PMC Employees – Officers | मनपा अधिकारी-कर्मचाऱ्यांना ५ जून ला किमान १  रोप लावणे बंधनकारक | महापालिका आयुक्तांचे आदेश जारी 

Homeadministrative

PMC Employees – Officers | मनपा अधिकारी-कर्मचाऱ्यांना ५ जून ला किमान १  रोप लावणे बंधनकारक | महापालिका आयुक्तांचे आदेश जारी 

Ganesh Kumar Mule Jun 03, 2026 8:40 PM

Marathi Language Policy  | मराठी भाषा धोरणाचा मसूदा शासनास सादर
Pune Property Tax | PT-3 application deadline is 30th November | Relief for Pune residents
Municipal Elections | महापालिका निवडणुका बाबतची सुनावणी पुन्हा पुढे ढकलली

PMC Employees – Officers | मनपा अधिकारी-कर्मचाऱ्यांना ५ जून ला किमान १  रोप लावणे बंधनकारक | महापालिका आयुक्तांचे आदेश जारी

| ‘हरित पुणे, समृद्ध पुणे’ मोहिमेंतर्गत मनपाकडून १ लाख ७०  हजार वृक्षलागवडीचे सर्व विभागांना उद्दिष्ट वाटप

 

Pune PMC News – (The Karbhari News Service) –  पुणे शहराच्या पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी व शहराचे तापमान आटोक्यात आणण्यासाठी महापालिकेने ‘हरित पुणे, समृद्ध पुणे’ ही वृक्षलागवड मोहीम हाती घेतली आहे.  २०२६-२०२७ या कालावधीत मनपाच्या विविध विभागांमार्फत १ लाख ७०  हजार वृक्षांची लागवड करण्याचे उद्दिष्ट महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी निश्चित केले आहे. तसेच सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्याना ५ जून रोजी किमान १ रोप लावणे बंधन कारक करण्यात आले आहे. याबाबतचे आदेश जारी करण्यात आले आहेत. (Naval Kishore Ram IAS)

कोणत्या विभागाला किती उद्दिष्ट?

ऑक्टोबर २०२६ अखेर या सर्व विभागांनी मिळून १,७० ,००० वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट पूर्ण करायचे आहे.

विभागनिहाय उद्दिष्ट पुढीलप्रमाणे:

सर्व क्षेत्रीय कार्यालये – वृक्ष प्राधिकरण विभाग: ७५,०००

पथ विभाग: १५,०००

भवन विभाग: १५,०००

प्रकल्प विभाग: १५,०००

मलनि:स्सारण विभाग: १५,०००

पाणी पुरवठा विभाग: १०,०००

शालेय शिक्षण विभाग : ५०००

घनकचरा व्यवस्थापन: ५०००

उद्यान विभाग: ५ ०००

अधिकारी-कर्मचाऱ्यांना १  रोपांचे बंधन

या मोहिमेंतर्गत पुणे महापालिकेतील सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी  ५ जून ला किमान १ रोपाची लागवड करून त्यांचे संवर्धन करावे, असे आदेश आयुक्तांनी दिले आहेत.  तसेच पुढील २ वर्ष त्याचे संगोपन झाड कसे वाढेल, याची काळजी घ्यायची आहे.

प्रत्येक विभागाने केलेल्या वृक्षलागवडीची साप्ताहिक माहिती ‘परिशिष्ट-अ’ प्रपत्रात भरून दर सोमवारी महापालिका आयुक्त व सदस्य सचिव, वृक्ष प्राधिकरण यांच्याकडे सादर करावी, असे आदेशात नमूद आहे. परिशिष्ट-अ मध्ये वृक्ष लागवड करणाऱ्याचे नाव, दिनांक, ठिकाण, प्रजातीचे नाव, रोपांचे नाव व संख्या, जीपीएस फोटो व गुगल लिंकसह माहिती द्यावी लागणार आहे.

नागरिकांनाही आवाहन

‘पुणे शहर हरित करण्याच्या दृष्टीने नागरिक, स्वयंसेवी संस्था तसेच तज्ज्ञ मंडळींनीही वृक्षलागवड मोहिमेत सहभागी होऊन महापालिकेला सहकार्य करावे,’ असे आवाहन आयुक्त राम यांनी केले आहे.
शहराचे वाढते तापमान व पर्यावरणाचा ऱ्हास रोखण्यासाठी ही मोहीम महत्त्वाची मानली जात आहे. प्रत्येक विभागाने विशेष अभियान राबवून दिलेले उद्दिष्ट पूर्ण करावे, असेही आदेशात स्पष्ट केले आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: