Pavneet Kaur IAS | HCMTR प्रकल्पाच्या प्रस्तावित मार्गिकेची पाहणी; वाहतूक नियोजन आणि समन्वयावर भर

Homeadministrative

Pavneet Kaur IAS | HCMTR प्रकल्पाच्या प्रस्तावित मार्गिकेची पाहणी; वाहतूक नियोजन आणि समन्वयावर भर

Ganesh Kumar Mule Aug 18, 2026 9:49 PM

Pune Breaking News | केंद्र सरकार कडून पुणे महापालिकेला १२९० कोटी निधी मंजूर
Pune Children Festival 2025 | पुणे बाल महोत्सवाचे उद्घाटन | यावर्षी उत्सवाची संकल्पना  “कमी स्क्रीन, अधिक खेळ”
E Waste – Green Byte | शहरातील ई-कचरा (E-Waste) व्यवस्थापन प्रणाली अधिक सक्षम करण्यासाठी “Green Byte” प्रकल्पाचे आयोजन

Pavneet Kaur IAS | HCMTR प्रकल्पाच्या प्रस्तावित मार्गिकेची पाहणी; वाहतूक नियोजन आणि समन्वयावर भर

 

Pune PMC News – (The Karbhari News Service) –  पुणे महानगरपालिकेच्या महत्त्वाकांक्षी HCMTR म्हणजेच High Capacity Mass Transit Route प्रकल्पाच्या प्रस्तावित मार्गिकेची पाहणी आज 18 ऑगस्ट  रोजी करण्यात आली. या पाहणीसाठी अतिरिक्त महापालिका आयुक्त पवनीत कौर आणि अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील उपस्थित होते. (Pune Breaking News)

सुमारे 43.60 कि.मी. लांबीची असणाऱ्या HCMTR प्रकल्पाच्या मार्गिकेतील सोलापूर रस्ता ते सप्रस चौक या पट्ट्याची प्रत्यक्ष पाहणी यावेळी करण्यात आली.

पाहणीदरम्यान मार्गिकेवरील विविध तांत्रिक आणि वाहतूक विषयक मुद्द्यांचा आढावा घेण्यात आला. यामध्ये भूसंपादनाची सद्यस्थिती, प्रमुख चौकांमधील वाहतूक नियोजन आणि महत्त्वाच्या रस्त्यांशी HCMTR मार्गिकेची रॅम्पद्वारे जोडणी या बाबींचा समावेश होता. संबंधित अधिकाऱ्यांना यासंदर्भात आवश्यक सूचना देखील देण्यात आल्या.

HCMTR मार्गिका ही उन्नत स्वरूपाची असली तरी ज्या ठिकाणी तांत्रिकदृष्ट्या शक्य आहे, त्या ठिकाणी जमिनीच्या पातळीवर उपलब्ध रस्त्यांचा विकास आणि योग्य वापर करण्याचे नियोजन करावे, असे निर्देश यावेळी देण्यात आले.

प्रकल्पाची अंमलबजावणी करताना मेट्रो, उड्डाणपूल आणि वाहतूक विभाग यांच्याशी आवश्यक समन्वय साधावा. विविध प्रकल्पांमुळे निर्माण होणारे संभाव्य वाहतूक विषयक प्रश्न लक्षात घेऊन पुढील नियोजन करावे, असेही ठरविण्यात आले.

या पाहणीदरम्यान मुख्य अभियंता प्रकल्प दिनकर गोजारे, मुख्य अभियंता पथ राजेश बनकर यांच्यासह बांधकाम विभाग आणि भूसंपादन विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: