PMC Standing Committee | 100 फ्लॅट पेक्षा अधिक निवासी मिळकती असलेल्या सोसायट्यांना एसटीपी प्लांट बंधनकारक

Homeadministrative

PMC Standing Committee | 100 फ्लॅट पेक्षा अधिक निवासी मिळकती असलेल्या सोसायट्यांना एसटीपी प्लांट बंधनकारक

Ganesh Kumar Mule May 09, 2026 8:10 AM

Pramod Nana Bhangire | शिक्षण मंडळातून शाळेच्या मान्यतेची फाईल चोरी | पुणे महानगरपालिकेच्या ढिसाळ कारभाराला काळीमा |शहरप्रमुख प्रमोद नाना भानगिरे
PM Narendra Modi | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे महाराष्ट्रातील 11,200 कोटी रुपयांहून जास्त किमतीच्या विविध प्रकल्पांची पायाभरणी, उद्घाटन आणि राष्ट्रार्पण | जिल्हा न्यायालय ते स्वारगेट या पुणे मेट्रो विभागाचे केले उद्घाटन
Khadakwasla Dam | खडकवासला प्रकल्पातील ४ धरणे ५४ टक्के क्षमतेने भरली | धरणात १५.७४ टीएमसी पाणी

PMC Standing Committee | 100 फ्लॅट पेक्षा अधिक निवासी मिळकती असलेल्या सोसायट्यांना एसटीपी प्लांट बंधनकारक

| स्थायी समितीच्या बैठकीत घेण्यात आला निर्णय

 

Shrinath Bhimale PMC – (The Karbhari News Service) – शहरातील ज्या सोसायटीमध्ये 100 फ्लॅट पेक्षा अधिक निवासी मिळकती आहेत, त्या सर्व फ्लॅट ला यु डी सी पी आर नुसार एसटीपी प्लांट करणे बंधनकारक करण्यात आले आहे. याबाबत स्थायी समितीच्या बैठकीत चर्चा करून निर्णय घेण्यात आला. अशी माहिती समिती अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी दिली. (Pune PMC News)

दरम्यान या आधी देखील हा नियम करण्यात आला आहे. मात्र काही सोसायट्या त्याचे पालन करत नाहीत. उलट दंड भरणे योग्य समजतात. त्यावर समितीच्या बैठकीत चर्चा झाली. तसेच एक नियमावली बनवण्याची देखील बैठकीत चर्चा करण्यात आली.

: मगर हॉस्पिटल केले जाणार अद्यावत

हडपसर येथील मगर हॉस्पिटल अद्यावत करण्यासंदर्भात स्थायी समितीच्या बैठकीत चर्चा झाली. यासाठी पाच कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे.

: शहरभर सीसीटीव्ही लावण्याचा निर्णय

शहरामध्ये वाहतूक आणि गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांची संपर्क साधून आणि त्यांच्याशी नगरसेवकांनी समन्वय साधून शहरभर सीसीटीव्ही लावण्या संदर्भात स्थायी समिती बैठकीत चर्चा करून निर्णय घेण्यात आला.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: