Ganeshotsav in Dubai | दुबई मध्ये प्रथमच सार्वजनिक गणेशोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा!

HomeBreaking News

Ganeshotsav in Dubai | दुबई मध्ये प्रथमच सार्वजनिक गणेशोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा!

Ganesh Kumar Mule Sep 10, 2024 6:12 PM

Extra buses by PMPML | गणेशोत्सव कालावधीत पीएमपीएमएल कडून ६५४ जादा बसेसचे नियोजन
Loudspeaker during Ganeshotsav | गणेशोत्सवात हे ५ दिवस ध्वनिक्षेपक वापरासाठी असेल परवानगी
PMPML Income | पीएमपी’ चे ३ ते ७ सप्टेंबर २०२२ पर्यंतचे उत्पन्न ८ कोटी २७ लाख | गणेशोत्सव काळातील उत्पन्न

Ganeshotsav in Dubai | दुबई मध्ये प्रथमच सार्वजनिक गणेशोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा!

 

Dubai News – (The Karbhari News Service) – लोकमान्य बाळ गंगाधर टिळक (Lokmanya Tilak) यांच्या संदेशानुसार सर्वांना संघटित करण्यासाठी यंदा इंस्पायर इवेंट्स यांनी दुबई मधील सामाजिक संघटना, कंपन्या, सांस्कृतिक मंडळे तसेच मित्रपरिवार यांना एकत्र घेऊन दुबई मधे प्रथमच सार्वजनिक गणेशोत्सवाचे आयोजन केले. (UAE News)

या गणेशोत्सवात भव्य असा महाराष्ट्र पर्यटक विषयक देखावा सादर करण्यात आला जो दुबईकरांचे आकर्षण बनला. वेस्टझोन प्लाझा हॉटेल अपार्टमेंट, मनखुल, दुबई येथे दिनांक ७ सप्टेंबर शनिवारी श्रीमंत ढोल ताशा पथकाच्या वादनाने गणपती बाप्पा चे आगमन सोहळा आणि प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. दिवसभरात भजन, सामूहिक गणेश जाप, सांस्कृतिक कार्यक्रम तसेच महाआरती करण्यात आली.

दुसर्‍या दिवशी रविवार तारिख ८ सप्टेंबर भजन, सामूहिक गणेश जाप, संस्कृती मराठी मंडळाचे सामुदायिक अथर्वशीर्ष पठण तसेच महाआरती करण्यात आली.

आखाती देशात पर्यावरणातील पाणी खराब होऊ नये म्हणुन गणपती बाप्पाचे विसर्जन समुद्राच्या पाण्यात करण्यास बंदी आहे, सर्वांनीच दुबई मधील नियमांचे पालन करून हॉल मध्येच गणपती विसर्जन करण्यात आला. यंदा दिड दिवसा नंतर ढोल ताशांच्या गजरात भव्य मिरवणूक काढून गणपती बाप्पाला काही चुकले असेल तर माफ असे सांगून पुढच्या वर्षी लवकर यायची विनंती करुन भरलेल्या उराने तसेच पाणावलेल्या डोळ्याने निरोप दिला.

गणेशोत्सव यशस्वी करण्यासाठी दुबई मधील सर्व संघटनांनी आणि मित्रपरिवारांनी हातभार लावला.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0