PMC Pune | खोदाई शुल्का पोटी मनपा तिजोरीत चालू आर्थिक वर्षात 254 कोटी जमा   | अजून 100 कोटी जमा होण्याची अपेक्षा

HomeपुणेBreaking News

PMC Pune | खोदाई शुल्का पोटी मनपा तिजोरीत चालू आर्थिक वर्षात 254 कोटी जमा | अजून 100 कोटी जमा होण्याची अपेक्षा

Ganesh Kumar Mule Feb 21, 2023 1:41 PM

PMC Employees Promotion | वर्षभरात महापालिकेच्या ६०० कर्मचाऱ्यांना पदोन्नती | आयुक्तांच्या हस्ते दिल्या ऑर्डर, आज्ञापत्र 
Maharashtra Cabinet Meeting | मंत्रिमंडळ बैठकीतील महत्वाचे ४ निर्णय जाणून घ्या!
Retired Employees Notional Increment | 30 जूनला सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना 1 जुलै ची काल्पनिक वेतनवाढ | पुणे महापालिका मागवणार राज्य सरकारचे मार्गदर्शन

खोदाई शुल्का पोटी मनपा तिजोरीत चालू आर्थिक वर्षात 254 कोटी जमा

| अजून 100 कोटी जमा होण्याची अपेक्षा 
महापालिकेच्या पथ विभागाला खोदाई शुल्कातून चालू आर्थिक वर्षात 254 कोटींचे उत्पन्न मिळाले आहे. आगामी महिन्याभरात अजून 100 कोटी मिळतील, असा विश्वास महापालिका पथ विभागाला आहे. दरम्यान मागील वर्षीपेक्षा हे उत्पन्न जास्त आहे. मागील वर्षी पालिकेला खोदाई शुल्कातून 226 कोटी मिळाले होते. अशी माहिती पथ विभागाचे अधीक्षक अभियंता साहेबराव दांडगे यांनी दिली.
शहरात विविध संस्था/एजन्सी मार्फत सेवा वाहिन्या टाकण्याची कामे करण्यात येतात.  यामध्ये एम.एन.जी.एल. , एम.एस.ई.डी.सी.एल. , बी.एस.एन.एल., ओएफसी कंपन्या व खाजगी व्यावसायिक या सर्व संस्थांना  रस्ते खोदाईस
पुणे मनपाच्या पथ विभागामार्फत परवानगी दिली जाते. रस्ता पुनः स्थापना दरात या सरकारी संस्थांना सवलत दिली जाते.
 : प्रति रनिंग मीटर र रु.१२,१९२/- रु इतका दर
महापालिका आयुक्त यांचे  ठरावान्वये मान्यता मिळाल्यानुसार आजमितीस ओएफसी कंपन्या व खाजगी व्यावसायिकां करिता कोणतीही सवलत न देता प्रति रनिंग मीटर र रु.१२,१९२/- रु इतका दर आकारण्यात येतो. याव्यतिरिक्त एच.डी.डी.पध्दतीने खोदाई करावयाची झाल्यास र.रु. ४०००/- प्रति र.मी. एवढे पुर्नःस्थापना शुल्क आकारण्यात येते. तसेच दुरुस्तीसाठी ठराविक अंतरावर पीट्स आवश्यक असल्याने त्याचा दर र.रु. ६१६०/- प्रति चौ.मी. आकारण्यात
येतो.
दरम्यान पावसाळ्यात खोदाई बंद असते. पावसाळा संपल्यानंतर खोदाई ला परवानगी दिली जाते. मे महिन्याच्या अखेरपर्यंत खोदाई करण्याला परवानगी दिली जाते. या शुल्कातून महापालिकेला चांगले उत्पन्न मिळू लागले आहे. विभागाला खोदाई शुल्कातून चालू आर्थिक वर्षात 254 कोटींचे उत्पन्न मिळाले आहे. आगामी महिन्याभरात अजून 100 कोटी मिळतील, असा विश्वास महापालिका पथ विभागाला आहे. दरम्यान मागील वर्षीपेक्षा हे उत्पन्न जास्त आहे. मागील वर्षी पालिकेला खोदाई शुल्कातून 226 कोटी मिळाले होते. दांडगे यांच्या माहितीनुसार गेल्या 10 ते 12 वर्षात पालिकेला या शुल्कातून सुमारे 1448 कोटींचे उत्पन्न मिळाले आहे. त्यामध्ये 2015-16 मध्ये सर्वात जास्त म्हणजे 303 कोटींचे उत्पन्न मिळाले होते. मात्र चालू वर्षात यापेक्षाही जास्त म्हणजे 350 कोटी उत्पन्न मिळेल असा अंदाज आहे.