Dr Rajendra Bhosale IAS | पुणे मनपा आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांच्या कामाची चौकशी करा | राज्य सरकारकडे मागणी

Homeadministrative

Dr Rajendra Bhosale IAS | पुणे मनपा आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांच्या कामाची चौकशी करा | राज्य सरकारकडे मागणी

Ganesh Kumar Mule May 29, 2025 6:31 PM

HSRP Number Plate | HSRP नंबरप्लेटची सक्ती रद्द करण्यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने निषेध आंदोलन
MLA Sunil Tingre | Porwal road | अखेर पोरवाल रस्त्यांच्या पर्यायी रस्त्यांचा मार्ग मोक़ळा | आमदार सुनिल टिंगरे यांच्या प्रयत्नांना यश
PMC Water Supply Department | पाण्याच्या टँकरमुळे होत असलेल्या अपघाता बाबत महापालिका पाणीपुरवठा विभागाने जारी केली नियमावली! 

Dr Rajendra Bhosale IAS | पुणे मनपा आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांच्या कामाची चौकशी करा

| राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते प्रशांत जगताप यांची राज्य सरकारकडे मागणी

 

PMC Commissioner – (The Karbhari News Service) – पुणे महापालिका आयुक्त  डॉ. राजेंद्र भोसले (Dr Rajendra Bhosale IAS) यांच्या नियुक्तीपासून  २९ मे २०२५ पर्यंत त्यांनी घेतलेल्या सर्व आर्थिक व धोरणात्मक निर्णयांची श्वेतपत्रिका राज्य सरकारने जाहीर करावी. अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते तथा पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप (Prashant Jagtap Pune) यांनी राज्य सरकारकडे केली आहे. तशा आशयाचे पत्र त्यांनी मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis), उपमुख्यमंत्री  अजितदादा पवार (DCM Ajit Pawar) व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (DCM Eknath Shinde) यांना दिले आहे. (Pune Municipal Corpaotion – PMC)

दीड वर्षांपूर्वी डॉ. राजेंद्र भोसले यांची राज्य सरकारने पदोन्नतीने पुणे महानगरपालिकेच्या आयुक्त पदी नियुक्ती केली. या दीड वर्षांच्या कार्यकाळात पुणे महानगरपालिकेत लोकनियुक्त प्रतिनिधी नसताना व आवश्यकता नसताना हजारो कोटिंचे अनावश्यक टेंडर काढून अनेक चुकीचे धोरणात्मक निर्णय घेतले. या धोरणशून्य निर्णयांचा त्रास आज समस्त पुणेकरांना सहन करावा लागत आहे व पुढील अनेक वर्षे याचे विपरीत परिणाम पुणे शहरात उद्भवणार आहेत. असा आरोप जगताप यांनी केला आहे.

एखाद्या अधिकाऱ्याच्या जागी दुसऱ्या अधिकाऱ्याची नियुक्ती झाल्यानंतर मावळत्या अधिकाऱ्यांनी कोणतेही धोरणात्मक निर्णय घेऊ नये असा संकेत आहे. अशा परिस्थितीत पुणे महनगरपालिकेच्या आयुक्त पदी नवल किशोर राम (Naval Kishor Ram IAS) यांची नियुक्ती झालेली असतानाही मावळते आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी सर्व संकेत पायदळी तुडवत स्थायी समिती तथा मुख्य सभेच्या तातडीच्या बैठका आयोजित करून शेकडो कोटी रुपयांचे टेंडर मान्य केले आहेत, महानगरपालिकेच्या दक्षता समितीने आक्षेप घेतलेल्या प्रकरणांनाही त्यांनी मान्यता दिली आहे. या सर्व नियमबाह्य गोष्टींना पायबंद घालण्यासाठी डॉ. राजेंद्र भोसले यांनी मागील महिनाभरात घेतलेल्या सर्व निर्णयांची चौकशी करावी तथा त्या सर्व निर्णयान स्थगिती देन्यात यावी अशी मागणीही प्रशांत जगताप यांनी केली आहे.

याबाबत लोकयुक्ताकड़ें तक्रार दाखल करण्यात आली असून, चौकशी न झाल्यास आम्ही न्यायालयात जाऊ, असा इशारा प्रशांत जगताप यांनी दिला आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: