PMC SEED Project | पुणे महानगरपालिका राबवणार SEED प्रकल्प!|विना निविदा  सल्लागार कंपनी नियुक्त करण्यास मान्यता 

Homeadministrative

PMC SEED Project | पुणे महानगरपालिका राबवणार SEED प्रकल्प!|विना निविदा  सल्लागार कंपनी नियुक्त करण्यास मान्यता 

Ganesh Kumar Mule Nov 21, 2025 7:37 PM

PMC Deputy Commissioner | उपायुक्त माधव जगताप यांच्याकडे पुन्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाची जबाबदारी | संदीप खलाटे यांच्याकडील पदभार काढला 
Cabinet Meeting | मंत्रिमंडळ बैठकीतील १४ निर्णय | वाचा सविस्तर
PMC Employees DA Hike | केंद्राच्या धर्तीवर महापालिका कर्मचाऱ्यांना सुधारित महागाई भत्ता लागू करा | मार्च पेड इन एप्रिल च्या वेतनात अदा करण्याची मागणी 

PMC SEED Project | पुणे महानगरपालिका राबवणार SEED प्रकल्प!|विना निविदा  सल्लागार कंपनी नियुक्त करण्यास मान्यता

Pune PMC News – (The Karbhari News Service) – पुणे महानगरपालिका ही नागरिकाभिमुख प्रशासनासाठी ओळखली जाते. नागरिकांना विविध सेवा अधिक सुलभ, जलद आणि प्रभावी पद्धतीने उपलब्ध करून देण्यासाठी महानगरपालिका सातत्याने नवनवीन उपक्रम राबवत असते. त्याच अनुषंगाने डेटा, तंत्रज्ञान आणि संवाद (Communication) यांचा एकत्रित वापर करून Service Efficiency & Effectiveness Using Data (SEED) हा प्रकल्प राबवण्याचा प्रस्ताव आहे. यासाठी विना निविदा सल्लागार नियुक्त करण्यास स्थायी समिती आणि मुख्य सभेने मान्यता दिली आहे. ५(२) (२) अन्वये विनानिविदा नियुक्तीसाठी सल्लागार म्हणून E&Y या कंपनीस काम देण्यास मान्यता देण्यात आली आहे. (PMC Standing Committee)

माहिती व तंत्रज्ञान विभागाकडून DIT कडील शासन निर्णयाच्या आधारे पॅनेल व ह्यापूर्वी सल्लागार म्हणून काम केलेले असलेल्या E&Y या कंपनीचे नाव कळविले आहे. त्यानुसार  ही मान्यता देण्यात आली आहे. ही कंपनी DPR व टेंडर प्रक्रिया करणार आहे.

 

SEED प्रकल्प चे फायदे

| पुणे महानगरपालिकेच्या विविध विभागांकडून करण्यात येत असलेल्या नागरिकाभिमूख उपक्रमांना, योजनांना मोठ्या प्रमाणात वर्तमानपत्र, सोशल मीडियावर यावर प्रसिद्धी देणे
| नागरिकाभिमुख व डेटा-आधारित निर्णय प्रक्रियेला चालना
| महसूल वाढीसाठी बहुआयामी कम्युनिकेशन चॅनलचा वापर
| कार्यक्षमता व सेवा गुणवत्ता सुधारणा
| खर्चात बचत आणि संसाधनांचा योग्य वापर
| नागरिक प्रोफाइल मॅनेजमेंटची सुविधा
| आपत्कालीन परिस्थितीत जलद व योग्य नियोजनाची क्षमता
| नागरिकांना केंद्रस्थानी ठेवून सेवांचे गुणवत्तापूर्ण नियोजन व अंमलबजावणी
| आगामी नियोजित सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने मतदारांमध्ये जनजागृती करण्यासाठी विविध उपक्रमांची आखणी

 

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: