Karvenagar Footpath Encroachment | पुण्याच्या बेस्ट फुटपाथवर अतिक्रमण! | सायकल टूर कंत्राटदाराला पथ विभागाची मेहेरबानी| विवेक वेलणकर यांचा आरोप

कर्वेनगरमधील राजाराम पूल ते म्हात्रे पूल दरम्यानच्या फुटपाथवर सायकल कंत्राटदाराने थाटलेले एसी कंटेनर ऑफिस. (छायाचित्र - सजग नागरिक मंच)

Homeadministrative

Karvenagar Footpath Encroachment | पुण्याच्या बेस्ट फुटपाथवर अतिक्रमण! | सायकल टूर कंत्राटदाराला पथ विभागाची मेहेरबानी| विवेक वेलणकर यांचा आरोप

Ganesh Kumar Mule Sep 23, 2026 8:01 PM

PMC Commissioner Bungalow | शहर अभियंत्यांचा चौकशी अहवाल तातडीने संकेतस्थळावर प्रसिद्ध करा | विवेक वेलणकर यांची आयुक्तांकडे मागणी 
CSR | Pune Municipal Corporation | CSR  माध्यमातून कोविड काळात  पुणे महापालिकेला दिलेली ७ कोटीची देणगी विना वापर पडून!
Pune Municipal Corporation (PMC) – कोविड काळात  पुणे महापालिकेला  दिलेली ७ कोटी रुपयांची देणगी विना वापर पडून!

Karvenagar Footpath Encroachment | पुण्याच्या बेस्ट फुटपाथवर अतिक्रमण! | सायकल टूर कंत्राटदाराला पथ विभागाची मेहेरबानी| विवेक वेलणकर यांचा आरोप

 

PMC Raod Department – (The Karbhari News Service) – पुणे महापालिका एकीकडे शहरातील फुटपाथ अतिक्रमणमुक्त करण्यासाठी मोहीम राबवत असताना, दुसरीकडे महापालिकेच्याच पथ विभागाने कंत्राटदाराला फुटपाथवर चक्क एसी असलेले कंटेनर ऑफिस थाटण्याची परवानगी दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कर्वेनगर भागातील राजाराम पूल ते म्हात्रे पूल दरम्यानच्या डीपी रस्त्यावरील फुटपाथवर हा प्रकार घडला असून, सजग नागरिक मंचाचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्याकडे थेट तक्रार केली आहे. (Vivek Velankar Sajag Nagrik Manch)

काय आहे प्रकरण?

कर्वेनगर भागात राजाराम पूल ते म्हात्रे पूल हा एकमेव डीपी रस्ता आहे ज्याला प्रशस्त आणि चांगला फुटपाथ आहे. रोज सकाळ-संध्याकाळ शेकडो नागरिक या फुटपाथवर मॉर्निंग वॉक, इव्हिनिंग वॉकसाठी येतात. हा रस्ता पुण्यातील सर्वात चांगल्या रस्त्यांपैकी एक म्हणून ओळखला जातो, त्यामुळे डागडुजीचीही गरज नाही.

मात्र, गेल्या आठवड्यात अचानकपणे या फुटपाथवर ज्ञानदा शाळेच्या शेजारी एक भले मोठे कंटेनर ऑफिस उभारण्यात आले आहे. या कंटेनरमध्ये एसी देखील लावण्यात आला आहे. स्थानिकांनी चौकशी केली असता, सायकल स्पर्धा / सायकल टूर साठी नियुक्त करण्यात आलेल्या एका कंत्राटदाराला महापालिकेच्या पथ विभागानेच ही जागा उपलब्ध करून दिल्याचे समजते.

सजग नागरिक मंचचा सवाल

सजग नागरिक मंचचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी आयुक्तांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे, “खरं तर हा रस्ता चांगल्या स्थितीत आहे. मग अन्यत्र केल्या जाणाऱ्या कामांसाठी या रस्त्यावरील फुटपाथ अतिक्रमित करून ऑफिस उभारण्याचे प्रयोजनच काय? संपूर्ण पुण्यात फुटपाथ अतिक्रमणमुक्त करण्याची योजना आपण राबवत असताना, आपल्याच पथ विभागाच्या मार्गदर्शनाखाली फुटपाथवर अतिक्रमण होणे हे अत्यंत दुर्दैवी आहे.”

वेलणकर यांनी आयुक्तांकडे मागणी केली आहे की, पथ विभागाला आदेश देऊन तात्काळ हे अतिक्रमण काढण्यात यावे आणि फुटपाथ नागरिकांना चालण्यासाठी पूर्ववत उपलब्ध करून द्यावा.

प्रशासनाची भूमिका काय?

या प्रकरणी पथ विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनी सायकल प्रकल्पाच्या कामासाठी तात्पुरती व्यवस्था म्हणून परवानगी दिल्याचे सांगितले जात आहे. मात्र, नागरिकांचा सवाल आहे की, चांगल्या रस्त्यावर कंत्राटदाराचे ऑफिस थाटण्यासाठी फुटपाथच का? दुसरीकडे जागा उपलब्ध नव्हती का?

दरम्यान, या प्रकरणामुळे महापालिकेच्या दुटप्पी भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. एकीकडे सर्वसामान्यांच्या छोट्या टपऱ्या, हातगाड्यांवर कारवाई आणि दुसरीकडे कंत्राटदाराला एसी ऑफिससाठी फुटपाथ देणे, यावर नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: