PMC Kamgar Dindi | संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यासाठी मनपाच्या ‘कामगार दिंडी’चे आयोजन | इच्छुक कामगारांना ८ जुलैपर्यंत नोंदणीचे आवाहन

Homeadministrative

PMC Kamgar Dindi | संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यासाठी मनपाच्या ‘कामगार दिंडी’चे आयोजन | इच्छुक कामगारांना ८ जुलैपर्यंत नोंदणीचे आवाहन

Ganesh Kumar Mule Jul 02, 2026 11:51 AM

PMC Employees and Officers | पुणे महापालिका कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या गुणवंत पाल्यांचा २९ ऑक्टोबर ला  सन्मान!
PMC Contract Employees | पुणे महापालिकेत काम करणाऱ्या कंत्राटी कामगारांसाठी आनंदाची बातमी!
Pune PMC News | आपले विचार हीच आपली शक्ती : डॉ राजेंद्र भारूड | महापालिका कर्मचाऱ्यांच्या पाल्यांचा सन्मान!

PMC Kamgar Dindi | संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यासाठी मनपाच्या ‘कामगार दिंडी’चे आयोजन | इच्छुक कामगारांना ८ जुलैपर्यंत नोंदणीचे आवाहन

| ९ जुलै रोजी पुण्यात येणार पालखी | सकाळी ५.३० वाजता मनपा भवन येथून दिंडी प्रस्थान करणार

 

Palakhi Sohala 2026 – (The Karbhari News Service) – पुणे महानगरपालिका कामगार कल्याण निधीतर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही संत ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी सोहळ्यात ‘कामगार दिंडी’चे आयोजन करण्यात येत आहे. संत ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी बुधवार, ९ जुलै रोजी आळंदीहून पुण्यामध्ये मुक्कामी येणार आहे. या पार्श्वभूमीवर कामगार कल्याण निधीअंतर्गत ‘कामगार दिंडी’चे आयोजन करण्यात आले असून इच्छुक कामगारांनी दि. ८ जुलै पर्यंत नाव नोंदणी करावी, असे आवाहन कामगार कल्याण विभागाने केले आहे. (PMC Labour Welfare Deaprtment)

दरवर्षी होते दिंडीचे आयोजन

पुणे महानगरपालिका कामगार कल्याण निधीतर्फे कामगारांसाठी प्रतिवर्षी संत ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी सोहळ्यात कामगार दिंडीचे आयोजन करण्यात येते. या दिंडीचे आयोजन व तदनुषंगाने होणाऱ्या खर्चास अतिरिक्त महापालिका आयुक्त (इ.) यांची मान्यता मिळालेली आहे.

९ जुलै रोजी सकाळी ५.३० वाजता प्रस्थान

कामगार कल्याण निधीच्या सर्व सभासदांना आवाहन करण्यात आले आहे की, ज्या सभासदांना कामगार दिंडीत सहभागी व्हायचे आहे, त्यांनी आपली नावे कामगार कल्याण विभागामध्ये ८ जुलै पर्यंत नोंदवावीत. सहभागी अधिकारी/कर्मचारी यांनी ९ जुलै रोजी मनपा मुख्य भवन येथील प्रांगणात सकाळी ५.३० वाजता उपस्थित राहावे.

दोन्ही वेळेस सेवापुस्तकात नोंद आवश्यक

मुख्य कामगार अधिकारी नितीन केंजळे यांनी जाहीर आवाहनात स्पष्ट केले आहे की, “दिंडीत सहभागी होणाऱ्या सेवकांची हजेरी सकाळी व संध्याकाळी दोन्ही वेळेस नोंदवून संबंधित खात्यास कळविण्यात येणार असल्याने संबंधित सेवकांनी दोन्ही वेळेस उपस्थित असणे आवश्यक आहे, याची नोंद घ्यावी.”

संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा हा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचा अविभाज्य भाग असून पुणे महापालिकेच्या कामगारांनी दरवर्षी मोठ्या उत्साहाने या दिंडीत सहभाग नोंदवला आहे. यंदाही कामगार या दिंडीतून ज्ञानोबा-माऊलींच्या पालखीचे स्वागत करणार आहेत.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: