PMC Sevakvarg Ganeshotsav Manda | पुणे महापालिका गणेशोत्सव मंडळाच्या गणरायाची महापौर, उपमहापौर आणि अतिरिक्त आयुक्तांकडून आरती

पुणे महापालिका सेवकवर्ग गणेशोत्सव मंडळाने उभारलेली इंडिया गेट शहीद स्मारकाची प्रतिकृती आणि आरती करताना महापौर मंजुषा नागपुरे

HomeBreaking News

PMC Sevakvarg Ganeshotsav Manda | पुणे महापालिका गणेशोत्सव मंडळाच्या गणरायाची महापौर, उपमहापौर आणि अतिरिक्त आयुक्तांकडून आरती

Ganesh Kumar Mule Sep 23, 2026 9:13 PM

PMPML Income | पीएमपी’ चे ३ ते ७ सप्टेंबर २०२२ पर्यंतचे उत्पन्न ८ कोटी २७ लाख | गणेशोत्सव काळातील उत्पन्न
Loudspeaker during Ganeshotsav | गणेशोत्सवात हे ५ दिवस ध्वनिक्षेपक वापरासाठी असेल परवानगी
Ganeshotsav in Dubai | दुबई मध्ये प्रथमच सार्वजनिक गणेशोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा!

PMC Sevakvarg Ganeshotsav Manda | पुणे महापालिका गणेशोत्सव मंडळाच्या गणरायाची महापौर, उपमहापौर आणि अतिरिक्त आयुक्तांकडून आरती

 

Pune Ganeshotsav 2026 – (The Karbhari News Service) – पुणे महानगरपालिका सेवकवर्ग गणेशोत्सव समिती मंडळ यंदा 53 व्या वर्षात पदार्पण करत आहे. गेल्या 52 वर्षांपासून हे मंडळ केवळ धार्मिक उत्सव न साजरा करता विविध सामाजिक उपक्रम राबवत असल्याची परंपरा जपत आले आहे. (Pune News)

यंदाच्या वर्षी मंडळाने देशाच्या रक्षणासाठी प्राणाची आहुती देणाऱ्या शहीद जवानांप्रती आदरांजली व्यक्त करण्यासाठी एक आगळा वेगळा देखावा साकारला आहे. मंडळाच्या वतीने इंडिया गेट येथील शहीद स्मारकाची हुबेहूब प्रतिकृती उभारण्यात आली आहे. या प्रतिकृतीच्या माध्यमातून शहीद जवानांच्या बलिदानाची आठवण नागरिकांना करून दिली जात असून, हा देखावा पुणेकरांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरत आहे.

दरम्यान, या गणेशोत्सवाला मान्यवरांनी भेट देऊन आरती केली. महापौर मंजुषा नागपुरे, उपमहापौर परशुराम वाडेकर, अतिरिक्त आयुक्त पवनीत कौर आणि ओमप्रकाश दिवटे यांनी मंडळाला भेट देत गणरायाची आरती केली. यावेळी त्यांनी उपस्थित कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन देखील केले. महापालिका सेवकवर्गाने एकजुटीने हा उत्सव साजरा करावा आणि सामाजिक बांधिलकी जपावी, असे आवाहन यावेळी मान्यवरांनी केले.

गेल्या अनेक वर्षांपासून सेवकवर्ग मंडळातर्फे रक्तदान शिबीर, आरोग्य तपासणी, गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप असे विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात. यंदाही शहीद स्मारकाच्या प्रतिकृतीच्या माध्यमातून देशभक्तीचा संदेश देण्याचा प्रयत्न मंडळाने केला आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: