Pune Rain | पावसाळ्याचे बळी की गैरवस्थापनाचे बळी — प्रशासनाच्या अपयशावर युवक काँग्रेसचे राज्य सरचिटणीस प्रथमेश आबनावे यांचा संतप्त सवाल

Homeadministrative

Pune Rain | पावसाळ्याचे बळी की गैरवस्थापनाचे बळी — प्रशासनाच्या अपयशावर युवक काँग्रेसचे राज्य सरचिटणीस प्रथमेश आबनावे यांचा संतप्त सवाल

Ganesh Kumar Mule May 28, 2025 10:02 PM

Sunil Shinde on Contract Employees | महापालिका अर्थसंकल्पात कंत्राटी कामगारांकडे दुर्लक्ष | काँग्रेस चे स्वीकृत नगरसेवक सुनील शिंदे यांची टीका
Voter List Mistakes |मतदार यादीमधील चुका दुरुस्त करा | माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
All Sets High School 10th Results | ऑल सेट्स हाय स्कूल चा दरवर्षीप्रमाणे 100% टक्के निकाल!

Pune Rain | पावसाळ्याचे बळी की गैरवस्थापनाचे बळी — प्रशासनाच्या अपयशावर  युवक काँग्रेसचे राज्य सरचिटणीस प्रथमेश आबनावे यांचा संतप्त सवाल

 

Pune Rain News – (The Karbhari News Service) – पुण्यात दोन दिवसांत पावसामुळे झाड कोसळून दोन निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाल्याने संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे. या घटनांमागे निसर्ग नव्हे, तर पुणे महानगरपालिकेचे अपयशी नियोजन जबाबदार असल्याचा आरोप महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे राज्य सरचिटणीस प्रथमेश आबनावे यांनी केला आहे. (Prathmesh Abnave  Congress)

निलायम टॉकीजसमोर शुभदा सप्रे आणि अलंकार पोलीस ठाण्याजवळ राहुल जोशी या दोघांचा मृत्यू झाड कोसळून झाला. या पार्श्वभूमीवर आबनावे यांनी प्रशासनाला थेट जाब विचारला आहे.

“ही पावसाची बळी आहेत का? की महापालिकेच्या ढिसाळ नियोजनाची बळी आहेत?”

जवाबदार कोण? – युवक काँग्रेसचा थेट सवाल

आबनावे यांनी विचारले की:

ही जबाबदारी कोण घेणार?

➡️ पुण्याचे खासदार आणि केंद्रीय मंत्री?
➡️ पालिकेचे आयुक्त?
➡️ पुण्याचे पालकमंत्री?
➡️ शहरातील निवडून आलेले आठ आमदार?
➡️ नगरविकास खाते सांभाळणारे उपमुख्यमंत्री?

“पावसाळ्यापूर्वीची झाडांची छाटणी, नालेसफाई, ड्रेनेज व्यवस्थापन याकडे संपूर्ण दुर्लक्ष केलं जात आहे. याचा थेट परिणाम म्हणजे पुणेकरांच्या जीवितावर उठलेला घाला,” असे ते म्हणाले.

आंबील ओढा: विस्मरणात गेलेली पूरवेदना

२०१९ मध्ये आंबील ओढा परिसरात आलेल्या भीषण पुरात २६ नागरिकांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर महापालिकेने पूर प्रतिबंधासाठी विविध उपाययोजना आणि २०० कोटी रुपयांचा निधी जाहीर केला होता. मात्र सहा वर्षांनंतरही सीमा भिंती, नाल्यांचे विस्तारीकरण, अतिक्रमण हटाव, कल्वर्ट उंचीकरण अशी कोणतीही कामे पूर्णपणे पार पडलेली नाहीत.

२०० कोटी निधीचा ठावठिकाणा नाही!

युवक काँग्रेसने स्पष्ट केला की, २०० कोटी निधी मंजूर झाला असल्याचा दावा वारंवार करण्यात आला, पण प्रत्यक्षात तो निधी कुठे गेला हे स्पष्ट नाही.

➡️ तो केंद्राकडून राज्याकडे आला का?
➡️ राज्याकडून महापालिकेला देण्यात आला का?
➡️ की तो कुठेतरी वळवण्यात आला?

“पुणेकरांचा हक्काचा निधी हवेत विरला आहे का? की तोही केवळ घोषणाबाजीसाठी वापरला गेला?” — असा गंभीर सवाल आबनावे यांनी उपस्थित केला.

युवक काँग्रेसचा स्पष्ट इशारा

युवक काँग्रेसने स्पष्टपणे सांगितले की, जर यापुढे पावसामुळे पूरपरिस्थिती निर्माण होऊन जीवित अथवा मालमत्तेचे नुकसान झाले, तर पूर्ण जबाबदारी ही पुणे महानगरपालिका, राज्य प्रशासन आणि संबंधित खात्यांची असेल.

“उत्तर मिळालंच पाहिजे — अन्यथा युवक काँग्रेसकडून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल,” असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला आहे.

या विषयावर अजून कारवाई न झाल्यास, युवक काँग्रेस तात्काळ रस्त्यावर उतरेल आणि प्रशासनाला जबाबदार धरले जाईल, असेही शेवटी त्यांनी नमूद केले.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: