PMC Website | नळजोडणी आकारामध्ये बदल करणे, मालकी हक्कात बदल करणे पासून ते फेरीवाला प्रमाणपत्र / ओळखपत्र वारसाच्या नावे वर्ग करणे अशा नवीन २४ सेवांचा पुणे महानगरपालिकेच्या संकेतस्थळामध्ये  समावेश  

Homeadministrative

PMC Website | नळजोडणी आकारामध्ये बदल करणे, मालकी हक्कात बदल करणे पासून ते फेरीवाला प्रमाणपत्र / ओळखपत्र वारसाच्या नावे वर्ग करणे अशा नवीन २४ सेवांचा पुणे महानगरपालिकेच्या संकेतस्थळामध्ये  समावेश  

Ganesh Kumar Mule Apr 22, 2025 9:46 PM

PMC Call Center | Command and Control Center | कमांड सेंटर चा निधी कॉल सेंटर च्या कामासाठी!
PMC IT Department | पुणे महापालिकेच्या प्रत्येक विभागात आयटी विषयक कामासाठी आता दोन नोडल ऑफिसर!
PMC New Website | पुणे महानगरपालिकेचे संकेतस्थळ आता नव्या स्वरूपात

PMC Website | नळजोडणी आकारामध्ये बदल करणे, मालकी हक्कात बदल करणे पासून ते फेरीवाला प्रमाणपत्र / ओळखपत्र वारसाच्या नावे वर्ग करणे अशा नवीन २४ सेवांचा पुणे महानगरपालिकेच्या संकेतस्थळामध्ये  समावेश

 

Pune Municipal Corporation Website – (The Karbhari News Service) – महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, २०१५ अंतर्गत असणाऱ्या विविध सेवा ऑनलाईन उपलब्ध करून देण्यासाठी पुणे महानगरपालिकेचे https://services.pmc.gov.in हे अधिकृत संकेतस्थळ आहे. पुणे महानगरपालिकेमार्फत विविध सेवा लोकसेवा हक्क अधिनियम, २०१५ अंतर्गत प्रसिद्ध केल्या आहेत. ‘राज्य शासनाच्या १०० दिवसांसाठी ७ कलमी कृती आराखडा’ उपक्रमाच्या अंतर्गत २४ नवीन सेवा नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून विकसित करण्यात आल्या आहेत. (Pune Municipal Corporation – PMC)

पाणीपुरवठा विभागाच्या नळजोडणी आकारामध्ये बदल करणे, मालकी हक्कात बदल करणे, पुनःजोडणी करणे, प्लंबर परवाना / नूतनीकरण करणे, तात्पुरते कायमस्वरूपी नळजोडणी खंडीत करणे, वापरामध्ये बदल करणे, नळ दुरुस्ती या सेवा तर आकाशचिन्ह विभागाच्या परवाना हस्तांतरण, परवाना दुय्यम प्रत, परवाना धारक/ भागीदाराचे नाव बदलणे, व्यवसाय बदलने, परवाना रद्द करणे, भागीदाराच्या संख्येत/ बदल (वाढ / कमी), व्यवसायाचे नाव बदलणे या सोबतच अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या पुणे मनपा सार्वजनिक रस्त्यावर इमारत माल मसाला टाकणे /पहाड बांधने करीताचा परवाना देणे/नुतणीकरण करून देणे, मंडप/कमान/चालू मंडप परवानगी देणे, फेरीवाला प्रमाणपत्रधारकाची व्यवसाय कालावधी बाबतची वर्गवारी बदलून देणे, फेरीवाल्याच्या नावे मिळालेला नोंदणीकृत फेरीवाला प्रमाणपत्राची / ओळखपत्राची दुबार प्रत देणे, फेरीवाला प्रमाणपत्र / ओळखपत्र वारसाच्या नावे वर्ग करणे या सेवा तसेच आरोग्य विभागाच्या नवीन परवाना मिळणे. (बीफ,पोर्क,मटण चिकन फिश ), परवान्याचे नुतनीकरण (बीफ,पोर्क,मटण चिकन फिश ), परवाना रद्द करणे (बीफ,पोर्क,मटण चिकन फिश ) व मलनि:सारण विभागाची मलनि:सारण जोडणी देणे अश्या विविध सेवा Online करण्यात आल्या आहेत.

सदर संकेतस्थळाचे उदघाटन मा. पुणे महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक श्री. डॉ. राजेन्द्र भोसले यांच्या हस्ते पार पडले. यावेळी मा. पुणे महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त (ज ) श्री. एम. जे. प्रदीप चंद्रन, मा. पुणे महानगरपालिका पथ विभाग मुख्य अभियंता श्री.अनिरुद्ध पावसकर, मा. पुणे महानगरपालिका पाणीपुरवठा विभाग मुख्य अभियंता श्री. नंदकिशोर जगताप, मा. पुणे महानगरपालिका उप आयुक्त श्रीमती प्रतिभा पाटील, मा. पुणे महानगरपालिका माहिती व तंत्रज्ञान विभाग प्रमुख श्री. राहुल जगताप व इतर अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

राज्यातील नागरिकांना दिल्या जाणाऱ्या सेवा पारदर्शक गतीमान व कालबध्द पध्दतीने ऑनलाईन आरटीएस सेवांमुळे गतिमान आणि पारदर्शक प्रशासकीय कामकाजास प्रोत्साहन मिळणार आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर या सेवांचा लाभ घ्यावा असे महापालिकेच्या वतीने आवाहन करण्यात येत आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: