Nitin Kenjale PMC | PMC चे मुख्य कामगार अधिकारी नितीन केंजळे यांची “दत्तोपंत ठेंगडी राष्ट्रीय कामगार मंडळ” च्या पुणे विभाग अध्यक्षपदी नियुक्ती

Homeadministrative

Nitin Kenjale PMC | PMC चे मुख्य कामगार अधिकारी नितीन केंजळे यांची “दत्तोपंत ठेंगडी राष्ट्रीय कामगार मंडळ” च्या पुणे विभाग अध्यक्षपदी नियुक्ती

Ganesh Kumar Mule Aug 13, 2026 1:34 PM

 PMC Labour Welfare Department  | कामावर असताना मृत्यू झाल्यास कर्मचाऱ्यांच्या वारसांना २ लाख आणि ५ लाख चे अर्थसहाय्य! | अमल करण्याबाबत प्रशासनाचे परिपत्रक जारी!
PMC Kamgar Union | कामगार युनियन कडून चतुर्थ श्रेणी कामगारांना दाखवण्यात आला मराठी चित्रपट
PMC Safai Karmchari | महापालिका सफाई कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी | सणांच्या सुट्टीच्या दिवशी काम केल्यास मिळणार दीड पट वेतन!

Nitin Kenjale PMC | PMC चे मुख्य कामगार अधिकारी नितीन केंजळे यांची “दत्तोपंत ठेंगडी राष्ट्रीय कामगार मंडळ” च्या पुणे विभाग अध्यक्षपदी नियुक्ती

केंद्र सरकारच्या स्वायत्त संस्थेची 2 वर्षांसाठी जबाबदारी, 33 वर्षांच्या सेवेची पावती

 

Pune News – (The Karbhari News Service) – पुणे महानगरपालिकेचे मुख्य कामगार अधिकारी  नितीन बाजीराव केंजळे यांची भारत सरकार, कामगार आणि रोजगार मंत्रालयाच्या अंतर्गत असलेल्या दत्तोपंत ठेंगडी राष्ट्रीय कामगार शिक्षण आणि विकास मंडळाच्या पुणे विभागाच्या “अध्यक्ष” पदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांचा हा कार्यकाळ 27 मार्च 2026 ते 26 मार्च 2028 पर्यंत 2 वर्षांचा असेल.

कोण आहे दत्तोपंत ठेंगडी मंडळ?
कामगारांना शिक्षित आणि सशक्त करणे हा उद्देश ठेवून 1958 साली स्थापन झालेली ही संस्था भारत सरकारच्या कामगार आणि रोजगार मंत्रालयाच्या अंतर्गत एक स्वायत्त संस्था म्हणून काम करते.

संघटित, असंघटित आणि ग्रामीण कामगारांना कामगार हक्क, सामाजिक-आर्थिक समस्या आणि सरकारी कल्याणकारी योजनांबाबत शिक्षण आणि प्रशिक्षण देणे हे या मंडळाचे मुख्य काम आहे.
मंडळाच्या नियंत्रणाखाली देशभरात 50 प्रादेशिक संचालनालये आणि मुंबई येथील सर्वोच्च प्रशिक्षण संस्था “इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ वर्कर्स एज्युकेशन” कार्यरत आहेत.

शिपाई ते मुख्य कामगार अधिकारी – 33 वर्षांचा प्रवास
नितीन केंजळे यांनी पुणे महानगरपालिकेत 1993 साली शिपाई पदापासून आपल्या सेवेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी ज्यु. ग्रेड लेखनिक, लघुटंकलेखक अशा टप्प्यांवरून परीक्षांमधून प्रगती करत कामगार अधिकारी पदापर्यंत मजल मारली.

सध्या ते PMC मध्ये मुख्य कामगार अधिकारी म्हणजेच उपायुक्त पदाची जबाबदारी सांभाळत आहेत. कामगारांसाठी राबविलेल्या विविध कल्याणकारी योजना आणि मनुष्यबळ संसाधन विभागातील त्यांच्या कामगिरीची पावती म्हणूनच त्यांची या राष्ट्रीय पातळीवरील संस्थेच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे.

जबाबदारी काय असेल?
पुणे विभागाचे अध्यक्ष म्हणून  केंजळे यांच्याकडे पश्चिम महाराष्ट्रातील कामगारांना मंडळाच्या विविध प्रशिक्षण कार्यक्रम, शिबिरे आणि कल्याणकारी योजनांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी असेल. यामुळे पुणे विभागातील संघटित आणि असंघटित कामगारांना केंद्र सरकारच्या योजनांचा अधिक लाभ मिळण्यास मदत होणार आहे.

PMC मधील प्रदीर्घ अनुभव आणि कामगार विषयातील तज्ज्ञता याचा फायदा आता राष्ट्रीय पातळीवर कामगार शिक्षणासाठी होणार आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: