PMC Ward 30 – Karvenagar – Hingane Home Colony | प्रभाग क्रमांक ३० – कर्वेनगर – हिंगणे होम कॉलनी  | प्रभागाच्या हद्दी आणि व्याप्ती सविस्तर जाणून घेऊयात

Homeadministrative

PMC Ward 30 – Karvenagar – Hingane Home Colony | प्रभाग क्रमांक ३० – कर्वेनगर – हिंगणे होम कॉलनी  | प्रभागाच्या हद्दी आणि व्याप्ती सविस्तर जाणून घेऊयात

Ganesh Kumar Mule Sep 09, 2025 8:18 AM

Dilip Vede patil | दिलीप वेडेपाटील यांच्यावर चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोपवली महत्वाची जबाबदारी! 
Labor Law | कामगार कायद्यातील बदलांमुळे किती कामगारांना रोजगार मिळणार ? | कामगार नेते सुनील शिंदे
Annasaheb Magar College | अण्णासाहेब मगर महाविद्यालयात गॅस सिलेंडर हाताळणी प्रशिक्षण कार्यक्रम

PMC Ward 30 – Karvenagar – Hingane Home Colony | प्रभाग क्रमांक ३० – कर्वेनगर – हिंगणे होम कॉलनी  | प्रभागाच्या हद्दी आणि व्याप्ती सविस्तर जाणून घेऊयात

 

Pun Corporation Election 2025 – (The Karbhari News Service) – महापालिका प्रारूप प्रभाग रचनेतील कर्वेनगर – हिंगणे होम कॉलनी हा ३० क्रमांकाचा प्रभाग. यजुर्वेद सोसायटी, कमिन्स कॉलेज, वारजेचा काही भाग असे विभिन्न परिसर या प्रभागात मोडतात. या प्रभागाची सविस्तर रचना जाणून घेऊयात. (PMC Pune Election 2025)

 

प्रभाग क्रमांक ३० – कर्वेनगर – हिंगणे होम कॉलनी

लोकसंख्या – एकूण -७६९०३ – अ. जा. -४२७६ – अ. ज. – ८६५

निवडून द्यायच्या सदस्यांची संख्या – ४

 

व्याप्तीः यजुर्वेद सोसायटी, कमिन्स कॉलेज, वारजे (भाग), शाहू कॉलनी, हिंगणे स्त्री शिक्षण संस्था, मातोश्री वृध्दाश्रम, विठ्ठल मंदिर, आनंद कॉलनी, ज्ञानदिप कॉलनी, थोरात कॉलनी पारिजात कॉलनी, सम्राट अशोक विद्यामंदिर, कर्वेनगर गल्ली क्र. १ ते १०, दुधाने नगर, हिंगणे होम कॉलनी, पश्चिमरंग सोसायटी, काकडे सिटी, ब्रम्हचैतन्य सोसायटी, गिरीष सोसायटी, मावळे वस्ती, कामना वसाहत इ.

उत्तर: नादब्रम्ह सोसायटी, चैतन्य नगरी सोसायटी यांचे पूर्वेकडील रस्त्याची/हद्दीची सरळ रेषा (आकाशनगर ची पश्चिमेकडील हद्द) मौजे कोथरुड आणि मौजे वारजे यांच्या हद्दीस जेथे मिळते, तेथून पूर्वेस मौजे कोथरुड आणि मौजे वारजे यांचे हद्दीने व पुढे वनदेवी मंदिराजवळ महर्षी कर्वे रस्ता ओलांडून भुजबळ बंगल्या समोरील रस्त्याने पद्मरेखा सोसायटीच्या पूर्वेकडील रस्त्यास मिळेपर्यंत, तेथून दक्षिणेस सदर रस्त्याने पद्मरेखा, चिंतामणी, क्षिप्रा सोसायटीच्या दक्षिणेकडील रस्त्यास मिळेपर्यंत, तेथून पूर्वेस सदर रस्त्याने राहुल बोरकर चौक ओलांडून पुढे विठ्ठल मंदिराच्या उत्तरेकडील रस्त्याने मातोश्री वृध्दाश्रमाच्या पूर्वेकडील नदीकाठच्या डी.पी. रस्त्यास मिळेपर्यंत.

पुर्व व दक्षिणः विठ्ठल मंदिराच्या उत्तरेकडील रस्ता मातोश्री वृध्दाश्रमाच्या पूर्वेकडील नदीकाठच्या डी. पी. रस्त्यास जेथे मिळतो. तेथून दक्षिणेस सदर डी.पी. रस्त्याने राजाराम पूलावरील रस्त्यास मिळेपर्यंत. तेथून पूर्वेस सदर रस्त्याने राजाराम पुलाजवळ मुठा नदीस मिळेपर्यंत, तेथून दक्षिणेस मुठा नदीने कात्रज देहूरोड बायपास रस्त्यास पूलावर मिळेपर्यंत.

पश्चिमः मुठा नदी कात्रज देहूरोड बायपास रस्त्यास पूलावर जेथे मिळते. तेथून उत्तर पश्चिमेस कात्रज देहूरोड बायपास हायवेने कर्वे रस्ता ओलांडून वर्धमान पेट्रोल पंपा जवळील कॅनॉल रस्त्यास मिळेपर्यंत तेथून पूर्वेस कॅनॉल रस्त्याने नादब्रम्ह सोसायटीच्या पूर्वेकडील हद्दीस मिळेपर्यंत, तेथून उत्तरेस नादब्रम्ह सोसायटीच्या, चैतन्य नगरी सोसायटीच्या पूर्वेकडील हद्दीने / रस्त्याने व पुढे नादब्रम्ह सोसायटीच्या चैतन्य नगरी सोसायटीच्या पूर्वेकडील हद्दीच्या / रस्त्याच्या सरळ रेषेने (आकाशनगर ची पश्चिमेकडील हद्द) मौजे कोथरुड, मौजे वारजे यांच्या हद्दीस मिळेपर्यंत.

 

The Karbhari - Pune PMC Election 2025

PMC Ward 30 – Karvenagar Hingane Home Colony Map

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: