PMC Ward 31 – Mayur Colony Kothrud | प्रभाग क्रमांक ३१ – मयूर कॉलनी – कोथरूड | प्रभागाची व्याप्ती आणि रचना सविस्तर जाणून घ्या
Pune Corporation Election 2025 – (The Karbhari News Service) – मयूर कॉलनी – कोथरूड या प्रभागात मयुर कॉलनी, आयडीयल कॉलनी, भेलके नगर, डहाणूकर कॉलनी पासून ते शवंतराव चव्हाण नाट्यगृह इ. परिसर येतात. या प्रभागाची रचना आणि व्याप्ती अपना सविस्तर जाणून घेऊयात. (PMC Pune Election 2025)
प्रभाग क्रमांक ३१ – मयूर कॉलनी – कोथरूड
लोकसंख्या – एकूण ८३०९८ – अ. जा. -५३३७ – अ. ज. ६६२
निवडून द्यायच्या सदस्यांची संख्या – ४
व्याप्ती: मयुर कॉलनी, आयडीयल कॉलनी, भेलके नगर, डहाणूकर कॉलनी, गुजराथ कॉलनी, गुरुराज सोसायटी, सुतार दवाखाना, कोथरुड गावठाण, वनाज कंपनी, कृष्णा हॉस्पिटल, मृत्युंजय कॉलनी, लक्ष्मीनगर झोपडपट्टी, कमिन्स इंडिया लि. गांधी भवन, गोपीनाथ नगर, महेश विद्यालय, शास्त्रीनगर (पार्ट), गुरुजन सोसायटी, आझादनगर थोरात उद्यान, यशवंतराव चव्हाण नाट्यगृह इ.
उत्तर: पुणे मनपाची जुनी हद्द कांचनबन सोसायटी व सहकार वृंद सोसायटीच्या उत्तरेकडील हद्दीस जिथे मिळते तिथून पूर्वेस सदर हद्दीने किनारा हॉटेल ते बळवंतपुरम सोसायटी कडे जाणाऱ्या रस्त्यास मिळेपर्यंत, तेथून दक्षिणेस सदर रस्त्याने पौड रस्त्यास मिळेपर्यंत तेथून पुर्वेस व पुढे दक्षिण पूर्वेस पौड रस्त्याने पौड फाट्याजवळ कै. पु. भा. भावे रस्त्यास मिळेपर्यंत, तेथून पश्चिमेस कै. पु. भा. भावे रस्त्याने शीला विहार कॉलनीच्या पश्चिमेकडील हद्दीने व पुढे पश्चिमेकडील नाल्याने (मौजे कोथरूड व एरंडवणे यांच्या हद्दीने) महर्षी कर्वे रस्त्यास मिळेपर्यंत.
पुर्व: मौजे कोथरूड व एरंडवणे यांची हद्द महर्षी कर्वे रस्त्यास पौड फाट्याजवळ जेथे मिळते, तेथून पश्चिमेस व पुढे दक्षिणेस महर्षी कर्वे रस्त्याने मौजे कोथरुड मौजे हिंगणे बुद्रुक हद्दीस वनदेवी मंदिराजवळ मिळेपर्यंत.
दक्षिणः महर्षी कर्वे रस्ता कोथरुड – हिंगणे बुद्रुक हद्दीस वनदेवी मंदिराजवळ जेथे मिळते, तेथून पश्चिमेस मौजे कोथरुड मौजे हिंगणे बुद्रुक यांचे हद्दीने लक्ष्मीनगर वसाहतीचे पश्चिम हद्दीस मिळेपर्यंत, तेथून दक्षिण पश्चिमेस सदर हद्दीने श्रीकांत ठाकरे पथाच्या सरळ रेषेस गोपीनाथ नगर जवळ मिळेपर्यंत.
पश्चिमः मौजे कोथरुड मौजे हिंगणे बुद्रुक हद्दीची रेषा श्रीकांत ठाकरे पथाच्या सरळ रेषेस गोपीनाथ नगर जवळ जेथे मिळते, तेथून उत्तरेस श्रीकांत ठाकरे पथाच्या सरळ रेषेने व पुढे श्रीकांत ठाकरे पथाने कोथरुड डी. पी. रस्त्यास कै. बिरुजी मोकाटे चौकात मिळेपर्यंत, तेथून पश्चिमेस कोथरुड डी. पी. रस्त्याने नानासाहेब धर्माधिकारी पथास मिळेपर्यंत तेथून उत्तरेस नानासाहेब धर्माधिकारी पथाने अण्णाभाऊ साठे चौकात पौड रस्त्यास मिळेपर्यंत, तेथून पश्चिमेस पौड रस्त्याने व पुढे उत्तरेस वनाझ मेट्रो डेपोच्या पश्चिमेकडील हद्दीने कांचनबन सोसायटी व सहकार वृंद सोसायटीच्या उत्तरेकडील हद्दीस मिळेपर्यंत.

PMC Ward 31 – Mayur Colony Kothrud Map
COMMENTS