Pune Bhide Bridge | वाहतूक विभागाने दिलेल्या परवानगीचे मोठे फलक भिडे पुलाच्या दोन्ही बाजूस लावण्याची मागणी
Pune Traffic Police – (The Karbhari News Service) – भिडे पुलावरील वाहतूक सायंकाळी ५ ते ११ सुरु ठेवण्याच्या अटीवर वाहतूक विभागाने इतर वेळी पूल वाहतुकीसाठी बंद ठेवण्यास मेट्रोला परवानगी दिली आहे, यासंदर्भातील मोठे फलक भिडे पुलाच्या दोन्ही बाजूस लावावे, अशी मागणी सजग नागरिक मंचाचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी वाहतूक पोलीस यांच्याकडे केली आहे. (Pune Metro)
वेलणकर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदना नुसार भिडे पूल वाहतुकीसाठी बंद ठेवण्या संदर्भात वाहतूक विभागाच्या उपायुक्त यांनी मेट्रो ला १५ डिसेंबर २०२५ पर्यंत परवानगी देताना सदरहू पूल सायंकाळी ५ ते ११ या काळात वाहतुकीसाठी खुला ठेवण्यास सांगितले आहे. मात्र हे नागरीकांना कळण्यासाठी भिडे पुलाचे दोन्ही बाजूस तसे मोठे फलक तातडीने लावावे अशी मागणी आहे. वाहतूक बंद नियोजन करताना मेट्रो वा वाहतूक खात्याने महापालिकेचीही परवानगी घेतली असती तर अधिक बरे झाले असते. मेट्रोच्या कामाचा वेग कासवाला ही लाजवेल असा असल्याने हे काम आणखी किती लांबेल माहीत नाही. आज दुपारी ३.३० वाजता पुलावर जेमतेम अर्धा डझन माणसे काम करत होती. वाहतूक पोलिस , मनपा व मेट्रो यांची संयुक्त आढावा समिती नेमून या कामाचा नियमित आढावा घेणे अत्यावश्यक आहे. १५ डिसेंबर नंतरही मेट्रोने परवानगी वाढवून मागितली तर मात्र त्यांना फक्त रात्रीच्या वेळीच कामाची परवानगी द्यावी अशी आग्रहाची मागणी आहे. असे वेलणकर यांनी म्हटले आहे.

COMMENTS