PMC Solid Waste Management | पुणे महानगरपालिकेच्या कचरा प्रक्रिया क्षमतेत वाढ करण्यावर भर! | महापालिका आयुक्त यांची देवाची उरुळी कचरा डेपो,  बायोमायनिंग प्रकल्पास भेट

Homeadministrative

PMC Solid Waste Management | पुणे महानगरपालिकेच्या कचरा प्रक्रिया क्षमतेत वाढ करण्यावर भर! | महापालिका आयुक्त यांची देवाची उरुळी कचरा डेपो,  बायोमायनिंग प्रकल्पास भेट

Ganesh Kumar Mule Nov 02, 2025 1:59 PM

Junior Engineer | PMC | कनिष्ठ अभियंता पदावर अश्विनी वाघमारे यांना नियुक्त करण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश
SKADA system | पथ विभाग निविदा वाद | स्काडा यंत्रणेशिवाय काम केल्याचा आरोप | अधिकारी, ठेकेदार, कन्सल्टंट यांच्यावर कारवाई करण्याची अरविंद शिंदे यांची मागणी
Soyabean Price | सोयाबीनच्या हमिभावात ३५० रुपयाची वाढ

PMC Solid Waste Management | पुणे महानगरपालिकेच्या कचरा प्रक्रिया क्षमतेत वाढ करण्यावर भर! | महापालिका आयुक्त यांची देवाची उरुळी कचरा डेपो,  बायोमायनिंग प्रकल्पास भेट

 

Pune PMC News – (The Karbhari News Service) – पुणे  महापालिका आयुक्त नवल किशोर राम (Naval Kishore Ram IAS) यांनी आज देवाची उरुळी कचरा डेपो परिसरास (Devachi Uruli Garbage Project)  भेट देऊन तेथील कामकाजाची सविस्तर पाहणी केली. या भेटीदरम्यान त्यांनी पुणे मनपाच्या बायोमायनिंग प्रकल्पा (PMC Biomining Project)  तसेच ५०० मेट्रिक टन क्षमतेच्या मिश्र कचरा प्रक्रिया प्रकल्पाची पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांकडून कामकाजाचा आढावा घेतला.

यावेळी महापालिका आयुक्त यांनी हडपसर आणि घोले रोड येथील कचरा हस्तांतरण केंद्र यांचे आधुनिकीकरण करणे, घरोघरी जाऊन वाहनांद्वारे कचरा गोळा करणे कामी आधुनिक यंत्रणा निर्माण करणे, स्मार्ट कलेक्शन केंद्र निर्माण करणे, वेस्ट टू एनर्जी प्रकल्पाचे कामकाज गतीने पूर्ण करणे बाबत आदेश दिले. (Pune Municipal Corporation – PMC)

 

  • नवे कचरा प्रक्रिया प्रकल्प उभारण्याची आवश्यकता 

निरीक्षणादरम्यान आयुक्त यांनी पुणे शहरातील कचरा व्यवस्थापन अधिक कार्यक्षम व शाश्वत करण्यासाठी अजून नवे कचरा प्रक्रिया प्रकल्प उभारण्याची आवश्यकता असल्याचे नमूद केले. त्यांनी पुढील काळात महानगरपालिकेची कचरा प्रक्रिया क्षमता वाढविण्यावर विशेष भर देण्याचे निर्देश दिले.

  • बायोमायनिंग / बायो-रिमेडियेशन प्रक्रिया एक वर्षाच्या आत पूर्ण करा

यावेळी आयुक्त यांनी लिगसी वेस्ट (जुना कचरा) यावर शास्त्रोक्त बायोमायनिंग / बायो-रिमेडियेशन प्रक्रिया एक वर्षाच्या आत पूर्ण करून संबंधित जागा रिकामी करण्याचे स्पष्ट निर्देश दिले. त्यांनी नमूद केले की, रिकामी करण्यात आलेली जागा लोकोपयोगी प्रकल्प अथवा विकास योजनांसाठी वापरणे शक्य होईल.

 

स्वच्छ आणि हरित पुण्याच्या दिशेने पाऊल

या पाहणीदरम्यान घनकचरा व्यवस्थापन विभाग प्रमुख संदिप कदम, कार्यकारी अभियंता  प्रसाद जगताप व अमर मदिकुंट, संबंधित अधिकारी व कंत्राटदार प्रतिनिधी उपस्थित होते. पुणे महानगरपालिका पर्यावरणीय दृष्टीने शाश्वत कचरा व्यवस्थापनासाठी कटिबद्ध असून, येणाऱ्या काळात नागरिकांच्या सहकार्याने स्वच्छ आणि हरित पुण्याच्या दिशेने पुढील पाऊले उचलली जातील, असेही यावेळी सांगण्यात आले.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: