PMC Ward 29 – Deccan Gymkhana Happy Colony | प्रभाग क्रमांक २९ – डेक्कन जिमखाना – हॅप्पी कॉलनी | एरंडवणा गावठाण, प्रभातरोड परिसर असे विविध भाग येणाऱ्या या प्रभागाची रचना सविस्तर जाणून घ्या
Pune Corporation Election 2025 – (The Karbhari News Service) – प्रभाग क्रमांक २९ – डेक्कन जिमखाना – हॅप्पी कॉलनी या प्रभागासाठी देखील एक ही हरकत आणि सूचना आलेली नाही. या प्रभागाची रचना आणि व्याप्ती सविस्तर जाणून घेऊया. (Pune PMC Election 2025)
प्रभाग क्रमांक २९ – डेक्कन जिमखाना – हॅप्पी कॉलनी
लोकसंख्या – एकूण – ७६१९४ -० अ. जा. – ३६०१ – अ.ज. ४७३
निवडून द्यायच्या सदस्यांची संख्या – ४
व्याप्ती: एरंडवणा गावठाण, कर्वेनगर (पार्ट), एस.एन.डी.टी. विद्यालय, दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटल, विघ्नहर्ता सोसायटी, खिलारे वाडी, सेंट्रल मॉल, आयुर्वेद रसशाळा, रजपूत झोपडपट्टी, उदय सोसायटी नवसह्याद्री सोसायटी, मेजर ताथवडे उद्यान, शामाप्रसाद मुखजी उद्यान, वारजे कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालय, युनायटेड वेस्टर्न सोसायटी, गोसावी वस्ती, भुजबळ बंगला, हॅपी कॉलनी, राहुल नगर, पिनाक कॉलनी, करिष्मा सोसायटी, फिल्म अॅण्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्युट, प्रभातरोड परिसर, पीवायसी हिंदू जिमखाना इ.
उत्तर: हनुमान टेकडी आणि विधी महाविद्यालयाची पश्चिमेकडील सामाईक हद्द विधी महाविद्यालयाची दक्षिणेकडील हद्दीस जेथे मिळते तेथून पूर्वेस विधी महाविद्यालयाच्या दक्षिणेकडील हद्दीने विधी महाविद्यालय रस्ता ओलांडून पुढे प्रभात रस्त्याने प्रभात रस्ता गल्ली क्र. ८ ला गुरु रोहिणी भाटे चौकात मिळेपर्यंत, तेथून उत्तरेस प्रभात रस्ता गल्ली क्र. ७ ने भांडारकर रस्त्यास मिळेपर्यंत, तेथून पूर्वेस भांडारकर रस्त्याने गोपाळ कृष्ण गोखले रस्त्यास (एफ.सी. रस्ता) गुडलक चौकात मिळेपर्यंत.
पुर्व: भांडारकर रस्ता गोपाळ कृष्ण गोखले रस्त्यास (एफ.सी. रस्ता) गुडलक चौकात मिळतो, तेथून दक्षिणेस सदर रस्त्याने मुठा नदीस छत्रपती संभाजी महाराज पुलावर (लकडी पुलावर) मिळेपर्यंत, तेथून दक्षिण-पश्चिमेस मुठा नदीने राजाराम पूलावर मातोश्री वृध्दाश्रमाकडे जाणाऱ्या रस्त्यास मिळेपर्यंत.
दक्षिणः मुठा नदी राजाराम पूलावर मातोश्री वृध्दाश्रमाकडे जाणाऱ्या रस्त्यास जेथे मिळते. तेथून उत्तरपश्चिमेस सदर रस्त्याने नदीकाठच्या १०० फुट डी. पी. रस्त्यास मिळेपर्यंत तेथून उत्तरेस सदर १०० फुट डी. पी. रस्त्याने विठ्ठल मंदिराच्या उत्तरेकडील रस्त्यास मिळेपर्यंत तेथून पश्चिमेस विठ्ठल मंदिराच्या उत्तरेकडील रस्त्याने राहूल बोरकर चौक ओलांडून कॅनॉल रस्त्यास मिळेपर्यंत, तेथून उत्तरेस सदर कॅनॉल रस्त्याने भुजबळ बंगल्यासमोरील पूर्व पश्चिम रस्त्यास मिळेपर्यंत तेथून पश्चिमेस भुजबळ बंगल्या समोरील पुर्व पश्चिम रस्त्याने महर्षि कर्वे रस्त्यास वनदेवी मंदिराजवळ मिळेपर्यंत.
पश्चिम : भुजबळ बंगल्या समोरील पुर्व पश्चिम रस्ता महर्षि कर्वे रस्त्यास वनदेवी मंदिराजवळ जेथे मिळतो, तेथून उत्तरेस कर्वे रस्त्याने मौजे कोथरूड व एरंडवणे यांच्या सामायिक हद्दीस मिळेपर्यंत, तेथून उत्तरेस सदर हद्दीवरील नाल्याने व पुढे पूर्वेस शीला विहार कॉलनीच्या पश्चिमेकडील हद्दीस मिळेपर्यंत, तेथून शीला विहार कॉलनीच्या पश्चिम व दक्षिण हद्दीने कै. पु. भा. भावे रस्त्यापर्यंत व पुढे सदर रस्त्याने पौड रस्त्यास मिळेपर्यंत, तेथून उत्तर-पश्चिमेस पौड रस्त्याने व पुढे उत्तर-पूर्वेस एआरएआई टेकडीकडे जाणाऱ्या रस्त्याने सुरेख सोसायटीच्या पश्चिम हद्दीस मिळेपर्यंत तेथून पुढे उत्तरेस फिल्म अॅण्ड टेलिव्हिजनच्या पश्चिमेकडील हद्दीने विधी महाविद्यालयाच्या दक्षिणेकडील हद्दीस मिळेपर्यंत.

COMMENTS