Shrinath Bhimale PMC | मुलींचे जन्मदाखले आता विनामूल्य | स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांची माहिती

Homeadministrative

Shrinath Bhimale PMC | मुलींचे जन्मदाखले आता विनामूल्य | स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांची माहिती

Ganesh Kumar Mule Aug 27, 2026 9:08 PM

HSRP Number Plate | HSRP नंबरप्लेटची सक्ती रद्द करण्यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने निषेध आंदोलन
Dr Kumar Vishwas | Pune Book Festival | पुस्तकांचे वाचन हा स्वसंवादाचा उत्तम मार्ग | प्रसिद्ध हिंदी कवी डॉ. कुमार विश्वास यांचे मत
PMC Election EVM Machine | अतिरिक्त आयुक्त यांच्याकडून EVM मशीन सिलींग तसेच कमिशनिंग याची पाहणी

Shrinath Bhimale PMC | मुलींचे जन्मदाखले आता विनामूल्य | स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांची माहिती

 

PMC Standing Committee – (The Karbhari News Service) – पुणे शहरात जन्मलेल्या मुलींच्या जन्माचे स्वागत करण्यासाठी आणि समाजात स्त्री-सन्मानाची भावना वृद्धिंगत करण्याच्या उद्देशाने मुलींचे जन्मदाखले विनामूल्य देण्याचा प्रस्ताव पुणे महानगरपालिकेच्या स्थायी समिती समोर ठेवण्यात आला होता. या प्रस्तावाला मान्यता दिल्याचे समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी सांगितले. (Pune Municipal Corporation – PMC)

हा प्रस्ताव सर्वपक्षीय नगरसेवकांची दिल्याचे भिमाले यांनी सांगितले.

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी पुणे शहरातून स्त्री शिक्षण, सामाजिक समता आणि महिलांच्या हक्कांसाठी ऐतिहासिक कार्य केले. त्यामुळे त्यांच्या कार्याचा वारसा जपणे ही पुणे महापालिकेची सामाजिक जबाबदारी आहे. मुलगा आणि मुलगी यांच्यातील भेदभाव दूर करण्यासाठी मुलीच्या जन्माकडे आनंद आणि अभिमानाची बाब म्हणून पाहण्याची गरज असल्याचे ठरावात नमूद करण्यात आले आहे.

मुलीच्या जन्मानंतर कुटुंबावर कोणताही अनावश्यक आर्थिक भार पडू नये तसेच संस्थात्मक पातळीवर तिच्या जन्माचा सन्मान व्हावा, यासाठी जन्म-मृत्यू नोंदणी विभागामार्फत मुलींचे जन्मदाखले कोणतेही शुल्क न आकारता देण्यात यावेत, अशी मागणी करण्यात आली होती.

मुलीचा जन्म हा कुटुंबासह समाजासाठीही सन्मानाची आणि आनंदाची बाब आहे, हा संदेश या उपक्रमातून देण्याचा प्रयत्न असल्याचे
भिमाले म्हणाले.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: