Pune City Air Index | पुणे शहराची हवेची गुणवत्ता सुधारली!

Homeadministrative

Pune City Air Index | पुणे शहराची हवेची गुणवत्ता सुधारली!

Ganesh Kumar Mule Sep 09, 2025 7:56 PM

Caste Validity Certificate | स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत उमेदवारांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास सहा महिन्यांची मुदत मिळणार
Pune PMC News | हडपसर मधील  धोबी घाट, शहीद सौरभ फराटे स्मारक विकसित करून स्व. हेमंत करकरे उद्यान वाचविण्याची महापालिका आयुक्त यांच्याकडे मागणी 
PMC Pune | Viksit Bharat Sankalp Yatra | २४ ठिकाणी विकसित भारत संकल्प यात्रा | ५६७५५ पुणेकर सहभागी 

Pune City Air Index | पुणे शहराची हवेची गुणवत्ता सुधारली!

| स्वच्छ वायू सर्वेक्षण २०२५ मध्ये पुणे शहराचा देशात १० वा क्रमांक

 

Pune City Air Index – (The Karbhari News Service) – केंद्र सरकारच्या पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयामार्फत देशातील १३० शहरांमध्ये “स्वच्छ वायू सर्वेक्षण २०२५” करण्यात आले. यामध्ये पुणे शहर १० व्या स्थानावर पोहोचले आहे. महापालिकेच्या प्रयत्नांमुळे पुणे शहराची हवेची गुणवत्ता सुधारली असून गेल्या वर्षी पुणे शहराला या सर्वेक्षणात २३ वे स्थान मिळाले होते. परंतु यावर्षी १३ स्थानांनी सुधारणा झाली आहे. अशी माहिती उपायुक्त संतोष वारुळे (Santosh Warule PMC) यांनी दिली.  (Pune Municipal Corporation – PMC)

हे सर्वेक्षण एप्रिल २०२४ ते २०२५ या एका वर्षाच्या कालावधीवर आधारित होते. या स्वच्छ हवा सर्वेक्षण २०२५ मध्ये, केंद्र सरकारच्या पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने सर्वेक्षणासाठी निश्चित केलेल्या पॅरामीटर्समध्ये बायोमास आणि कचरा जाळण्यामुळे होणारे उत्सर्जन, रस्त्यावरील धूळ, बांधकाम पासून निर्माण होणारे प्रदूषण, वाहनांचे प्रदूषण, औद्योगिक प्रदूषण, इतर प्रदूषण, जनजागृती उपक्रम, कसे केले जात आहे, यांचा समावेश आहे. हे मुद्दे लक्षात घेऊन हे सर्वेक्षण करण्यात आले आहे.

पुणे महानगरपालिकेकडून सीएनजी आणि इलेक्ट्रिक वाहने खरेदी करण्यास नागरिकांना प्रवृत्त केले जात आहे. याशिवाय, महानगरपालिकेने नवीन खरेदी केलेली आणि भाड्याने घेतलेली सर्व वाहने इलेक्ट्रिक वाहनांमध्ये रूपांतरित करण्यात आली आहेत. जुलै २०२५ पर्यंत पुणे शहरात ४१ लाख १६ हजार ३१० नोंदणीकृत वाहने रस्त्यावर होती. पुणे शहरात इलेक्ट्रीक वाहनांची संख्या ३३ हजारांहून ९५ हजार झाली आहे. पुणे शहरात ७० % रोड हे ग्रीन बेल्ट वर्गातील आहेत. शहरातील घनकचऱ्याची विल्हेवाट योग्य रीतीने लावण्यात येत आहे. असे वारुळे यांनी सांगितले.

केंद्र सरकारकडून पुणे महानगरपालिकेला १५ वित्त आयोग अंतर्गत ३९१ कोटी रुपये मिळणार आहेत. त्यापैकी १६२ कोटी रुपये मिळाले आहेत. यातून पुणे शहरातील वायू प्रदूषण कमी करण्यासाठी पुणे महानगरपालिकेने वर्षभर विविध उपाययोजना केल्या आहेत. वाहनांमुळे होणारे प्रदूषण कमी करण्यासाठी सीएनजी घंटागाड्या, बसेस तसेच इलेक्ट्रिक वाहने, पी.एम.पी. एम. एल. च्या बसेस इत्यादीचा समावेश आहे. स्मशानभूमीमध्ये गॅस तसेच विद्युत दाहिनीची व्यवस्था करण्यात आली असून लाकडाचा वापर होणाऱ्या दाहीनी मध्ये हवा प्रदूषण कमी करण्यासाठी APC System बसविण्यात आली आहे. यासोबतच हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण केली जात आहे. असेही उपयुक्त वारुळे यांनी सांगितले.
—–

केंद्र सरकारच्या वतीने हवेच्या गुणवत्ते बाबत विविध पोर्टल वरून माहिती घेतली जाते. यामध्ये MPCB, RTO, राज्य सरकारचे पोर्टल अशा विविध ऑनलाईन  माध्यमांचा समावेश असतो. यावर्षी महापालिकेने २००  मार्कांचा क्लेम केला होता. त्यापैकी पुणे महापालिकेला १८० गुण मिळाले आहेत. त्यामुळे पुणे १० व्या क्रमांकावर पोहोचले आहे. महापलिका आणि शहराच्या दृष्टीने ही जमेची बाजू आहे.

  • संतोष वारूळे, उप आयुक्त, पर्यावरण विभाग, पुणे महानगरपालिका

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: