PMC Solid Waste Management | सफाई सेवकांच्या दैनंदिन हजेरीबाबत महापालिका प्रशासन गंभीर | त्रयस्थ यंत्रणेमार्फत केली जाणार तपासणी 

Homeadministrative

  PMC Solid Waste Management | सफाई सेवकांच्या दैनंदिन हजेरीबाबत महापालिका प्रशासन गंभीर | त्रयस्थ यंत्रणेमार्फत केली जाणार तपासणी 

Ganesh Kumar Mule Oct 27, 2025 9:44 PM

PMC Solid Waste Management | महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांचा आता स्वच्छतेचा पुणे पॅटर्न! | विविध उपाययोजना सुचवल्या 
PMC Garbage Collection Charges | पुण्यात राहणाऱ्या प्रत्येक नागरिकाला आपल्या घरातील कचरा संकलन बाबत ही माहिती असणे गरजेचे!
PMC Solid Waste Management | पुणे महानगरपालिकेच्या कचरा प्रक्रिया क्षमतेत वाढ करण्यावर भर! | महापालिका आयुक्त यांची देवाची उरुळी कचरा डेपो,  बायोमायनिंग प्रकल्पास भेट

  PMC Solid Waste Management | सफाई सेवकांच्या दैनंदिन हजेरीबाबत महापालिका प्रशासन गंभीर | त्रयस्थ यंत्रणेमार्फत केली जाणार तपासणी

 

Pune PMC News – (The Karbhari News Service) – पुणे महापालिकेच्या १५ क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत सफाई कर्मचारी काम करत आहेत. मात्र या कर्मचाऱ्याच्या कामा बाबत महापालिका आयुक्त समाधानी नसल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे आता या कर्मचाऱ्यांच्या दैनंदिन हजेरीबाबत महापालिका प्रशासन गंभीर झाले आहे. हजेरी, स्वच्छता, नेमून दिलेल्या हद्दीतील उपस्थिती अशा गोष्टीची त्रयस्थ यंत्रणेमार्फत चौकशी केली जाणार आहे. तसे आदेश महापालिका अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी पी (Prithviraj B P IAS) यांनी जारी केले आहेत. (Pune Municipal Corporation – PMC)

पुणे महानगरपालिका घनकचरा व्यवस्थापन विभागांतर्गत १५ क्षेत्रिय कार्यालय स्तरावर शहराची दैनंदिन स्वच्छता करण्यासाठी कायम व कंत्राटी सफाई सेवक कार्यरत आहेत. या सफाई सेवकांमार्फत शहराच्या सार्वजनिक स्वच्छतेच्या अनुषंगाने आवश्यक सर्व कामकाज करून घेणे ही क्षेत्रिय कार्यालयांची प्राथमिक जबाबदारी आहे. परंतु सद्यस्थितीत महापालिका आयुक्त यांचेमार्फत शहरातील विविध ठिकाणी पहाणी केली जात असून त्यांचेमार्फत शहराच्या स्वच्छतेबाबत नाराजी व्यक्त केली जात आहे.  महापालिका आयुक्त यांचे पहाणी दरम्यान काही बाबी निदर्शनास आल्या आहेत. त्यामध्ये कार्यक्षेत्रातील झाडणकाम दैनंदिन स्वरूपात न होणे, सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता असणे, क्षेत्रिय कार्यालयांतर्गत विविध ठिकाणी क्रॉनिक स्पॉट आढळून येणे, सफाई सेवक कामाच्या वेळेत नेमून दिलेल्या हद्दीत उपस्थित नसणे, विना परवानगी अनेक सेवक वारंवार गैरहजर असणे, सफाई सेवक गणवेश व इतर आवश्यक सुरक्षा प्रावरणे (हॅन्डग्लोज, मास्क, ॲप्रण, गमबूट इ.) परिधान न करणे, स्वच्छता विषयक कामकाज आठवड्यातील सातही दिवस सुरु राहणे अपेक्षित असताना रविवारी अपेक्षित कामकाज होत नसल्याचे निदर्शनास येत आहे.

या  बाबी गंभीर असून दैनंदिन कामकाज व कार्यालयीन शिस्तीचा भंग करणा-या आहेत.  या अनुषंगाने क्षेत्रिय कार्यालय स्तरावर आता नियामवली ठरवून देण्यात आली आहे. तसेच या गोष्टी खरेच होतात कि नाही हे पाहण्यासाठी त्रयस्थ यंत्रणेमार्फत तपासणी देखील केली जाणार आहे. असे अतिरिक्त आयुक्त यांनी आपल्या आदेशात म्हटले आहे.

क्षेत्रिय कार्यालय स्तरावर दैनंदिन स्वरूपात झाडणकाम होणे आवश्यक असून शहराच्या सार्वजनिक स्वच्छतेच्या अनुषंगाने आवश्यक कामकाज नियमितपणे व सुरळीतपणे सुरु राहील याची दक्षता घ्यायची आहे.

क्रॉनिक स्पॉटची स्वच्छता दैनंदिन स्वरूपात करावयाची असून प्रत्येक क्रॉनिक स्पॉटचे मॉनिटरिंग करून त्याठीकाणी आवश्यक यंत्रणा कार्यान्वित करावी व सर्व क्रॉनिक स्पॉट पूर्णत: बंद करणेच्या अनुषंगाने नियोजन करण्यात यावे.

सर्व सफाई सेवक दैनंदिन कामकाजा दरम्यान गणवेश व सर्व आवश्यक सुरक्षा प्रावरणे परिधान करतील याची दक्षता घ्यावी. कंत्राटी सफाई सेवकांस गणवेश व सर्व आवश्यक सुरक्षा प्रावरणे पुरविणेबाबत संबंधीत ठेकेदारास सूचित करण्यात यावे.

विना परवानगी वांरवार गैरहजर असणा-या सफाई सेवकांवर तात्काळ कारवाई करून सर्व सफाई सेवक कामाच्या वेळेत नियुक्त कामाच्या ठिकाणी व हद्दीत उपस्थित असतील याची दक्षता घ्यावी.

प्रत्येक सफाई सेवकाच्या साप्ताहिक सुट्टीचे नियोजन करून आठवड्यातील सातही दिवस (रविवार सहित ) स्वच्छता विषयक कामकाज सुरु राहील याची दक्षता घ्यावी.

महापालिका आयुक्त यांच्या आदेशांनुसार दररोज स. १०.४५ तसेच दु. २.४५ वाजेपर्यंत क्षेत्रिय कार्यालयांतर्गत प्रत्यक्ष झाडणकाम करीत असलेल्या सफाई सेवकांच्या दैनंदिन हजेरीचा अहवाल संबंधीत महापालिका सहाय्यक आयुक्त यांचे स्वाक्षरीने उपायुक्त, परिमंडळ कार्यालय यांचेमार्फत घनकचरा व्यवस्थापन विभागाकडे पाठविण्यात यावा. सर्व सफाई सेवकांनी ISWM नुसार नियुक्त हद्दीमध्ये दैनंदिन स्वरूपात कामकाज करणे व त्यानुसार त्या सेवकांचे मासिक पगार अदा करणे बंधनकारक असून याची अंमलबजावणी होत असलेबाबत क्षेत्रिय कार्यालय स्तरावर खातरजमा करण्यात यावी. असे अतिरिक्त आयुक्तांनी आपल्या आदेशात म्हटले आहे.

 

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: