PSI Exam Age Limit | PSI परीक्षेच्या वयोमर्यादेत एक संधी द्यावी; विद्यार्थी प्रतिनिधींची मागणी | सभागृह नेते गणेश बिडकर यांच्याकडे PSI विद्यार्थ्यांचे निवेदन

PSI परीक्षेच्या वयोमर्यादेत एक संधी देण्याच्या मागणीसाठी विद्यार्थी प्रतिनिधींनी सभागृह नेते गणेश बिडकर यांना निवेदन दिले

HomeBreaking News

PSI Exam Age Limit | PSI परीक्षेच्या वयोमर्यादेत एक संधी द्यावी; विद्यार्थी प्रतिनिधींची मागणी | सभागृह नेते गणेश बिडकर यांच्याकडे PSI विद्यार्थ्यांचे निवेदन

Ganesh Kumar Mule Nov 26, 2026 7:20 PM

Pune Property tax News | पुणेकरांवर कोणतीही करवाढ नाही|  प्रशासनाचा ५ टक्के करवाढीचा प्रस्ताव सर्वपक्षीय नगरसेवकांनी फेटाळला
PMC Employee : मनपा नगरसचिव कार्यालयातील सेवकांकडून स्वच्छता कर्मचाऱ्यांना मिठाई वाटप
Property Tax : 23 Villeges : समाविष्ट 23 गावांतील मिळकतींना टॅक्स मध्ये 15-27% सवलत!  

PSI Exam Age Limit | PSI परीक्षेच्या वयोमर्यादेत एक संधी द्यावी; विद्यार्थी प्रतिनिधींची मागणी | सभागृह नेते गणेश बिडकर यांच्याकडे PSI विद्यार्थ्यांचे निवेदन

| मुख्यमंत्री व संबंधित विभागाकडे पाठपुरावा करणार

 

Ganesh Biddkar – The Karbhari News Service –  महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) घेण्यात येणाऱ्या पोलीस उपनिरीक्षक (PSI) परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थी प्रतिनिधींनी आज पुणे महानगरपालिकेतील सभागृह नेते गणेश बिडकर यांच्या कार्यालयात भेट घेऊन आपल्या विविध मागण्यांचे निवेदन सादर केले.

भरती प्रक्रियेत झालेला विलंब तसेच कोविड-१९ महामारीच्या कालावधीत निर्माण झालेल्या अडचणींमुळे २०२३ ते २०२६ या कालावधीत वयोमर्यादा ओलांडलेल्या पात्र उमेदवारांचे नुकसान होऊ नये, यासाठी PSI पदाच्या भरती प्रक्रियेत वयोमर्यादेबाबत एक विशेष संधी देण्यात यावी, अशी प्रमुख मागणी विद्यार्थ्यांनी या निवेदनाद्वारे केली. (Pune News)

राज्यातील हजारो विद्यार्थ्यांनी पोलीस उपनिरीक्षक होण्याचे स्वप्न उराशी बाळगून अनेक वर्षे मेहनत घेतली आहे. मात्र, भरती प्रक्रियेतील विलंब आणि प्रतिकूल परिस्थितीमुळे या विद्यार्थ्यांना संधीपासून वंचित राहावे लागू नये, ही त्यांची रास्त अपेक्षा आहे.

विद्यार्थ्यांच्या या मागणीची गांभीर्याने दखल घेत सभागृह नेते गणेश बिडकर यांनी या विषयावर सकारात्मक भूमिका घेतली असून, राज्याचे मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस, दोन्ही उपमुख्यमंत्री तसेच संबंधित विभागाकडे योग्य तो पाठपुरावा करून विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे आश्वासन दिले.

तसेच विद्यार्थ्यांचे भविष्य आणि त्यांच्या वर्षानुवर्षांच्या मेहनतीचा विचार करून शासनाने या मागणीबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा यावेळी त्यांनी व्यक्त केली.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: