PMC Solid Waste Management | क्रॉनिक स्पॉट्ससह राडारोडा उचलण्याची जबाबदारी आता थेट अधिकाऱ्यांवर; ठेकेदारांना जबाबदारीतून वगळले

उपायुक्त संतोष वारुळे यांनी २३ नोव्हेंबर २०२६ रोजी यासंदर्भात कार्यालयीन परिपत्रक जारी केले आहे

Homeadministrative

PMC Solid Waste Management | क्रॉनिक स्पॉट्ससह राडारोडा उचलण्याची जबाबदारी आता थेट अधिकाऱ्यांवर; ठेकेदारांना जबाबदारीतून वगळले

Ganesh Kumar Mule Nov 24, 2026 9:31 AM

PMC Drainage Action | लोहियानगरमध्ये बांधकामाचे पाणी थेट ड्रेनेज चेंबरमध्ये! ‘टार्गेट इन्फ्रा डेव्हलपर्स एल.एल.पी’ला २५ हजारांचा दंड
PMC Financial Situation | मिळकत कराची वसूली होईना; जीएसटीचे अनुदान मिळेना | महापालिकेने आर्थिक डोलारा सांभाळायचा कसा?
PMC Solid Waste Management Department | इंदौर दौऱ्यानंतर महापालिकेच्या घनकचरा विभागाकडून तात्काळ उपाययोजना सुरु | आरोग्य निरिक्षक, वरिष्ठ आरोग्य निरीक्षकांना दिले जाणार प्रशिक्षण 

PMC Solid Waste Management | पुणे महापालिकेचा कचरा व्यवस्थापनाबाबत मोठा निर्णय! | क्रॉनिक स्पॉट्ससह राडारोडा उचलण्याची जबाबदारी आता थेट अधिकाऱ्यांवर; ठेकेदारांना जबाबदारीतून वगळले

| कचरा साचल्यास सहाय्यक आयुक्त, वरिष्ठ आरोग्य निरीक्षक, आरोग्य निरीक्षक आणि मुकादम यांच्यावर थेट कारवाई होणार; उपायुक्त संतोष वारुळे यांचे कडक आदेश

 

Pune Garbage Collection – The Karbhari News Service – शहरातील विविध भागांमध्ये दीर्घकाळ कचरा साचून राहणाऱ्या क्रॉनिक स्पॉट्स (Chronic Spots) च्या समस्येवर नियंत्रण मिळवण्यासाठी पुणे महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. यापुढे शहरातील क्रॉनिक स्पॉट्स, गार्डन वेस्ट अर्थात पालापाचोळा, राडारोडा आणि फर्निचर वेस्ट उचलण्याची १०० टक्के जबाबदारी संबंधित प्रभागातील महापालिका सहाय्यक आयुक्त, वरिष्ठ आरोग्य निरीक्षक, आरोग्य निरीक्षक आणि मुकादम यांच्यावर निश्चित करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, या प्रकारचा कचरा उचलण्याची जबाबदारी झाडण कामाच्या ठेकेदारांची राहणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. या आदेशामुळे प्रभाग स्तरावरील अधिकाऱ्यांची जबाबदारी वाढली असून, कचरा साचलेला आढळल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर थेट शिस्तभंगाची कठोर कारवाई करण्यात येणार आहे. (Santosh Warule PMC)

पुणे महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त संतोष वारुळे यांनी  यासंदर्भात कार्यालयीन परिपत्रक जारी केले आहे.

महानगरपालिका क्षेत्रातील विविध प्रभागांमध्ये कचऱ्याचे क्रॉनिक स्पॉट्स, गार्डन वेस्ट, राडारोडा आणि फर्निचर वेस्ट मोठ्या प्रमाणात किंवा दीर्घकाळ साचून राहत असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले होते. अशा ठिकाणी कचरा साचल्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरते. तसेच सार्वजनिक आरोग्याला धोका निर्माण होण्याबरोबरच कचऱ्याला आग लागण्याच्या दुर्घटनांची शक्यताही वाढते. त्यामुळे या समस्येवर प्रभावी नियंत्रण आणण्यासाठी प्रशासनाने जबाबदारी निश्चित केली आहे.

प्रभाग अधिकाऱ्यांवर १०० टक्के जबाबदारी

अतिरिक्त महापालिका आयुक्त यांच्या आदेशानुसार जारी करण्यात आलेल्या या परिपत्रकात संबंधित प्रभागातील कचरा व्यवस्थापनाची जबाबदारी स्पष्ट करण्यात आली आहे. क्रॉनिक स्पॉट्सवरील कचरा, पालापाचोळा, राडारोडा आणि फर्निचर वेस्ट यांची स्वच्छता करणे आणि तो कचरा उचलण्याची संपूर्ण म्हणजेच १०० टक्के जबाबदारी संबंधित महापालिका सहाय्यक आयुक्त, वरिष्ठ आरोग्य निरीक्षक, आरोग्य निरीक्षक आणि मुकादम यांची राहणार आहे.

यामुळे प्रभागातील कचरा व्यवस्थापनात संबंधित अधिकाऱ्यांना अधिक सक्रिय राहावे लागणार आहे. एखाद्या ठिकाणी वारंवार कचरा साचत असल्यास त्यावर तातडीने उपाययोजना करण्याची जबाबदारीही संबंधित यंत्रणेवर असेल.

झाडण कामाच्या ठेकेदारांना क्रॉनिक स्पॉट्समधून वगळले
या आदेशातील आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे, रस्त्यांवरील दैनंदिन झाडण आणि साफसफाईची जबाबदारी झाडण कामाच्या ठेकेदारांकडेच राहणार आहे. परफॉर्मन्स बेस्ड झाडण कामाच्या माध्यमातून रस्त्यांची नियमित स्वच्छता करणे हे ठेकेदारांचे काम असेल.

मात्र, रस्त्यावरील क्रॉनिक स्पॉट्स, गार्डन वेस्ट (पालापाचोळा), राडारोडा आणि फर्निचर वेस्ट उचलण्याची जबाबदारी झाडण कामाच्या ठेकेदारांची राहणार नाही, असे परिपत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे या प्रकारच्या कचऱ्याच्या व्यवस्थापनासाठी आता प्रभाग स्तरावरील महापालिका अधिकाऱ्यांनाच स्वतंत्रपणे जबाबदारी पार पाडावी लागणार आहे.

कचरा साचल्यास थेट शिस्तभंगाची कारवाई
महापालिका प्रशासनाने या आदेशाच्या अंमलबजावणीबाबत कठोर भूमिका घेतली आहे. परिपत्रक जारी झाल्यानंतरही कोणत्याही प्रभागात क्रॉनिक स्पॉट्स, पालापाचोळा, राडारोडा किंवा फर्निचर वेस्ट साचलेला आढळल्यास संबंधित महापालिका सहाय्यक आयुक्त, वरिष्ठ आरोग्य निरीक्षक, आरोग्य निरीक्षक आणि मुकादम यांना थेट जबाबदार धरण्यात येणार आहे.

तसेच संबंधितांविरुद्ध शिस्तभंगाची कठोर प्रशासकीय कारवाई प्रस्तावित करण्यात येईल, असा स्पष्ट इशाराही उपायुक्त संतोष वारुळे यांनी दिला आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: