शहरातील पूरस्थिती टाळणे, पावसाच्या पाण्याचा सुरळीत निचरा होणे आणि नागरिकांची सुरक्षितता सुनिश्चित करणे यासाठी विविध विभागांच्या माध्यमातून नियोजनबद्ध कामे राबवत असून, सर्व संबंधित यंत्रणांनी कामांच्या अंमलबजावणीत अधिक गती आणावी, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

याप्रसंगी, परिमंडळ अधिकारी उपायुक्त  विजयकुमार थोरात,  उपायुक्त अरविंद माळी,  उपायुक्त . माधव जगताप,  उपायुक्त . अविनाश सकपाळ,  उपायुक्त  आशा राऊत, गणेश सोनुने आपत्ती व्यवस्थापन प्रमुख, क्षेत्रीय कार्यालयांचे सहाय्यक आयुक्त व संबंधित अधिकारी उपस्थित होते.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: