PMPML Income | पीएमपी’ चे ३  ते ७ सप्टेंबर २०२२ पर्यंतचे उत्पन्न   ८ कोटी २७ लाख   | गणेशोत्सव काळातील उत्पन्न

HomeपुणेBreaking News

PMPML Income | पीएमपी’ चे ३ ते ७ सप्टेंबर २०२२ पर्यंतचे उत्पन्न ८ कोटी २७ लाख | गणेशोत्सव काळातील उत्पन्न

Ganesh Kumar Mule Sep 08, 2022 11:43 AM

Extra buses by PMPML | गणेशोत्सव कालावधीत पीएमपीएमएल कडून ६५४ जादा बसेसचे नियोजन
Loudspeaker during Ganeshotsav | गणेशोत्सवात हे ५ दिवस ध्वनिक्षेपक वापरासाठी असेल परवानगी
PMC Sevakvarg Ganeshotsav Manda | पुणे महापालिका गणेशोत्सव मंडळाच्या गणरायाची महापौर, उपमहापौर आणि अतिरिक्त आयुक्तांकडून आरती

पीएमपी’ चे ३  ते ७ सप्टेंबर २०२२ पर्यंतचे उत्पन्न 

 ८ कोटी २७ लाख 

| गणेशोत्सव काळातील उत्पन्न

|  तर विनातिकीट प्रवाशांकडून २ लाख ९१ हजार दंडवसूल 

      श्री गणेशोत्सव कालावधीत पुणे शहरात नजीकच्या उपनगरातून व बाहेरगावहून गणपतीची रोषणाई/सजावट पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते या कारणास्तव प्रवासी नागरीकांचे सोयीकरीता प्रतीवर्षी प्रमाणे यंदाही‘पीएमपीएमएल’ कडून गणेशोत्सवाकरीता नियमितच्या बसेस व्यतिरिक्त जादा६५४ बसेसचे नियोजन करण्यात आलेले आहे. ‘पीएमपीएमएल’ने दि. ३ सप्टेंबर २०२२ ते ७ सप्टेंबर २०२२ या कालावधीत ८ कोटी २७ लाख ४५ हजार ७३२ रुपयांचे उत्पन्न प्राप्त केले. या कालावधीत एकूण ८१४३ बसेसद्वारे ५७ लाख ४३ हजार २४८प्रवाशांनी पीएमपीएमएलच्या बससेवेचा लाभ घेतला. तसेच बसेस तपासणी दरम्यान विनातिकीट प्रवाश्यांकडून २ लाख ९१ हजार ६०० रूपये दंडवसूल करण्यात आला.

अ.क्र

दिनांक

एकूण मार्गावरील बसेस

एकूण उत्पन्न रूपये

एकूण प्रवासी

एकूण दंडवसुली रूपये

१.

०३/०९/२०२२

१६३४

१,५५,६०,९३५/-

१०,३५,५१४

२२,७००/-

२.

०४/०९/२०२२

१५५६

१,४४,८७,२५९/-

९,५३,०६८

६०,३००/-

३.

०५/०९/२०२२

१६४७

१,७९,४०,७१४/-

१२,९०,६००

७२,६००/-

४.

०६/०९/२०२२

१६४७

१,७५,६८,३५२/-

१२,५२,७३९

७३,४००/-

५.

०७/०९/२०२२

१६५९

१,७१,८८,४७२/-

१२,११,३२७

६२,६००/-

एकूण

८१४३

८,२७,४५,७३२/-

५७,४३,२४८

२,९१,६००/-

     सध्या पीएमपीएमएलच्या श्री गणेशोत्सव कालावधीत जादा बसेस मार्गावर संचलनात आहेत. जास्तीत जास्त प्रवाशी नागरिकांनी पीएमपीएमएल च्या बससेवेचा वापर करावा, असे आवाहन करण्यात येत आहे.