CM Devendra Fadnavis on Pune Tour | मुख्यमंत्री उद्या पुणे दौऱ्यावर | विविध विकास कामाचे होणार लोकार्पण आणि उद्घाटन

Homeadministrative

CM Devendra Fadnavis on Pune Tour | मुख्यमंत्री उद्या पुणे दौऱ्यावर | विविध विकास कामाचे होणार लोकार्पण आणि उद्घाटन

Ganesh Kumar Mule May 16, 2026 9:37 PM

CM Devendra Fadnavis | महाराष्ट्र देशातील पहिले बेघरमुक्त राज्य करण्यासाठी प्रयत्न करा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
CM Devendra Fadnavis | राष्ट्रीय आमदार संमेलन क्षमता वृद्धींगत करण्याचे व्यासपीठ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Purandar Airport | ‘पुरंदर विमानतळ’च्या कामाचे लवकरच ‘टेक ऑफ’!

CM Devendra Fadnavis on Pune Tour | मुख्यमंत्री उद्या पुणे दौऱ्यावर | विविध विकास कामाचे होणार लोकार्पण आणि उद्घाटन

 

Pune PMC News – (The Karbhari News Service) – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज (ता. १७ मे) रोजी पुणे शहराच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी मुख्यमंत्री यांच्या हस्ते विविध विकास कामाचे उद्घाटन आणि लोकार्पण होणार आहे. पुणे महापालिकेच्या वतीने या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. (Pune Municipal Corporation – PMC)

पुणे महापालिकेचे देशातील पहिलेच पीपीपी तत्त्वावरील कॅन्सर हॉस्पिटल तयार झाले आहे. त्याचे बाणेर येथे लोकार्पण होणार आहे. हा कार्यक्रम १२:३० वाजता असणार आहे.

तसेच मोहम्मदवाडी परिसरातील समान पाणीपुरवठा योजने अंतर्गत बांधण्यात आलेल्या ९ पाण्याच्या टाक्यांचे उद्घाटन केले जाणार आहे. हा कार्यक्रम दुपारी दोन वाजता असेल.

छत्रपती शिवाजीनगर येथील धर्मवीर संभाजी छत्रपती उद्यानातील छत्रपती संभाजी महाराजांच्या बुधभूषण ग्रंथ लिहितानाच्या कांस्यशिल्पाचे अनावरण दुपारी दीड वाजता होणार आहे.

त्याचप्रमाणे मुंढवा येथील महात्मा फुले चौक ते खराडी मेट्रो स्टेशन दरम्यान च्या दुमजली उड्डाणपुलाचे उद्घाटन दुपारी २ वाजता होणार आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: