Pune Water Cut News | पुणेकरांनो पाणी जपून वापरा |  महापौर मंजुषा नागपुरे यांनी दिले एक दिवसाआड पाणीपुरवठ्याचे संकेत

Homeadministrative

Pune Water Cut News | पुणेकरांनो पाणी जपून वापरा | महापौर मंजुषा नागपुरे यांनी दिले एक दिवसाआड पाणीपुरवठ्याचे संकेत

Ganesh Kumar Mule Jun 08, 2026 8:24 PM

Photos | Congress Bhavan | ९ ऑगस्ट क्रांती दिनाच्या पूर्व संध्येला सजवण्यात आलेली कॉंग्रेस भवन ही देखणी इमारत | फोटो पहा 
Pune PMC News | “रीइनस्टेटमेंट” च्या 30 कोटींच्या कामाला 115 कोटींचे टेंडर |  माजी नगरसेवकांची आयुक्तांकडे चौकशीची मागणी
Pune Property Tax Abhay Yojana | मागील अभय योजनेत लाभ घेतलेल्या मिळकत धारकांना देखील आता नवीन योजनेचा लाभ? | मिळकत कर विभागाचा प्रस्ताव तयार | आयुक्तांकडून अजून हिरवा कंदील नाही  

Pune Water Cut News | पुणेकरांनो पाणी जपून वापरा | सोमवारपासून रोटेशन पद्धतीने (एक दिवसाआड) पाणीकपात होण्याची शक्यता!

| महापौर मंजुषा नागपुरे यांनी दिले एक दिवसाआड पाणीपुरवठ्याचे संकेत

 

Pune Breaking News – (The Karbhari News Service) –  पुण्यात पाण्याची उपलब्धता कमी झाल्याने सोमवारपासून रोटेशन पद्धतीने पाणीकपात लागू होण्याची शक्यता आहे. महापौर मंजुषा नागपुरे यांनी यासंदर्भात नागरिकांना पाणी जपून वापरण्याचे आवाहन केले आहे. महापौर यांनी सांगितले की, प्रशासनाला याबाबत नियोजन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पुणेकरांना आता एक दिवसआड पाणीपुरवठा होणार हे अटळ आहे.  याबाबत गुरुवारी निर्णय घोषित केला जाईल, असे देखील महापौरांनी सांगितले. (Pune Water Supply)

सध्या उन्हाळ्यामुळे पाण्याची मागणी वाढली असून, धरणातील पाणीसाठा कमी झाल्याने महापालिकेला कपातीचा निर्णय घ्यावा लागण्याची शक्यता आहे. महापौर नागपुरे यांनी सांगितले की, पाणीपुरवठा एक दिवसाआड करावा लागेल अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते. त्यामुळे नागरिकांनी अनावश्यक पाण्याचा वापर टाळावा आणि पाण्याची साठवणूक करून ठेवावी.

गेल्या काही महिन्यांपासून पुण्यातील काही भागांमध्ये आठवड्यातून एक दिवस पाणीकपात सुरू आहे. आता शहरभरात ही कपात वाढण्याची शक्यता आहे.

महापालिकेने यापूर्वीही रोटेशन पद्धतीने पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे २५% पाण्याची बचत होते.

महापालिका प्रशासन लवकरच क्षेत्रनिहाय वेळापत्रक जाहीर करण्याची शक्यता आहे. तोपर्यंत पुणेकरांनी पाणी जपून वापरावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

पत्रकार परिषदेत महापौर यांच्या सोबत उपमहापौर परशुराम वाडेकर, सभागृह नेते गणेश बिडकर, आयुक्त नवल किशोर राम, अतिरिक्त आयुक्त पवनीत कौर, मुख्य अभियंता नंदकिशोर जगताप उपस्थित होते.
—-

COMMENTS

WORDPRESS: 1
  • comment-avatar
    एस व्ही कांबळे 3 months ago

    पिण्याच्या पाण्याने रस्ते- गाड्या धुण्यावर निर्बन्धन घातले गेले पाहीजे

DISQUS: