PMC Shahari Garib Yojana | पॅनलवरील हॉस्पिटल मध्ये अॅडमिशनपूर्वीचे उपचारांचे बिल “अजितदादा पवार योजने”तून मिळणार नाही | प्रशासनाचा स्पष्ट अभिप्राय

Homeadministrative

PMC Shahari Garib Yojana | पॅनलवरील हॉस्पिटल मध्ये अॅडमिशनपूर्वीचे उपचारांचे बिल “अजितदादा पवार योजने”तून मिळणार नाही | प्रशासनाचा स्पष्ट अभिप्राय

Ganesh Kumar Mule Aug 19, 2026 8:22 AM

PMC Birth and Death Certificate | जन्म व मृत्यु दाखल्यांबाबत अधिक कडक पडताळणी करण्याच्या सूचना |  जन्म व मृत्यु प्रमाणपत्र प्रक्रियेबाबत महापौर कार्यालय येथे आढावा बैठक
MLA Hemant Rasane | पुणे शहरात वाढत असलेल्या ‘गुलियन बॅरी सिंड्रोम’ (GBS) च्या प्रतिबंधासाठी तातडीच्या उपाययोजनांची मागणी
PMC CHS Scheme | महापालिका कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी | सेवानिवृत्त सेवकांना तत्काळ दिला जाणार CHS योजनेचा लाभ | अतिरिक्त आयुक्त यांच्यासोबत झालेल्या बैठकीत निर्णय

PMC Shahari Garib Yojana | पॅनलवरील हॉस्पिटल मध्ये अॅडमिशनपूर्वीचे उपचारांचे बिल “अजितदादा पवार योजने”तून मिळणार नाही | प्रशासनाचा स्पष्ट अभिप्राय

राज्य शासनाच्या ऑडिट आक्षेपानंतर प्रशासनाचा स्थायी समितीला अभिप्राय सादर

 

PMC Health Department – (The Karbhari News Service) – स्व. अजितदादा पवार शहरी गरीब वैद्यकीय सहाय्य योजनेअंतर्गत पुणे महानगरपालिकेच्या पॅनेलवरील खासगी रुग्णालयात अॅडमिशनपूर्वी उपचार घेतलेल्या रुग्णांची बिले आता अदा केली जाणार नाहीत. राज्य शासनाच्या ऑडिट पथकाने यावर आक्षेप घेतल्यानंतर प्रशासनाने याबतचा अभिप्राय स्थायी समितीला सादर केला आहे. (PMC Standing Committee)

स्थायी समिती ठराव अन्वये, मनपातील अल्प उत्पन्न गटातील नागरिकांना या योजनेचा लाभ अॅडमिशनच्या दिवशी योजनेचे सभासदत्व घेतल्यास द्यावा, असा प्रस्ताव आला होता.

मात्र मुख्य सभा ठराव नुसार, “अजितदादा पवार योजना” ही आरोग्य विमा योजना असल्याने योजनेचे सभासदत्व होण्यापूर्वी झालेल्या उपचारांसाठी लाभ देता येणार नाही, असे आधीच स्पष्ट करण्यात आले आहे.

योजनेअंतर्गत वार्षिक 1 लाख 60 हजार रुपयांपर्यंत उत्पन्न असलेल्या कुटुंबाला वर्षाला 2 लाख आणि कॅन्सर, किडनी, हृदयरोग या 3 आजारांसाठी अतिरिक्त 2 लाख असे एकूण 4 लाख रुपयांपर्यंतचे कॅशलेस उपचार मिळतात.

ऑडिटमुळे नियम कडक
प्रशासनाच्या म्हणण्यानुसार, सन 2018 ते 2021 या कालावधीच्या लेखापरीक्षणात महाराष्ट्र शासनाच्या ऑडिट पथकाने आक्षेप नोंदवला होता. सभासदत्व होण्यापूर्वीच्या कालावधीतील बिलांसाठी प्रतिपूर्ती दिल्याने हा आक्षेप आला. त्यामुळे आता तसे बिल अदा करता येणार नाही.

अनेक नागरिक रुग्णालयात दाखल होण्यापूर्वी खासगी रुग्णालयात उपचार करून नंतर योजनेचे सभासदत्व घेऊन त्या बिलांची मागणी करत होते. त्यामुळेच हा विषय ऐनवी वैद्यकीय सहाय्य योजना समितीच्या 15/07/2022 च्या बैठकीत मांडण्यात आला होता.

प्रशासनाने काय स्पष्ट केले?
1. *योजना आरोग्य विम्यासारखी*: ही योजना विमा असल्याने पॉलिसी सुरू होण्यापूर्वीचा खर्च मिळत नाही.
2. *ऑनलाइन प्रक्रिया*: सप्टेंबर 2022 पासून नोंदणी ऑनलाइन आहे. एप्रिल 2023 पासून संगणकाद्वारे सभासद कार्ड दिले जात आहे. त्यामुळे अॅडमिशनच्या दिवशीच सभासदत्व नोंदणी करणे शक्य आहे.

प्रशासनाने आपल्या अभिप्रायात स्पष्ट म्हटले आहे की, “स्व. अजितदादा पवार योजनेअंतर्गत पुणे मनपा पॅनेलवरील हॉस्पिटलमध्ये अॅडमिशनपूर्वी योजनेचे सभासदत्व न घेतलेल्या रुग्णांचे, अॅडमिट दिनांकापासून होणाऱ्या वैद्यकीय उपचारांची बिले अदा करणे शक्य नाही.”

हा अभिप्राय आता स्थायी समितीच्या अंतिम निर्णयासाठी ठेवण्यात आला आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: